Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
आध्यात्मिक प्रक्रियेचा पाया म्हणजे सर्वकाही गृहीत धरायचे बंद करणे: 'मला जे माहित आहे, ते माहित आहे. जे मला माहित नाही, ते माहित नाही.'
आजच्या जगाकडे पाहिल्यास, खोटेपणा जास्त चलनात आहे - सत्य ही एक किरकोळ घटना बनली आहे. आता हे उलट करण्याची वेळ आली आहे.
यश आणि अपयश, आरोग्य आणि अनारोग्य, जीवन आणि मृत्यू या पलीकडे एकमेकांसोबत वचनबद्ध राहणे - हेच तुम्हाला एक कुटुंब बनवते.
जर तुम्ही या जगाला तुमची आवड आणि नावड यामध्ये विभागलं, तर सत्य जाणून घेण्याबाबत तुम्ही असमर्थ ठराल.
परिपूर्ण असण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सतत चांगले होण्यासाठी प्रयत्नशील आहात.
गोड पदार्थांच्या हव्यासाशी लढू नका - जर तुम्ही स्वतःमध्ये गोडवा निर्माण केलात, तर गोड पदार्थांचे आकर्षण संपुष्टात येईल.
प्रकृतीने तुम्हाला वैयक्तिक स्वरूपाची जाणीव दिली आहे, मात्र जीवन हे वैयक्तिकपणे घडत नाही. जीवन हे संपूर्ण स्वरूपात घडत असतं.
एखादी परिस्थिती तेव्हाच तणावपूर्ण बनते , जेव्हा तुम्ही आसक्तीने प्रतिक्रिया देता.
कोणतीही गोष्ट शोधू नका. जीवनाचा अर्थ शोधू नका. देव शोधू नका. केवळ "लक्ष देऊन पाहणे" - एवढेच महत्वाचे आहे.
अंधाराचे उच्चाटन करणे हे प्रकाशाचे स्वरूप आहे.तुमच्या अंतरंगातील प्रकाश वाढो - तुम्हाला आणि तुम्ही स्पर्श करता त्या सर्व गोष्टींना प्रकाशित करण्यासाठी.तुमची दिवाळी चमकदार होऊ दे.प्रेम आणि आशीर्वाद,
जेव्हा तुम्ही खरोखर शरीराच्या आणि मनाच्या मर्यादांपलीकडे स्वतःला अनुभवाल, तेव्हा कोणतेही भय राहणार नाही.
माझा एकमेव हेतू हा आहे की, तुम्ही एका परिपूर्ण जीवन म्हणून फुलून यावं - जीवन हे याबद्दलच आहे.