सद्गगुरु: ज्या व्यक्ती नशिबावर अवलंबून राहतात, ते नेहेमीच ग्रह, तारे, जागा, भाग्यशाली जोडे, भाग्यशाली साबण, भाग्यशाली आकडे - अशा सर्व प्रकारच्या गोष्टींवर अवलंबून असतात. नशीब शोधण्याच्या आणि गोष्टी आपोआप घडण्याच्या या प्रक्रियेत, ते सहजगत्या करू शकत असलेल्या कित्येक गोष्टी गमावून बसतात. आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत, केवळ तुम्ही स्वतःच ती गोष्ट घडवून आणली पाहिजे. तुमची मनःशांती आणि तुमच्या मनातील खळबळ ह्याला केवळ तुम्हीच जबाबदार आहात. तुमचा विवेक, तुमची विवेकशून्यता यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. तुमचे सुख आणि दूखः हा तुमचाच व्यवहार आहे. तुमच्यामधील देव आणि दैत्य ही तुमचीच करणी आहे.

थोड्याफार गोष्टी योगायोगाने घडतील. पण तुम्ही जर अशा योगायोगाची वाट पाहत बसलात, तर चांगल्या गोष्टी केवळ तुमच्या थडग्यातच घडतील, कारण अशा गोष्टी त्यांच्या कालानुरूप घडतात.

तुमच्यामधील शक्तींना सर्वोच्च क्षमतेनीशी व्यक्त होऊ देण्या ऐवजी, आपल्या सभोवताली योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक ते अंतरबाह्य  योग्य वातावरण निर्मिती करण्याऐवजी, दुर्दैवाने आपण नेहेमीच असे घडण्यासाठी इतर भलत्याच गोष्टींवर अवलंबून राहतो. 

आज सकाळ पासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय अनुभवलंत, हे निश्चितपणे तुमचं  आहे.  तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांसोबतची तुमची देवाणघेवाण किती संघर्षमय होती, हे केवळ तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या व्यक्ती, त्यांच्या मर्यादा आणि संभावना आणि प्रसंगाप्रती किती असंवेदनशील होता यावर अवलंबून आहे. तुम्ही कोणता भाग्यशाली मौल्यवान खडा वापरत आहात यावर ते अवलंबून नाहीये.  तुमच्या सभोवतालच्या जीव सृष्टीप्रती तुम्ही किती समजुतीने, शहाणपणाने, आणि सजग होऊन वावरता यावर ते अवलंबून आहे.

जर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतील आणि ते तसे का होते आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर मी म्हणेन की तुम्ही शिळे अन्न खात आहात.

एके दिवशी, दोन माणसे विमानतळावर भेटली. एक माणूस खूपच निराश दिसत होता. म्हणून मग दुसर्‍या माणसाने विचारले, “तुम्ही असे का दिसत आहात? तुम्हाला काय झालं आहे?”

पहिला माणूस म्हणाला, “काय सांगू मी तुम्हाला? माझी पहिली पत्नी कर्करोगाने मरण पावली. माझी दुसरी पत्नी शेजार्‍याबरोबर पळून गेली. माझा मुलगा तुरुंगात आहे, कारण त्याने माझा खून करायचा प्रयत्न केला. माझी चौदा वर्षाची मुलगी गर्भवती आहे. माझ्या घरावर वीज कोसळली. आज शेअर बाजारात माझे सर्व शेअर कोसळले, आणि माझ्या वैद्यकीय अहवालनुसार माला एड्स झालेला आहे.

दूसरा माणूस म्हणाला, “अरे वा! किती दुर्दैव आहे तुमचे! असो, पण तुम्ही करता तरी काय? तुमचा व्यवसाय काय आहे?”

त्या माणसाने उत्तर दिले, “मी भाग्यवान खडे विकतो.”

मुद्दा केवळ हा आहे, की तुम्ही एक विशिष्ठ अवस्थेत असलात, तर काही विशिष्ट गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही जर दुसर्‍या कोणत्या अवस्थेत असाल, तर काही इतर गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. जर एखादे फुलांनी बहरलेली झाडी असेल, आणि शेजारी एक कोरडे, काटेरी झुडुप असेल, तर सर्व मधमाश्या फुलांनी बहरलेल्या झाडकडेच आकर्षित होतील. फुलांनी बहरलेले झाड काही भाग्यवान नाहीये, इतकेच की त्याच्याकडे सुगंध आहे – जो कदाचित तुम्ही पाहू शकत नसाल – आणि तोच सुगंध सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करत आहे. लोकं काटेरी झुडूपापासून दूर जातात, कारण ती एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण करतात. कदाचित दोघांनाही ते काय निर्माण करीत आहेत याची जाणीव नसेल पण गोष्टी मात्र जशा घडायला पाहिजेत, तशाच घडत आहेत.

