सदगुरू: जेव्हा आपण म्हणतो की शिव हे एक विनाशक आहेत, तेंव्हा ते जगाच्या विनाशाबद्दल नाही तर ते तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विश्वाच्या विनाशाबद्दल आहे. तुमचे जग मुलभूतपणे भूतकाळातील अनुभव आणि त्याचा प्रभाव यांचा संचय आहे. तुमचे वैयक्तिक विश्व हे भूतकाळापासून बनलेले आहे. जो मेलेला आहे तो म्हणजे भूतकाळ. भूतकाळाचे अस्तित्व हे भ्रमासारखे असते जो तुमच्या विचार प्रक्रियेच्या सहाय्याने तुमच्या वर्तमानात शिरू पाहतो आहे आणि तुमच्या इच्छांमधून तुमच्या भविष्यावर त्याचा प्रभाव पाडतो आहे.

जर तुम्हाला सृष्टीची भव्यता जाणून घेण्याची इच्छा असेल, तर ते, आत्ता या ‘क्षणात’ जे काही आहे त्यातूनच शक्य आहे.

जर विचार अस्तित्वात नसता तर भूतकाळ वर्तमानात अस्तित्वात राहिला नसता. विचार हा एक भ्रम आहे आणि इच्छा त्याहून दुप्पट भ्रम आहे, कारण इच्छा ही सतत तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यात लोटू पाहते. जे काही तुम्हाला भूतकाळात माहित असते, त्यानुसार तुम्हाला त्याहूनही जरा अधिक चांगले असे काहीतरी हवे असते. जर तुम्हाला सृष्टीची भव्यता जाणून घेण्याची इच्छा असेल, तर ते आत्ता ह्या क्षणात जे काही आहे, त्याद्वारेच शक्य आहे. हाच एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही तुमच्या भूतकाळाचा प्रभाव तुमच्यावर पडू दिला, तर मग तुम्ही भ्रामक कल्पनांमध्ये हरवून जाल. जर तुम्ही, जे अस्तित्वातच नाहिये त्याच्या सहाय्याने आणखीन एक भविष्याचा भ्रम निर्माण केलात, तर मग आता हा भ्रम एवढा परिपूर्ण वाटेल की तुमच्या जीवनाच्या अनुभवातून वास्तविकताच पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल.

ज्याप्रमाणे संपूर्ण निश्चलतेत, भूतकाळाचा अभाव असतो, त्याचप्रमाणे परिपूर्ण क्रियाशीलतेतसुद्धा भूतकाळाचा अभाव असतो. हेच ते दोन शिवाने शोधलेले अत्यंत महत्वाचे मार्ग आहेत, ज्याद्वारे ही सृष्टी आणि सृष्टीचा स्रोत, दोघांनाही अनुभवणे शक्य आहे. म्हणूनच शिवाला नेहेमी एकतर बेफाम नर्तक किंवा एक उग्र तपस्वी जो की अगदी निश्चल आहे असे चित्रित केले जाते.

शिवाचे सतीशी लग्न लावण्यामागचे षडयंत्र

योग परंपरेत, अशी कथा आहे की शिव हे निश्चलतेतून नृत्यात आणि नृत्यातून निश्चलतेत जात असत. इतर सर्वजण, गंधर्व, यक्ष, तिन्ही जगातील देव, मनमोहित होऊन कुतूहलाने शिवाला पाहू लागले. शिवच्या परिपूर्ण क्रियाशीलता आणि संपूर्ण निश्चलता पाहून ते मंत्रमुग्ध झाले होते, पण त्यांना शिव जे अनुभवत होते त्याच्या स्वरूपाविषयी काहीच कल्पना नव्हती. त्यांनासुद्धा ते अनुभवायचे होते.

शिव जे काही अनुभवत होते, त्यांना सुद्धा ते अनुभवता यावे म्हणून ते योजना आणि कटकारस्थान रचु लागले.

त्यांच्या कुतहलाचे परिवर्तन रुची मध्ये झाले. या आवडीमुळे ते त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले पण ते त्यांच्या नृत्याची किंवा निश्चलतेची तीव्रता ते झेलू शकले नाहीत.

ज्या काही अनुभवातून शिव जात होते, ते अनुभवण्यासाठी ते योजना आखू लागले. त्यांनी एक सभा बोलावली जे हळूहळू एका षडयंत्रात बदललं. त्यांनी ठरवले कसे ही करून शिवाचे लग्न लावायचे. असे कोणी तरी आपल्या बाजूने असायला हवे जो आपल्याला सांगू शकेल शिवाच्या या चैतन्याचा आणि बेभान धुंदावास्थेचा आणि त्याचवेळी अशा मृत्यूसारख्या निश्चलतेच आधार काय आहे. शिव या दोन्ही गोष्टींचा मौज लुटतायत असे दिसते. आपल्यातलं कोणी तरी तिथे असायलाच हवं.

