‘यूथ अॅड ट्रुथ- नातं जोडा सत्याशी’ – सत्याबाबतच्या गप्पांगोष्टींची दिल्लीपासून सुरवात!
“यूथ अॅड ट्रुथ” ही सद्गुरूंनी सुरु केलेली अनोखी मोहीम आहे ज्यातून तरुणांच्या मनात अडसर बनून राहिलेल्या अनेक प्रश्नाचं निरसन करून, त्यांना त्यांच्या संपूर्ण सामर्थ्यापर्यंत पोचण्यासाठी, आवश्यक स्पष्टता आणि स्थैर्य आणण्याचा प्रयत्न आहे. “यूथ अॅड ट्रुथ” ची सुरवात दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधे सप्टेंबर 4 रोजी, युवाशक्तीनं भरलेल्या अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाली.
कार्यक्रमापूर्वीची लगबग...
कार्यक्रमासाठीची गडबड सकाळी ६ वाजल्यापासूनच सुरु झाली. ईशा व्हॅालंटीयर्ज आणि कॉलेजचे व्हॅालंटीयर्ज कार्यक्रमस्थळी अतिशय जोमात विवध कामात गुंतलेले दिसले.
कार्यक्रम सुरु व्हायच्या काही तास पूर्वी, जमलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर उत्साह, अपेक्षा आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. व्हॅालंटीयर्ज मात्र एक उत्सवाचं वातावरण निर्माण करण्यात आणि आलेल्या विद्यार्थ्यांचं आनंदानं स्वागत करण्यात रममाण होते.
कार्यक्रम सुरु व्हायची वेळ जवळ येताच, हॅालच्या आतली कुजबुज हळूहळू वाढू लागली. विद्यार्थी आत प्रवेश करून आपली जागा शोधण्यात गुंतलेले असताना, अचानक कुठूनतरी ‘साउंड्सऑफ ईशा’च्या सुमधुर वाद्यवृंदाचे स्वर कानावर पडले. मनाला अगदी सहज प्रफुल्लीत करणाऱ्या या संगीताच्या तालावर हॅालमधे अनेक ठिकाणी विद्यार्थी नाचताना दिसू लागले. काही क्षणातच हॅालमधे जणू एखाद्या रॉककॉन्सर्टचे वातावरण पसरू लागले.
आणि सद्गुरूंचे आगमन झाले..!
सद्गुरू हॅालमधे प्रवेश करताच, पूर्ण वातावरण बदलून गेले. “ज्या क्षणी सद्गुरूंनी हॅालमधे पाऊल ठेवले, पूर्ण हॅालमधे अचानकपणे एक नवी उर्जा संचारली”, या शब्दात आर.जे. रौनकनं त्या अनुभवाचं वर्णन केलं.
टाळ्या आणि ‘यूथ अॅड ट्रुथ’, ‘यूथ अॅड ट्रुथ’ च्या घोषात दिल्लीच्या तरुणाईनं त्यांच्या आयुष्यात आलेल्या या आशेच्या किरणाचे, ‘सद्गुरूंचे’, स्वागत केले.
आणि त्याच वेळेस, मोहित चौहाननं ‘साउंड्स ऑफ ईशा’ समवेत आधीच रोमहर्षित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संगीताच्या जादूनं एका वेगळ्याच संगीतविश्वाची सफर करवली. ही सर्व केवळ यापुढे येणाऱ्या एका अविस्मरणीय अनुभवाची नांदी होती.
आणि सत्याचा शोध सुरु झाला...
यापुढे सुरु झाल्या अगदी निराळ्या गप्पागोष्टी – ‘सत्या’चा शोधा घेणाऱ्या. एका प्रश्न-उत्तराच्या सत्राची सुरुवात व्यासपीठावर असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारून केली. स्वतःच्या आयुष्याचे अनेक प्रश्न मनात घर करून असतानाही, सद्गुरूंबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल कुतुहूल अनावर होताच, सद्गुरूंच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलही अनेक प्रश्न विचारले गेले. “सद्गुरू तुम्ही नेहेमी खुर्चीवर एक पाय दुमडून का बसता?”, “तुमचा लोक इतका आदर आणि सन्मान करतात; तुमच्यामधे स्वतःबद्दल ‘सुपेरिओरिटी कॅाम्प्लेक्स’ (वर्चस्वाची भावना) निर्माण होत नाही का?” “तुम्ही कॉलेजमधे असताना तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आणि तुमच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये कधी संघर्ष जाणवला का?”
