सद्गुरु कर्माच्या अर्थाचे गूढ उलगडून सांगतात, भूतकाळातील कृत्यांची उरलेली स्मृती अशी त्याची व्याख्या ते करतात. आणि हे उलगडून सांगतात की द बिग बँग म्हणजे सृष्टी निर्मितीच्या पहिल्या महास्फोटासहित, या विश्वात घडलेल्या प्रत्येक घटनेच्या अवशेषांचे ठसे मानवी प्रणालीमध्ये उमटलेले आहेत.