गुरु पौर्णिमेच्या सदगुरुंच्या कविता | Guru Purnima Marathi Kavita

गुरु पौर्णिमे निमित्त सदगुरुंच्या कविता आम्ही येथे प्रस्तुत करत आहोत. सदगुरुंच्या साधक अवस्थेतील त्यांचा आपला अनुभव आणि त्यांच्यावर गुरुकृपा झाली त्याक्षणीचा अनुभव ह्या कवितांमधून ओतप्रोत झालेला आहे याची प्रचीती वाचकांना येईल.
Three Guru Purnima Poems From Sadhguru
 

27 जुलै रोजी, सदगुरूसमवेत, आदियोगीच्या सानिध्यात गुरुपौर्णिमा साजरी करा.  व्यक्तीशः ईशा योगा सेंटर मध्ये उपस्थित राहून किंवा लाईव्ह वेबस्ट्रीम पाहू शकता.

 

Register For Free LiveStream

Read in Hindi: Guru Purnima Poems

Guru Purnima Marathi Kavita

Sadhguru's Poem "Guru Purnima"

गुरु पौर्णिमा

सत्याच्या शोधात मी दोन्ही मार्ग धुंडाळले 
काही पूजनीय मानले जाणारे तर काही विचित्र

पण कृपावंत गुरू आले आणि
त्यांनी माझ्या ज्ञानाच्या प्रवाहाला दिशा दिली

तृतीय नेत्राच्या पवित्र स्थानी
त्यांनी त्यांची काठी टेकवली 
आणि मला वेड लावून गेले 

या वेडेपणावर काहीच इलाज नाही
पण निखालस हीच मुक्ती आहे...

जेव्हा मी पाहिलं की 
भयानक रोगसुद्धा 
विनासायास पसरतात 

तेव्हा मनुष्यप्राण्याला वेड लावायची
मोकळीक घेऊन मी कामाला लागलो

.

सप्रेम आशीर्वाद

 

Sadhguru's Poem "My Master"

माझे गुरु

हरलो! हात टेकलेले मी
जीवन आणि मृत्यूच्या खेळापुढे 

दोन्ही खेळ खेळलो मी 
पण ढिम्म हललो नाही..

आणि अचानक एक माणूस
माझ्यापाशी येतो, 
तो काठी टेकत चालणारा
मी नवयुवकासारखा सुदृढ

सगळं पाहून चुकलेलो  मी
जन्म - मृत्यू आणि 
जे जे म्हणून जीवन बहाल करतं, ते सगळं काही ..

तरी सुन्न बसून होतो..

तेव्हा हा काठीवाला माझ्यापाशी आला
अन् त्याची विद्युत्पाती काठी
माझ्या कपाळावर टेकवून गेला.

सप्रेम आशीर्वाद

Editor’s Note: On July 27, celebrate Guru Purnima With Sadhguru, in the Presence of Adiyogi. Join in person at the Isha Yoga Center or watch the free live webstream.

Register For Free LiveStream

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1