जसा कार्यक्रम रंगू लागला तसे अनेक विचार करायला भाग पडणारे प्रश्न समोर येऊ लागले. “मत्सराची भावना, प्रेरणेचं कारण बनू शकते का?”, “रामानुजन सारखं होण्यासाठी शरीर आणि मन कश्याप्रकारे घडवावं?” आणि असे अनेक प्रश्न उत्तरासाठी आसुसलेल्या डोळ्यांनी विद्यार्थी विचारत होते. सद्गुरू त्यांच्या अनोख्या शैलीत थट्टामस्करी करत उत्तर देताना, तरुण प्रक्षकवर्गातून हशा आणि वाहवा मिळवत होते.
मात्र, त्यांनी ‘सत्य’,हे त्यावर कुठलाही लेप न चढवता, ते आहे त्या स्वरुपात सर्वांपुढे उलगडून मांडण्याची संधी चुकवली नाही. आजकालच्या सोशियल मिडियाच्या शैलीची सवय असलेल्यांसाठी हे नवीन होतं. ‘एक गाढवसुद्धा, त्याच्या शेपटीला आग लागल्यावर घोड्याहून अधिक जोरात धावतं.’ किंवा ‘सर्कशीत ट्रेन केलेलं माकड होऊ नका, कारण एक न एक दिवस, तुम्ही मारणार आहात.’ – असे उद्गार ऐकताना प्रक्षकांमधे समज आणि शांत आत्मपरीक्षणाचा भाव उदयाला येताना जाणवला.
सद्गुरूंचे दिल्लीच्या यूथ अॅड ट्रुथ कार्यक्रमातले काही अमुल्य उद्गार
“हे पहा ही इतकी साधी गोष्ट आहे – आम्ही प्रक्रीयेला समर्पित आहोत. आम्हाला फळ मिळेल का नाही याची चिंता नाहीये. आम्ही पूर्णपणे प्रक्रियेला समर्पित आहोत.”
“ ‘कंटेंटमेंट’ (समाधान) हा शब्द ‘कंटेनमेंट’ (सामावणे) या शब्दाशी निगडीत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन एखाद्या साच्यात सामावणं हाच उपाय आहे, याचा अर्थ एवढाच की तुम्ही जीवनाला अतिशय घाबरलेले आहात.
“जीवनाचा उत्कट अनुभव मिळवण्यासाठी तुम्हाला नशेत धुंद असायची गरज नाही. जीवन अनुभवण्यासाठी तुम्हाला रोज संध्याकाळी पार्टी करायची गरज नाही. तुम्हाला जीवन खरंच अनुभवायचं असेल, तर तुम्हाला ही मानवी यंत्रणा तिच्या संवेदनशीलतेच्या उच्चतम पातळीपर्यंत घेऊन जायला हवी.”
“यश तेव्हाच मिळतं, जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करता. फक्त इच्छा करून ते मिळणार नाही. जे या क्षणी योग्य गोष्टी करतील, त्यांच्याच आयुष्यात ते घडून येईल.
“जे लोक जीवनात फक्त ५० टक्के वेळा बरोबर असतात, त्यांच्यासाठी केवळ दोनच व्ययसाय उरतात. एक म्हणजे हवामानाचा अंदाज करणं किंवा लोकांचं भविष्य सांगणं. इतर कुठल्या कामात हे मान्य नाही.”
“उद्याचा दिवस निर्माण करावा लागतो, आत्ताच त्याला ठराविक साच्यात बसवता येत नाही.”
