आपलं नशीब आपण स्वत:च्या हातात घेऊ शकतो का? तसं करता येत असेल तर त्याचा मार्ग काय? या आणि अशा बर्‍याच प्रश्नांचा सद्गुरू इथे आढावा घेतात.

सद्‌गुरु : प्रत्येक व्यक्तिसाठी - मग ती कोणी का असेना - त्याचं जीवन महत्वाच आहे. त्याचं जीवन जर महत्वाचं आहे तर अर्थातच त्याची सुख-समृद्धी सुद्धा त्याच्यासाठी महत्वाची असणारच. लोक आपल्या आयुष्याचा खूप सारा वेळ सुख-समृद्धी साधण्यामध्ये गुंतवतात. तुम्हाला असं दिसून येईल की काही लोक इंजीनियर बनून आपली उपजीविका कामावण्यासाठी आयुष्याचे २५ वर्ष गुंतवतात. ते आपलं कुटुंब घडवण्यामद्धे आपल्या अर्ध्या आयुष्याची गुंतवणूक करतात. पण आपल्या आंतरिक सुख-समृद्धीसाठी ते कितीसा वेळ देतात?

आजकाल सर्वजण बाह्य परिस्थिती सुधारण्यात आणि तिचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत. बाह्य परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही सुधारणा केली तरी तुम्ही ती १००% परिपूर्ण कधीच बनवू शकत नाही. तसं कोणीच करू शकत नाही. आजच्या जगातले अनेक साधन-संपन्न देश या गोष्टीचं जीवंत उदाहरण आहेत. त्यांनी बाह्य परिस्थितिल पुरेसं सुधारलं पण तिथल्या लोकांची अवस्था जरा बघा! अमेरिकेच उदाहरण बघितलं तर लक्षात येईल की बाह्य परिस्थिति इतकी संपन्न असूनही तिथल्या खूप सार्‍या लोकांना डिप्रेशनवर औषध घ्यावं लागतंय. रोजचं जीवन साध्या समजूतदारिनं जगण्यासाठी सुद्धा त्यांना रोज औषध घ्यावं लागतं. याला सुख-समृद्धी म्हणता येणार नाही.

तुमच्यापैकी जे लोक यशस्वी आहेत – कमीत कमी तुमच्या ऐहिक जीवनात – त्यांना ही एक गोष्ट लक्षात आलीच असेल की जोवर तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोवर तुम्हाला यश मिळत नाही. अजूनही तुम्हाला असं वाटतं का, की आपण मूर्खा सारखं वागू आणि मग थोडी प्रार्थना वगैरे करून सगळं ठीक होऊन जाईल? नाही!! तुम्हाला माहितीये की बाह्य जगात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य गोष्टीचं कराव्या लागतील, नाहीतर यश मिळणार नाही. मग आंतरिक जगासाठी ते लागू पडणार नाही असं तुम्हाला का वाटावं?

आंतरिक गोष्टींच्या बाबतीत देखील जोवर तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोवर तुम्हाला यश मिळणार नाही. बाह्य जगात सुख-समुद्धी निर्माण करण्यासाठी जसं एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसंच एक मोठ विज्ञान आणि तंत्रज्ञान – योग विज्ञान – आंतरिक सुख समृद्धी निर्माण करण्यासाठी सुद्धा आहे आणि त्यातोगेच तुम्ही तुमच्या नशिबाचे मालक बानु शकता.

कुठलीच गोष्ट पूर्वनियोजित नाही

कुठलीही गोष्ट पूर्वनियोजित नाही, अगदी मृत्यू सुद्धा! प्रत्येक गोष्ट तुम्हीच निर्माण केलेली आहे. पण त्यातल्या बहुतांश गोष्टी तुम्ही अजाणतेपणी निर्माण केल्या, हीच खरी समस्या आहे; आणि म्हणून तुमच्यावर बाहेरून कुठूनतरी त्या लादल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतं. तुम्ही जर एखादी गोष्ट अजाणतेपणी निर्माण करू शकत असाल तर तीच गोष्ट तुम्ही सजगपणे सुद्धा निर्माण करू शकालच. सर्व योग-प्रक्रियांचा मूळ उद्देश हाच आहे की अजाणतेपणी जीवन निर्माण करून ते धडपडत जगण्या ऐवजी तुम्ही तुमचं जीवन सजगपणे घडवावं.

एकदाका त्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न सुरू झाले की तुम्हाला दिसून येईल की तुमचं जीवन पूर्वनियोजित नं राहता ते अधिकाधिक स्व-नियोजित व्हायला लागेल. तुमच्या भौतिक शरीरावर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवनावर आणि तुमच्या नशिबावर तुमचं १५-२०% प्रभुत्व असेल. तुमच्या मनावर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवनावर आणि तुमच्या नशिबावर तुमचं ५०-६०% प्रभुत्व असेल. तुमच्या जीवन उर्जेवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवन आणि तुमचं नशिब १००% तुमच्याच हातात असतील; अगदी इथवर की तुम्ही तुमच्या मृत्युचा क्षण सुद्धा निश्चित करू शकाल – कुठं आणि केव्हा मृत्यू येईल हे सुद्धा ठरवू शकाल. अर्थातच मी आत्महत्ये बद्दल बोलत नाहीये. कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कसा घ्यायचा याची सुद्धा निवड तुम्ही करू शकता – तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण स्व-नियोजित करता येऊ शकतो.