नंबर ३ ची जादू
गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, जे शंकर, एहसान, लॉय - त्रिमूर्ती म्हणून ओळखले जातात, '३' या संख्येची शक्ती आणि महत्व जाणून घ्यायचं आहे. या संदर्भात सदगुरू, मानवी जीवनातील अनुभवाचा मुलभूत आधार जो वर्तमान, भूत आणि भविष्य या त्रिकालात रुजलेला आहे, याचं विवेचन करत आहेत.
शंकर महादेवन: प्रणाम सदगुरू. तुम्हाला माहितच आहे आम्ही गेल्या तेवीस वर्षांपासून संगीत संकलन करत आहोत, शंकर-एहसान-लॉय नावाने. एक गोष्ट मला नेहमी, मनोहारी वाटते, ती आहे तीन ची परिकल्पना मी न्युट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, ब्रम्हा, विष्णू, महेश आणी इतर ही वेगवेगळ्या पैलूंची तीन या अंकाशी युती पाहिलीय. आम्ही ही संगीत संकलन करणारे तीघे एकत्र आहोत. तर, तीन ची प्रासंगीकता काय आहे, तीनचं महत्व काय आहे, आणी तीनचा प्रभाव काय आहे.
सदगुरू: नमस्कार, शंकर, एहसान,लॉय त्रिमुर्ती ला माझा नमस्कार. तर, आपल्या इथं आहेत त्रिमूर्ती: त्रिनेत्र, त्रिशूल, त्रिकाल या सर्व गोष्टी, मानवी जीवनाच्या मुलभुत अनुभवातून उत्क्रांती पावलेल्या कल्पना आहेत.
मुख्यतः सर्व मानवी अनुभवाचे मुळ या तीन गोष्टीत आहे, आपली स्मृती घडलेल्या काळाचा घटक आहे, ज्याला ’भुतकाळ’ अस म्हटल जात. आपला अनुभव नेहमी आता घडत असलेला, वर्तमान असतो आणी आपली कल्पनाशक्ती आणी आकांक्षा नेहमी येणाऱ्या काळात असते म्हणजेच ’भविष्य’. तर मुळात मानवी जीवनाची अनुभुती ही स्मृती, अनुभव आणी कल्पनां शी निगडीत आहे. याला आधार ठरवून या तीन अनुभवांपासून उगम पावणाऱ्या अनेक पैलूंना आपल्या संस्कृतीत त्री म्हणुन स्पष्ट रूप दिलं गेलंय- त्रिनेत्र, त्रिकाल, त्रिशूल असं सर्वकाही…. आणी तुम्ही सुद्धा त्रिमुर्ती. .
तर हि मूळआधारभूत गोष्ट समजली पाहिजे, ह्या सर्व तीन्ही आयामांच अस्तित्व वर्तमानात आहे. हे सर्व भुत, आणी भविष्य यांचं अस्तित्व खरं पाहता ”आत्ता” वर्तमानात आहे, कारण तुम्ही आठवू शकता केवळ वर्तमानात.
अलीकडे जगात बराच प्रचलित एक प्रचार केला जातोय विशेष करून अमेरिकेत, पण मला वाटत मी….. आणि ते आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीत पोहचलय सुद्धा. लोक बोलताहेत, इतरांना सांगताहेत, “बी इन द मोमेंट” या क्षणात जगा” ते वर्तमान काळाचे उपासक आहेत. पण मला हे कळत नाहिये की कुणीतरी तुम्हाला या क्षणात जगायला का सांगतोय, कारण वर्तमान वगळता तुम्ही इतर कुठही असणं शक्य नाही. दुसर कुठं असू शकता तुम्ही? काय कुणी मला दाखवू शकतो, की ’हा क्षणात सोडून ते इतर कुठे जगू शकतात का? तर आपण तस ही वर्तमानातच रुजलेलो आहोत, पण आपल्या स्मृती भुतकाळाच्या आहेत, आपल्या कल्पना आणी आकांक्षा भविष्याच्या आहेत.
तर मुख्यतः जे लोक फक्त ’आज’ ची उपासना करतात, जे फक्त वर्तमानाची उपासना करतात, ते तुम्हाला सांगताहेत की फक्त या क्षणात रहा, भुतकाळाचा विचार करू नका, भविष्याचा ही विचार करू नका. आपल्या मेंदूचा असा विलक्षण विकास होण्यासाठी ज्या स्तराची मस्तिष्क क्षमता हवी, तिथवर पोहचायला आपल्याला लाखॊ वर्षे लागलीयेत. एक सुस्पष्ट स्मृती आणी एका अद्भुत कल्पनाशक्तीची साथ लाभायला लाखॊ वर्षांची उत्क्रांती लागली, पण आज कुणीतरी तुम्हाला सांगतोय, ते सर्व विसरून जा, आणी एका गांडूळाप्रमाणॆ जगा. मी एका गांडुळाला कमी लेखत नाहिये, तो अतिशय इकोफ्रेंडली जीव आहे. पण आजवर आपल्यावर जी उत्क्रांती झालीय, ज्यामुळे आपण मस्तिष्क क्षमतेच्या ह्या स्तरापर्यंत पोचू शकलो, तिला एका ढोबळ तत्वञानासमोर आपण नतमस्तक नाही करू शकत.
लोकं अस म्हणताहेत याच कारण हे आहे की, लोकांच्या दुःखाची हीच दोन मुलभुत कारणं आहेत. लोक, दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात काय घडलं याचं दुख भोगू शकतात, लोक उद्या, परवा काय घडेल याचंही दुःख आज, अगोदरच भोगू शकतात.
त्यांना ह्याचा त्याग करायचाय, कारण त्यांना विचार आणी भावनांना नीट हाताळता येत नाहियेत. जर तुम्ही आनंदाने आठवू शकता आणी खुप उल्हास आणी परमानंदाने गोष्टींची कल्पना करू शकता, तर तुम्ही यांचा त्याग केला असता का? गोष्ट फक्त इतकीच आहे की तुमची स्मृती आणी कल्पना अनावर बनल्याहेत आणी त्या तुमच्यासाठी एक दु:खद आयुष्य निर्माण करताहेत. म्हणून लोक भुतकाळाला कस विसरावं, भविष्याचा कसा विचार करू नये याबद्दल बोलताहेत. मानवी जीवन जगण्याचा हा मार्ग नाहिये.
ह्या त्रिकालांच असण खुप गरजेच आहे, तीन आयाम, त्रिशुल असले पाहिजेत, त्रिनेत्र असायला हवे, जीवनाला बघण्याचे आणी अनुभवण्य़ाचे हे तीन आयाम आहेत, आणी आपल्याला आनंद वाटतो की शंकर एहसान लॉय हि त्रिमुर्ती सुद्धा आहे. नवनवीन सुमधुर संगीत रचना करत रहा आणी तुम्हा त्रिमुर्तीचं प्रतिभा कौशल्य साजरं करूयात
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.