या दरम्यान भरपूर गोष्टी घडल्या - मी या षडयंत्राच्या संपूर्ण तपशीलात मी जाणार नाही, कारण तो एक खूप मोठा कट आहे. जर तुम्हाला शिवाच्या आत घडणारं सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मोठ्या षडयंत्राची गरज आहे, अशी योजना त्यांनी आखली आणि कट रचला आणि तो अंमलात सुद्धा आणला. तर त्यांनी शिवाचे लग्न सतीशी लावले. शिवानं समंती सुद्धा दिली आणि ते पूर्णपणे तिच्यात समरस झाले आणि तिच्याबद्दल त्यांना अतिशय उत्कटता निर्माण झाली.

सतीचे वडील शिवाचा अपमान करतात

शिवानं सतीला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनवले. पण सतीचे वडील दक्ष हे शिवाचा - जे की त्यांचे जावई होते - त्यांचा अत्यंत द्वेष करत होते कारण शिव हे कोणी राजे नव्हते, ते धड चांगला वेश सुद्धा धारण करत नसत, शरीरभर राख फसलेली, ते मृत मानवी कवटीतून खात असत, त्यांचे सर्व मित्र हे सर्व प्रकारचे राक्षस, वेताळ आणि विकृत प्राणी होते. ते एकतर ध्यानात किंवा नशेत धुंद असत. एकतर ते डोळे मिटून, नाही तर वेड्यासाखे नाचत. ज्याचा अभिमान वाटावा किंवा आपल्या आजूबाजूस असावा असा तो जावई नाहिये.

shiva-shakti-how-54-shakti-sthalas-were-born-sati-offering-berries-to-shiva

मग काही काळानंतर दक्षाला एक महान विधी करायचा होता ज्यासाठी त्याने प्रत्येक राजाला, प्रत्येक देव-देवतेला आणि प्रत्येक यक्षाला आमंत्रित केले. पण त्याने शिवाला आमंत्रण नाही पाठवले. शिव आणि सती वनात बसले होते आणि तिच्या प्रेमापोटी, सती त्यांना जंगलातील फळं खाऊ घालत होती कारण ते फक्त तेच खात होते. त्यांना घर नव्हते किंवा स्वयंपाकाची चांगली सोय नव्हती, म्हणून ते फक्त फळचं खात किंवा जे काही त्यांना अर्पण केले जाईल ते.

मग तिला लोकांची बरीच वर्दळ दिसली, उत्तम रथ, सर्व राजे, देवी-देवता पूर्णपणे सजून-धजून कुठेतरी जात होते. मग तिने शिवाला विचारले “हे सर्व काय आहे? सर्वजण कुठे चालले आहेत?” शिव म्हणाले “काही फरक पडत नाही. ते जिथे चालले आहेत तिथे आपल्याला जायची गरज नाही.” पण तिचे कुतुहला वाढू लागले “कुठे चालले आहेत सर्वजण? बघा त्यांची वेशभूषा. काय चाललंय काय?” ते म्हणले “आपलं अगदी चांगलं चालू आहे इथे, कशाला त्रास करून घेतीयेस. तू इथे सुखी नाहीस का? आहेस. तू सुखी आहेस. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस.” कारण त्यांना माहिती होतं की काय चालले आहे ते.

पण तिची उत्सुकता आणि स्त्री उत्तेजना तिला तेथे स्वस्थ बसून झाडाच्या फळांचा आनंद घेऊ देत नव्हती. ती चालत गेली आणि एका रथाला थांबवले आणि त्यांना विचारले, “तुम्ही कुठे चालला आहात?” ते म्हणाले “तुला नाही माहित? तुझ्या वडिलांनी मोठा यज्ञ ठेवला आहे आणि त्यांनी आम्हा सर्वांना आमंत्रण दिले आहे. तू नाही येणार का?” तिला आणि तिच्या पतीला आमंत्रण नाही मिळाले या विचारत ती पूर्णपणे हरवून गेली. तिला लाज वाटली. शिव बरोबर असे होणे हे योग्य नाही असे तिला वाटले. तिने शिवला सांगितले “मी माझ्या वडिलांकडे चालले आहे. त्यांनी असं का केलं असावं?” शिव म्हणाले “मला याने काहीच फरक पडत नाही. का तू स्वतःला त्रास करून घेतेस? आपण ठीक आहोत इथे. कशाला जायचे आपण यज्ञाला?”