म्हणून जर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतील आणि ते तसे का होते आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर मी म्हणेन की तुम्ही शिळे अन्न खात आहात. तुम्ही तुमचे अन्न इतर कुठेतरी शिजवले होते – कदाचित खूप काळ आधी – आणि अजूनही तुम्ही तेच अन्न खात आहात. पण ते शिळे झाले आहे आणि दिवसेंदिवस शिळे होत जात आहे. परंतु, जर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतील आणि ते तसे का होते आहे हे तुम्हाला जर माहित असेल, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे अन्न जागरूकपणे आजच शिजवले आहे. जर तुमच्या बाबतीत फारच वाईट गोष्टी घडत असतील, आणि ते तसे का होते आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल, तर पुन्हा एकदा तुम्ही शिळे अन्न खात आहात, जे आता सडलेले आहे.

 

अदृष्टम – जेंव्हा तुम्ही पाहू शकत नाही

भारतीय स्थानिक भाषांमध्ये, सुदैवी असणे याचा अर्थ अदृष्ट किंवा अदृष्टम असा आहे. “दृष्टी” म्हणजे “पाहणे”, अदृष्ट म्हणजे “न पाहिलेले.” तुम्ही तुमची दृष्टी गमवलेली आहे. तुम्ही जर पाहू शकत असाल, तर काही तरी घडते आहे हे तुम्हाला समजेल. जेंव्हा तुम्ही पाहू शकत नाही, तेंव्हा तुम्हाला असे वाटते, की गोष्टी अचानक आणि अपघाताने घडत आहेत. तुम्ही समजता की ते सुदैव अथवा दुर्दैव आहे. ह्या संदर्भात, नशीबवान या शब्दासाठी हा सर्वात योग्य शब्द आहे.

आध्यात्मिक बनणे म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य 100% तुमच्या हातात घेणे.

आध्यात्मिक बनणे म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य 100% तुमच्या हातात घेणे. फक्त जेंव्हा तुम्ही तुमचे आयुष्य 100% तुमच्या हातात घेता, तेंव्हाच तुम्ही 100% सजग व्यक्ती बनता, आणि तेंव्हाच तुमच्या आयुष्यात दिव्यत्व प्राप्त करायची संधी निर्माण होते.

तुम्ही तुमचे आयुष्य जागरूकपणे घडवायची वेळ आलेली आहे. भाग्य, ग्रह आणि तार्‍यांवर अवलंबून राहू नका. त्या निर्जीव वस्तु आहेत. मनुष्याने निर्जीव वस्तूंचे भाग्य ठरवायला पाहिजे, का निर्जीव वस्तूंनी मनुष्याचे भाग्य ठरवायला पाहिजे? हे कसे असायला हवं? निर्जीव वस्तूंचे काय केले पाहिजे ते मनुष्याने ठरविले पाहिजे. नाही का? पण जर एखादा ग्रह तुमचे भविष्य ठरवत असेल, तर निर्जीव वस्तु तुमचे भाग्य ठरवीत आहेत. 

अशा गोष्टींना तुमच्यावर प्रभाव पाडू देऊ नका कारण एकदा तुम्ही त्यात पडलात, तर तुम्ही एका विशिष्ट चाकोरीत जीवन जगू लागता आणि तुम्ही आयुष्यात तुम्ही काय काय साध्या कराल हे अगदी मर्यादित होऊन बसेल. तुम्ही त्या पुढे जाऊ शकणार नाही. ह्या गोष्टी तुमची प्रगती आणि संभावना बहरू देणार नाहीत.

तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांसोबतची तुमची देवाणघेवाण किती संघर्षमय होती, हे केवळ तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या व्यक्ती, त्यांच्या मर्यादा आणि संभावना आणि प्रसंगाप्रती किती असंवेदनशील होता यावर अवलंबून आहे.

थोड्याफार गोष्टी योगायोगाने घडतील. पण तुम्ही जर अशा योगायोगाची वाट पाहत बसलात, तर चांगल्या गोष्टी केवळ तुमच्या थडग्यातच घडतील, कारण अशा गोष्टी त्यांच्या कालानुरूप घडतात.

जेंव्हा तुम्ही योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींवर जगता, साहजिकच तुम्ही भीती आणि अस्वस्थतेत जगता. जेंव्हा तुम्ही निर्धार आणि कार्य-क्षमतेने जगता, तेंव्हा काही घडते आहे किंवा नाही ह्याने काही फरक पडत नाही. पण तुमच्या बाबतीत जे काय घडते आहे यावर तुमचे फार थोडे फार नियंत्रण असते. हे आयुष्य धिक स्थिर आयुष्य असते.

Editor’s Note: Hatha Yoga, Sadhguru explains, is one doorway to liberation, offering the possibility to transcend compulsiveness and move towards consciousness. Read the article, Project Human : Moving from Compulsiveness to Consciousness