योग विज्ञान, जीवन आणि योगासनांबद्दल सखोलतेनं बोलून, सद्गुरू विद्यार्थ्यांना विचारमंथनासाठी पुष्कळ काही सोडून गेले. आदियोगीच्या उभारलेल्या भव्य प्रतिमेबाबत विचारलं असता, त्यांनी अस्तित्वातल्या भूमितीच्या अचूकतेबद्दल आणि प्रभावाबद्दल विवेचन केले. “विश्वविद्यापीठ की विश्व” (युनिव्हर्सिटी की युनिव्हर्स) असं प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात निर्माण करून, त्यांना विद्यार्थ्यांची रजा घेतली.
दोन तासांचा कार्यक्रम तीन तासांहून अधिक चालला आणि तरी विद्यार्थ्यांना तो संपवा असं वाटत नव्हतं. सत्य शोधण्याची भूक पोटातल्या भुकेच्या वरचढ ठरली आणि जेवणाची वेळ टळून दुपारचे २ वाजून गेले.
निरोप घेता घेता..
सद्गुरू कॉलेजच्या आवाराच्या बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांनी पुन्हा त्यांना घेरलं. त्या गर्दीतही सद्गुरूंनी फ्रिस्बी खेळून सर्वांना चकित केलं. जिवंतपणाचा वयाशी काही संबंध नाही हे अनोख्या रीतीनं दाखवत, त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट बदल दिसत होता. सकाळी संकोचित दिसणाऱ्या चेहऱ्यांवर आता एक निराळीच प्रसन्नता झळकत होती. अगदी खुल्या दिलानं आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबद्दल बोलत, हा कार्यक्रम यापूर्वीच का नाही घडला असा प्रश्न त्यांनी केला.
‘सद्गुरूंबरोबर 'सत्याविषयी केलेल्या गप्पां’बाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
“ही फारच छान गोष्ट आहे की सद्गुरूंनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहिम सुरु केली आहे. आम्हा सर्वांसाठी ही एक मोठ्या सन्मानाची बाब आहे की त्यांनी एस.आर.सी.सी पासून याची सुरवात केली”
“आजच्या स्पर्धेच्या जगात, योग्य मार्गदर्शन मिळणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि तेही इतक्या मोठ्या आणि प्रतिभावंत व्यक्तीकडून मिळणं ही आमच्या सर्वांसाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. नक्कीच कितीतरी अनुत्तरीत प्रश्नाचं आज निरसन झालं.
“हा कार्यक्रम होणं ही अगदी काळाची गरज होती. मी माझा तास बुडूवून कार्यक्रमात भाग घेतला. घरी गेल्यावर मी माझ्या मित्रांना फोन करून सांगणार आहे मी सद्गुरूंना बघितलं आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व अद्भुत गोष्टींबद्दल सांगणार आहे.”
“मी सद्गुरूंना अनेक वेळा ऐकलंय. पण लाइव्ह ऐकण्याचा अनुभव निराळाच होता. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची उपस्थिती इतकी पॅाझिटिव्ह आणि उर्जावान होती. त्यांच्या उपस्थितीत असण्याचा अनुभव मी शब्दात सांगूच शकणार नाही.”
“सद्गुरूंनी दिलेल्या उत्तरातून अगदी रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक परिस्थितींना योग्य प्रकारे सामोरं जाण्याची दृष्टी आम्हाला मिळाली.”
Youth AND Truth in the Media
Businessworld, the business news website, featured an article on the September 4 Youth AND Truth event at SRCC.
Sadhguru At SRCC, Delhi – Celebrating Youth & Truth
‘यूथ अॅड ट्रुथ’ ही महिनाभर चालणारी मोहीम आहे ज्यात सद्गुरू, तरुणांमधे प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी लागणारी आवश्यक समज आणि स्पष्टता निर्माण करण्यासाठी, देशातल्या निरनिराळ्या शिक्षण संस्थांना भेट देऊ, त्यांच्याशी संवाद साधतील.
संपादकीय टीप : सोशियल मिडियावरच्या प्रश्नांना सद्गुरूंनी दिलेली उत्तरं आणि विद्यार्थ्यांबरोबरचे आणि सेलिब्रिटीजबरोबरचे सद्गुरूंचे कार्यक्रम आमच्या सोशियल मिडिया चॅनल वर पहा –Sadhguru, Sadhguru Marathi, Sadhguru Hindi - फेसबुक, युट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर.
कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर