Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
योग हा स्वर्गात जाण्याबद्दल नाहीये. तो तुमच्या आत स्वर्ग निर्माण करण्याबद्दल आहे.
तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा किंवा भविष्याचा त्रास होऊ शकत नाही, कारण ते अस्तित्वातच नाही. तुम्हाला त्रास होत आहे तो तुमच्या स्मृतीचा आणि कल्पनाशक्तीचा.
तुमच्या आतलं जीवन तुमच्या शरीर, मन आणि भावनांची सेवा करण्यासाठी नाहीये. तुमचं शरीर, मन आणि भावना तुमच्या आतल्या जीवनाची सेवा करण्यासाठी आहेत.
केवळ जेव्हा समतोल असतो तेव्हाच जीवन सुंदर असतं.
परिपूर्ण मनुष्य बनणे म्हणजे तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू, प्रत्येक क्षण, अगदी पूर्णपणे जगणे.
ध्यान म्हणजे लक्ष एकाग्र करणंही नाही आणि आराम करणंही नाही. ते एक प्रकारे घरी परण्यासारखं आहे.
सर्व काही आहे तसं बघणं तुम्हाला या जीवनातून सहजपणे जाण्याचं सामर्थ्य देतं.
जर तुमच्या आतली मानवता पूर्ण भरून वाहात असेल, तर तुम्ही आजूबाजूच्या जीवनाला मदतीचा हात द्याल. ही कुठली नैतिकता नाहीये - हा मनुष्य असण्याचा स्वभाव आहे.
जीवन जाणण्याचे एकमेव द्वार म्हणजे तुम्ही स्वतः. ते खुले ठेवा.
मनुष्य म्हणजे कुठलं संसाधन नाही. मनुष्य म्हणजे एक प्रचंड शक्यता आहे. योग्य प्रकारचं पोषण मिळालं तर ते अद्भुत प्रकारे बहरून येतील.
कशाकडेही श्रेष्ठ म्हणून किंवा हीन म्हणून न बघणं, महत्वाचं आहे. सर्व काही आहे तसं पाहणं, हीच खरी दृष्टी आहे.
केवळ तुमच्या भौतिक शरीराला सीमा लागते. तुमच्याबाबतचं बाकी सगळं वैश्विक असू शकतं.