जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी सद्गुरुंना ताणतणावाबद्दल विचारले, त्यांनी तणाव व्यवस्थापनच पूर्णपणे फेटाळून टाकले!

शेखर कपूर: अशी कोणती व्याख्या आहे का ज्याला आपण तणावाची संकल्पना असं म्हणू शकतो?

सद्गुरु: मी जेंव्हा बर्‍याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो, तेंव्हा जिथेही मी जात असे, तेथे सर्वजण “तणाव व्यवस्थापना” बद्दल बोलत होते. मला हे खरोखर कळले नाही कारण माझ्या समजण्यानुसार आपण आपल्यासाठी असलेल्या मौल्यवान वस्तू - आपला व्यवसाय, कुटुंब, संपत्ती आणि मुलं यांचं व्यवस्थापन करतो. कोणी तणावाचं व्यवस्थापन का करेल? मला हे समजण्यासाठी थोडा वेळ लागला कि लोकांनी असा निष्कर्ष काढला आहे कि ताणतणाव हा त्यांच्या आयुष्याचाच भाग आहे.

तुमचा ताणतणाव नाही, तर स्वतःला व्यवस्थित करा

ताणतणाव हा तुमच्या आयुष्याचा एक भाग नाही. तुमची स्वतःची प्रणाली व्यवस्थापित करण्याची अक्षमता म्हणजे तणाव आहे. तुमच्या कामाच्या स्वरूपामुळे तणाव होत नाही. कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी ताणतणावाची तक्रार करत आहेत, शिपाई देखील तणावाची तक्रार करत आहे आणि या दरम्यान असलेल्या, प्रत्येक इतर व्यक्ती आपले काम तणावग्रस्त असल्याचे सांगत आहेत. जे बेरोजगार आहेत त्यांनाही आपली परिस्थिती तणावग्रस्त वाटते. तुम्हाला असे वाटते कि तुम्हाला तुमच्या नोकरीचा त्रास होत आहे. पण मी जर तुम्हाला नोकरीवरून काढायला लावले, तर तुम्ही आनंदी व्हाल का? नाही. अर्थातच ताणतणाव हा तुमच्या नोकरीमुळे होत नाही आहे. हे फक्त असे आहे कि तुम्हाला तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा कसे व्यवस्थापित करावे हे माहित नाही.

तुम्ही अपघाताने कार्य करीत आहात, म्हणून सर्वकाही तणावपूर्ण आहे. जर तुम्ही अशा एका गाडीमध्ये बसलात जिचं स्टिअरिंग व्हील जर एका दिशेने वळवलं तर गाडी विरुद्ध दिशेने जाते, नैसर्गिकरित्या तुमच्यावर तणाव येईल. आत्ता, तुम्ही अशा प्रकारचीच यंत्रणा चालवत आहात. तिच्या बद्दल काहीही न समजता केवळ योगायोगाने तुम्ही आयुष्य घालवण्याची घोडचूक करत आहात. त्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होता. ताण तुम्ही करत असलेल्या कार्याच्या स्वरूपामुळे किंवा जीवनातील परिस्थितीमुळे होत नाही. ताणतणाव हा फक्त तुमच्या स्वतःच्या प्रणालीचे व्यवस्थापन कसे करावे हे माहित नसल्यामुळे होत आहे.

तुमच्या जीवनाचा संदर्भ बदलणे

मूलभूतपणे, आपल्या जीवनाच्या गुणवत्तेचे परिवर्तन हे आपल्या जीवनाच्या आशय बदलामुळे होत नाही, परंतु केवळ आपल्या जीवनाचा संदर्भ बदलामुळे होते. जर कोणी सुंदर जीवन जगत असेल तर याचा अर्थ असा नाही की तो काहीतरी वेगळं करत आहे. जेंव्हा तो सकाळी उठतो, तेंव्हा तो ही शौचालयात जातो, त्याचे दात घासतो, आणि सारख्याच गोष्टी करतो. पण कसंही, जगण्याच्या संदर्भामुळे त्याचे जीवन जादुई आणि सुंदर झाले आहे.

