जीवन तुमच्या मुलांकडून शिका
बालदिनानिमित्त (दरवर्षी 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो), सद्गुरूंच्या नजरेतून पालक आणि मुलांचं नातं जाणून घेऊयात.
बालपण हा एक काळ आहे ज्याकडे आपण मागे वळून पाहताना आवडीने पाहतो - कारण त्यात जीवनाचा सहज आनंद आणि जबाबदारीपासून सुटका असते. पण जेव्हा आपण त्याकडे जर अगदी बारकाईने बघितलं तर मुलं खरोखरच मुक्त असतात का? की आजूबाजूच्या मोठ्या माणसांच्या अपेक्षांखाली आणि त्यांच्यावर लादलेल्या ओझ्याखाली ते दबलेले असतात? आपल्याजवळ मुलांना खरंच शिकवण्यासारखं काही आहे, की त्यांच्याकडून आपण आणखी बरंच काही शिकू शकतो?
बालदिनानिमित्त (दरवर्षी 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो), सद्गुरूंच्या नजरेतून पालक आणि मुलांचं नातं जाणून घेऊयात.
सद्गुरू: जर पालकांना खरंच आपल्या मुलांविषयी काळजी असेल तर त्यांनी आपल्या मुलांना अशा प्रकारे वाढवलं पाहिजे की मुलाला कधीही पालकांची गरज भासणार नाही. प्रेमाची प्रक्रिया नेहमीच मुक्त करणारी असली पाहिजे, टाकणारी नाही. त्यामुळे, जेव्हा आपली मुले जन्माला येतात तेव्हा त्यांना आजूबाजूला बघू द्या, त्यांना निसर्गासोबत आणि स्वतःसोबत वेळ घालवू द्या. प्रेम आणि मदतीचं वातावरण तयार करा. त्यांना वाढू द्या, त्यांची बुद्धिमत्ता वाढू द्या आणि कुटूंब, संपत्ती किंवा इतर कशाशीही बांधल्या गेलेल्या ओळखीऐवजी त्यांना एक मनुष्य म्हणून, स्वत:च्या दृष्टीने, आयुष्याकडे पाहण्यास मदत करा. आयुष्याकडे एक मनुष्य म्हणून बघण्यासाठी त्यांना मदत करणं हे त्यांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे.
तुमचं घर हे तुमच्या संस्कृती, कल्पना आणि नैतिकता तुमच्या मुलांवर लादण्यासाठीची जागा असू नये. त्याऐवजी ते एक मदतीचं वातावरण असलं पाहिजे. जर मुलांना घरी छान मोकळं वाटत असेल तर ते नैसर्गिकपणे बाहेरपेक्षा घरी जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील. आत्ता, त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे ते राहण्यापेक्षा रस्त्यावरच्या कोपऱ्यात जास्त उत्सुक असतील. तर, जर ती अस्वस्थता नसेल तर ते रस्त्याच्या कोपऱ्याला इतकं महत्व देणार नाहीत. याचा अर्थ असा नाही की ते जगाच्या कठोर वास्तविकता त्यांना कळणार नाहीत. मूळ त्या बघितलंच आणि या वास्तविकता तुमच्या मुलांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभावित करतीलच. पण नेहमीच, आपल्या मुलांना स्वतःसाठी विचार करण्यासाठी, काय चांगलं आहे हे बघण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणं हा मुलांच्या योग्य वाढ होण्यासाठी शाश्वत मार्ग आहे.
बहुतेक प्रौढ लोकं असं गृहीतच धरतात की मुलाचा जन्म झाला म्हणजे आता आपण शिक्षक झालं पाहिजे. जेव्हा मूल आपल्या घरात येतं तेव्हा शिक्षक होण्याची नाही; तर शिकण्याची वेळ आली आहे. कारण जर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलाला बघितलं, तर तुमचं मूल जास्त आनंदी आहे, नाही का? हा आनंदाचा पुंजका तुमच्या आयुष्यात येण्यापूर्वी तुम्ही अक्षरशः एका झोम्बीसारखे जगत होतात. आता, नकळत, तुम्ही हसत आहात, गात आहात, मुलासह सोफ्याखाली रेंगाळता आहात. आयुष्य तुमच्यामुळे नाही तर त्यांच्यामुळे घडतंय. तुम्ही तुमच्या मुलाला फक्त एक गोष्ट शिकवू शकता - जे तुम्हाला काही प्रमाणात करावं लागेल - ते म्हणजे की जिवंत कसं राहायचं.पण एका लहान मुलाला स्वतःच्या अनुभवानेच जीवनाविषयी खूप काही माहित असतं. एक प्रौढ व्यक्ती सर्व प्रकारचे दुःख तयार करण्यासाठी सक्षम आहे - कल्पित दुःख. मूल अजून त्याकडे गेलेलं नाही. तर, मुलांनी तुमच्याकडून नाही, तर तुम्ही मुलांकडून जीवन शिकायला हवं.