पण आमंत्रण न दिल्याच्या या अपमानाने ती खूप चिडली होती. ती म्हणाली “नाही मला तिथे गेलंच पाहिजे, हे चुकून झाले असावे. कुणास-ठाऊक आमंत्रण हरवले असेल. असे होऊ शकते. तुम्हाला आणि मला आमंत्रण नाही, हे कसे शक्य आहे? मी मुलगी आहे त्यांची. हे चुकून झाले आसवे. मला खात्री आहे ते असे नाही करणार. माझे वडील असे नाहीत.” शिव म्हणाले “नको जाऊस.” पण तिने नाही ऐकले आणि ती गेली.

सतीचे यज्ञाच्या अग्नीत आत्मदहन

जेंव्हा ती यज्ञाला गेली, तेंव्हा तिला दिसले की तिच्या सर्व बहिणी, ओळखीचे अनोळखीचे सर्वजण सजून-धजून आले होते. पण ती अगदी साध्या वेशभूषेत आली होती, जी ती पर्वतावर राहत असताना घालायची. लोकं तिची थट्टा करू लागले आणि तिच्यावर हसू लागले. ते विचारू लागले “कुठे आहे तुझा राखेने फासलेला नवरा? कुठे आहे तो माणूस ज्याने कधीच त्याचे केस विंचरले नाहीत?”

यज्ञाची ज्वाला चालूच होती. ती सरळ त्यात चालत गेली त्यामध्ये आणि स्वतःला पेटून घेतले.

तिने सर्वांकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्या वडिलांना भेटायला गेली. तिला अजूनही असेच वाटत होते की हे चुकून झालेले असेल. जेव्हा ती त्यांना भेटली, दक्ष संतापला. पण तिने विचारले “तुम्ही शिवला आमंत्रण का नाही दिले?” मग दक्षाने होईल तितक्या प्रकारे शिवला शिवीगाळ केला आणि तो म्हणाला, “मी त्याला माझ्या घरात पाऊलसुद्धा नाही ठेऊ देणार”

तिला खूप वाईट वाटले. यज्ञाहुती अग्नी चालूच होता. ती सरळ त्यात चालत गेली आणि त्यात आणि स्वतःला पेटवून घेतले. नंदी आणि अजून काही जण जे, तिच्या पाठोपाठ आले होते, जेव्हा त्यांनी हे बघितले की काय झालं आहे , ते एवढे घाबरले की ते पळत शिवकडे गेले आणि सांगितले की कसे दक्षाने सतीचा अपमान केल्यामुळे तिने स्वतःला यज्ञाग्नीत पेटवून घेतले.

शिव वीरभद्रला निर्माण करतो

शिव काही वेळ अगदी निश्चलतेत बसले. मग त्यांच्या संतापाची सीमाच उरली नाही. तो स्वतःच अग्नी झाला. ते संतापाने उठले. शिवाने त्यांच्या जटेतून एक केस काढला आणि एका जवळच्या दगडावर जोरात फेकला आणि त्यातून एक अतिशय शक्तिशाली जीव म्हणजेच वीरभद्र निर्माण केला. त्यांनी वीरभद्रला सांगितले, “जा आणि यज्ञाचा विध्वंस करून टाक. कुणालाच त्यातून काही मिळता कामा नये, दक्षाला सुद्धा, जा त्यांचा नाश कर.” वीरभद्र अगदी रागात गेला आणि यज्ञकुंड नष्ट करून टाकला, जो कोणी मधे आला त्याला त्याला ठार केले आणि सर्वात महत्वाचे; दक्षाचा वध केला.

शक्तीपीठाचा जन्म

जसजसा शवाचा भाग खाली पडू लागला, शक्तीच्या एका गुणाची स्थापना तिथे झाली. भारतातील ही देवींची प्रमुख मंदिरे आहेत.

मग शिव आले, सतीचे अर्धवट जळलेले शरीर उचलले. त्यांचा शोक हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाहिये. त्यांनी तिला त्यांच्या खांद्यावर घेतले आणि निघून गेले. ते अगदी रागात आणि शोकात चालू लागले. ते तिचे शव खालीसुद्धा ठेवत नव्हते, ना तिच्या शरीराला अग्नी दिली, ना तिला पुरले. ते फक्त चालतच राहिले. जसे ते चालू लागले सतीचे शव सडणे चालू झाले आणि ते पूर्णपणे सडले. त्याचे खूप भाग झाले आणि ते सर्व भाग ५४ वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ह्या ५४ ठिकाणांना भारतात शक्तीपीठ म्हटले जाते. जसजसे शवाचे भाग खाली पडू लागले, शक्तीच्या एका गुणाची स्थापना तिथे झाली. ही मुख्य देवींची मंदिर आहेत भारतात.

काही लोकं वगळता यातील तीन जागा कुठे आहेत ते कुणालाच माहिती नाही ते गुपित असणे अपेक्षित आहे. पण ५१ जागा लोकांना माहिती आहेत.