संख्या नसत्या तर आयुष्य कसं असतं?
जरा कल्पना करा, एक संख्यारहित जग. मग घड्याळात किती वाजलेत, कॅलेंडरवर तारीख काय आहे किंवा बर्थ सर्टिफिकेटवर काय वर्ष आहे याची चिंताच नसती. तर मग आपण अधिक नैसर्गिक आणि आनंदी जीवन जगलं असतं का? प्रसून जोशी सदगुरुंना हा रोचक प्रश्न विचारताहेत.

प्रसून जोशी: सदगुरू, एक प्रश्न सतत माझ्य़ा डोक्यात असतो. जर जीवनात आकडेच नसते तर, जर आपल्याला
आकड्यांची संकल्पना माहितच नसती तर, हे जीवन जास्त चांगल असतं का? जर मला तुमचं वय माहित नसेल, मला किती वाजलेत हे माहित नसेल, मला माहित नसेल की किती…. मी किती वेळ झोपलो - तर माझं जीवन जास्त नैसर्गिक असेल का? जर मला आकड्यांची संकल्पनाच माहित नसेल तर मी निसर्गाशी आणि जीवनाशी सुसंवाद साधू शकेन का?
सदगुरू: नमस्कार, प्रसून. मला माहितय की तू शब्दांचा जादुगार आहेस आणि तुला आकडे आवडत नाहीत. तर, जेंव्हा तू “मी आणि तू” अस म्हणतोस तेव्हा “दोन" ही संख्या उत्पन्न होते. किंवा जरी तू फक्त “मी"; म्हटलंस तरीही “एक” ही संख्या असणारच. एकदा का ‘एक’ निर्माण झाला, की दहा, शंभर, हजार, लाख ह्या संख्या त्यामागे येणारच. तर ज्या क्षणी तुम्ही “मी” म्हणता त्याच क्षणी तुम्ही एका आकड्याची निर्मिती केली. आकडे फक्त तुमचं वय काय आहे, किती वाजलेत, मी कधी झोपलो, कधी उठलो, एवढ्या पुरतेच नाहीयेत. तू आणी मी - यातच दोन आकडे आले.
ज्याक्षणी तुम्ही "मी" म्हटलं, त्याचक्षणी तुम्ही संख्या उत्पन्न केली. आकड्यांच्या पलीकडे जाण्य़ाचा फक्त एकच मार्ग आहे, आणि त्याला शून्या
म्हणतात. जर तुम्ही योग-स्थितीत असाल, तर तुम्ही जणू "शि-व" आहात, शिव-चा अर्थ - "ते जे नाही", किंवा तुम्ही शून्य आहात, कारण तुम्ही नाही आहात.
मुळात “योग" म्हणजे “ऐक्य", याचा अर्थ तुमच्या व्यक्तिमत्वाची सीमा कशी खोडून टाकायची याचं हे शास्त्र आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सीमांना खोडून टाकण्याचा अर्थ असा की “एक” या मूळ संख्येला म्हणजेच या “मी" लाच संपवून टाकायचं. एकदा तुम्ही एक काढून टाकला की मग लक्ष, कोटी, अब्ज यांना काहीच अर्थ राहत नाही. सगळे शून्य होऊन जातात. तर योगाचा अर्थ आहे संख्यांना नष्ट करणं. योग म्हणजे ऐक्य. ऐक्य म्हणजे “तू" आणि मी” नाही, “खूप" नाही, फक्त “एक” आहे. पण खरंतर “एक” सुद्धा नाहीये, काहीच नाहीये. तर, ह्यालाच
कित्येक वेगवेगळी नावं दिली गेली. याला “शून्य” अस म्हटलं जातं, ह्याला “शिव” असं म्हटलं जातं. “शिव” म्हणजे, “जे नाहिये ते”. “जे नाहिये” त्याला संख्या जोडता येत नाही, फक्त “ जे आहे ” त्यालाच संख्या जोडता येते.
संख्या भौतिक अस्तित्वाचा एक स्वाभाविक परिणाम आहेत, कारण भौतिक अस्तित्वाला निश्चितच सीमा आहेत. “तुम्ही” आणि “मी” आहे असं तू तुझ्या प्रश्नातच म्हटलास, कारण तुम्ही ज्याला “तू” म्हणता त्याला भौतिकरीत्या आणि मानसिकरीत्या एक सीमा आहे, आणि ज्याला “मी" समजता त्यालाही एक सीमा आहे. ह्यात दोन संख्या आल्या. यानंतर बेरीज आणि गुणाकार होतोच.
जेव्हा कुणी भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जातो, तेव्हाच संख्यारहित अस्तित्व शक्य होतं. जेव्हा आपण म्हणतो की काही असीमित आहे, म्हणजे आपण हे ही म्हण्तोय की ते संख्यारहित आहे. जेव्हा आपण म्हणतो की काही अमर्याद आहे, आपण सीमा नसण्याबद्दलही बोलतोय. सीमा नाही म्हणजे एक किंवा दोन असं उरलेलं नाहिये. तर संख्यारहित अस्तित्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा पुर्ण योग किंवा ऐक्याची अवस्था असेल. माझ्या आयुष्यात माझा हाच प्रयत्न आहे की लोकांना संख्यारहित असण्याचा अनुभव देणं.
आकड्यांची जादू गणिताच्या रुपात तितकीच सुंदर आहे जितकी शब्दांची जादुगिरी. तर शब्द आणी आकडे ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहियेत, कारण जर एक शब्द आहे तर अनेक शब्द असणार. जर एक आकडा आहे, म्हणजेच खुप सारे आकडे असणार. हा सगळा अस्तित्वाच्या भौतिक साक्षात्काराचा परिणाम आहे. जर कुणी भौतिकतेच्या पलिकडे गेला, तर आपण एक अतिशय विपर्यस्त शब्द वापरतो - “अध्यात्मिक”. “अध्यात्मिक” या शब्दाचा अर्थ “एक संख्यांरहित अस्तित्व”.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.