आपल्याला सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट करण्याची गरज आहे ती म्हणजे मनुष्याला शांत आणि आनंदी बनवणे. तुम्ही जर योग्य प्रकारचा योग केल्यास हे नेहमीच घडेल.

हे एखाद्याच्या प्रेमात पडल्यावर लोकांच्या बाबतीत घडू शकले असेल. ते प्रेमात पडतात आणि सर्वकाही आगळंवेगळं होतं कारण त्यांच्या जीवनाचा संदर्भ बदलेला असतो. पण मग एकदा का ते प्रेमातून बाहेर पडले, कि पुन्हा त्यांच्या आयुष्याचा संदर्भ बदलतो आणि ते दयनीय बनतात. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनाचा आशय बदलणे शक्य होणार नाही कारण त्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या परिस्थितींमध्ये आहात त्यांची परवानगी घ्यावी लागेल, पण संदर्भ बदलणे हि अशी गोष्ट आहे जी तुम्ही स्वेच्छेने करू शकता. तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. हे अजिबात परिस्थितीजन्य नाही.

एके दिवशी, तीन माणसे एका ठिकाणी काम करत होते. तिथे एक दुसरा माणूस आला आणि त्याने पहिल्या माणसाला विचारले, "तू इथे काय करीत आहेस?"

त्या माणसाने वर पहिले आणि म्हणाला, "तू आंधळा आहेस का? तुला दिसत नाही मी दगड फोडत आहे ते?

ही व्यक्ती पुढच्या माणसाकडे गेली आणि विचारले, "तू इथे काय करीत आहेस?"

त्या माणसाने वर पाहिले आणि म्हणाला, "माझं पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागतं, म्हणून मी इथे आलो आहे आणि त्यांनी मला जे काही करायला सांगितले ते करतो आहे. मला फक्त माझं पोट भरायचं आहे, एवढंच."

तो तिसऱ्या माणसाकडे गेला आणि त्याने विचारले, "तू इथे काय करीत आहेस?"

तो माणूस मोठ्या आनंदाने उभा राहिला आणि म्हणाला, “मी येथे एक सुंदर मंदिर बांधत आहे!”

ते सर्व जण एकसारखेच काम करत होते, परंतु ते जे काही करत होते त्यांच्या अनुभवांमध्ये जगाएवढे अंतर होते. प्रत्येक मनुष्य, त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, ते जे काही करत आहेत ते या तीन संदर्भांपैकी एखाद्यामध्ये काम करू शकतात - आणि हेच एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता ठरवते, प्रत्यक्षात ती व्यक्ती काय काम करते याने नाही. एखादे कार्य किती सोपे किंवा गुंतागुंतीचे आहे याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता बदलत नाही. तुम्ही ते कोणत्या संदर्भाने करता याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता बदलते.

तुम्ही जर तुमच्या आयुष्यातील विविध परिस्थितींना हाताळण्याच्या तुमच्या क्षमतेकडे लक्ष दिलंत, तर ती तुम्ही जेंव्हा खूप आनंदी असता तेंव्हा चांगली असते कि तुम्ही दुःखी असताना? जेंव्हा तुम्ही आनंदित असता तेंव्हा तुम्ही खूप काही गोष्टी घेऊन त्या करण्यासाठी तयार असता. जेंव्हा तुम्ही तणावात असता, तेंव्हा तुम्हाला अगदी सोप्या गोष्टीही करण्याची इच्छा नसते. हे तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चालना प्रस्थापित करते. आपल्याला सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट करण्याची गरज आहे ती म्हणजे मनुष्याला शांत आणि आनंदी बनवणे. तुम्ही जर योग्य प्रकारचा योग केल्यास हे नेहमीच घडेल. कारण योग एक व्यक्तिनिष्ठ विज्ञान आहे, जर ते योग्य प्रकारे प्रदान केले तर ते एका चमत्काराप्रमाणे कार्य करेल आणि हे घडवून आणेल.