सद्गुरु: पंडूने कुंतीभोजाची दत्तक मुलगी कुंती आणि मद्र देशाची राजकुमारी माद्रीशी लग्न केले. एक दिवस, पंडू शिकार करायला गेला, तेव्हा त्याने हरणांची एक जोडी प्रेम करताना पाहिली. बेपर्वाइने, त्याने विचार केला की ते एक सोपे लक्ष्य आहे, आणि त्याने त्यांना बाण मारला. तो इतका चांगला तिरंदाज होता की त्याने त्याच्या इच्छेनुसार त्या दोघांना एकाच बाणाने मारले. मृत्युशय्येवर असलेला तो काळवीट, एक ऋषी होता ज्याने हे रूप धारण केले होते, मरणापूर्वी तो म्हणाला, “शिकारीमध्ये असा नियम आहे की एखाद्या गर्भवती प्राण्याला किंवा प्रेमी युगुलाला मारू नये कारण त्याचा अर्थ भावी पिढीचे निर्माण होत आहे. तू हा कायदा मोडला. असे केल्या कारणाने, जर तु तुझ्या पत्नीला कोणत्याही प्रकारच्या इच्छेने स्पर्श केलास तर तु जिवे मारला जाशील. ”त्यामुळे परिस्थिती अशी होती की पंडूला अद्याप मूलबाळ नव्हते; त्याला दोन पत्नी होत्या पण या शापामुळे तो त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हता.

राजा आणि त्याच्या राज्याच्या भविष्यासाठी मूल नसणे ही मोठी समस्या होती. भावी राजा कोण होणार होता? जर सिंहासनावर उत्तराधिकारी म्हणून कोणताही खंबीर राजपुत्र नसेल तर इतर कोणीही महत्वाकांक्षी बनेल. ही एक राजकीय समस्या होती.

परत एकदा, पूर्वीच्या पिढीप्रमाणे कुरु कुळात संतती नव्हती. या परिस्थितीमुळे पंडू इतका निराश झाला की त्याने आपली सर्व शक्ती व अधिकार सोडले आणि आपल्या पत्नींसमवेत जंगलात राहायला गेला. त्याने आजूबाजूच्या ऋषींबरोबर संवाद साधला आणि स्वत: ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला, आपण एक राजा आहोत हे विसरण्याचा प्रयत्न केला, परंतु ही तीव्र निराशा त्याच्यात सतत वाढतच गेली. एके दिवशी, जेव्हा तिने कळस गाठला, तेव्हा तो कुंतीला म्हणाला, “मी काय करावे? मला स्वत: ला ठार मारण्याची इच्छा आहे. जर तुमच्यापैकी कोणालाही मूल झाले नाही तर कुरु कुळ गमावेल. धृतराष्ट्रालाही मुले नाहीत. याशिवाय, तो फक्त नावाचा राजा आहे आणि तो आंधळा आहे म्हणून त्याच्या मुलांनीही राजा होऊ नये.

जेव्हा त्याने आत्महत्या करू इच्छित असल्याची आपली निराशा व्यक्त केली तेव्हा कुंतीने स्वतःबद्दल काहीतरी उघड केले. ती म्हणाली, “एक शक्यता आहे.” त्याने विचारले, “काय?” ती म्हणाली, “जेव्हा मी लहान होते तेव्हा ऋषी दुर्वास माझ्या वडिलांकडे आले होते आणि मी त्यांचे आदरातिथ्य केले होते. ते माझ्यावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी मला एक मंत्र दिला. मंत्राबरोबर ते मला म्हणाले की, मी हवे त्या देवाला बोलावू शकते आणि मी त्याचा मुलगा धारण करू शकते. जर तुमची खरोखर इच्छा असेल तर मी तुमच्यासाठी हे करीन. ” यापूर्वी तिने कोणालातरी आधीच बोलावले होते हे तिने त्याला सांगितले नाही. पंडू खूपच उत्सुक होता. तो म्हणाला, “कृपा करून हे कर. आपण कोणाला बोलावावे? ” त्यांनी क्षणभर विचार केला; तेव्हा पंडु म्हणाला, “आपण धर्माला बोलावले पाहिजे. कुरु कुळातील राजा म्हणून आपल्याकडे धर्मपुत्र असणे आवश्यक आहे. ” धर्म म्हणजेच यमाला , मृत्यू आणि न्यायाची देवता म्हणूनही ओळखले जाते.

युधिष्ठिर आणि भीम यांचा जन्म

कुंती जंगलात निघून गेली आणि तिने धर्माला बोलावले, आणि धर्म आला. तिला एक मुलगा झाला, त्याचे नाव युधिष्ठिर ठेवले गेले आणि त्याला पंडूच्या मुलांपैकी पहिला मानला जातो. एक वर्ष संपले आणि पंडू लोभी झाला आणि म्हणाला, “आपल्याला आणखी एक मूल हवे.” कुंती म्हणाली, “नाही, आपल्याला एक मुलगा आहे आणि कुरु कुळाचा वारस आहे. हे खूप झाले." तो म्हणाला, “नाही, आपल्याला आणखी एक मूल असले पाहिजे.” तो विनवणी करु लागला, “जर मला एकच मुलगा असला तर ते माझ्याविषयी काय विचारतील?” कृपा करून अजून एक मुलं होऊ दे. ” “मग त्याचा पिता कोण असावा?” पंडू म्हणाला, “आपल्याकडे धर्म आहे, पण आपल्याला सामर्थ्य देखील आवश्यक आहे. तर आपण वायु, वाऱ्यांच्या देवाला बोलावू. ” ती निघून गेली आणि वायूला बोलावले. वायु आला. त्याचे रूप इतके उग्र होते की तिथे ते राहू शकले नाहीत. तो कुंतीला घेऊन निघून गेला.

क्षीरसागर म्हणजेच “दुधाचा सागर” - आकाशगंगेमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सुरुवातीला पर्वत व त्यानंतर महासागर कसे पार केले, त्याचे विस्तृत वर्णन महाभारतात दिले आहे. पृथ्वी खरोखर गोल असल्याचे त्याने तिला दाखवले. त्याने तिला सांगितले की जेव्हा भारतवर्षामध्ये दिवस असतो तेव्हा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला रात्रीची वेळ असते. आणि इथे जेव्हा रात्र असते तेव्हा तिथे दिवस असतो. आणि पृथ्वीच्या ह्या दुसऱ्या बाजूला आणखी एक महान सभ्यता होती, तिथे कोणत्या प्रकारचे लोक राहत होते आणि त्यांची कौशल्ये आणि क्षमता काय आहेत. तो म्हणाला की त्या भूमीतही महान ऋषी, सिद्धपुरुष आणि योद्धेदेखील होते. कुंतीला आणखी एक मुलगा झाला, तो वायुचा मुलगा - भीम होता, तो मोठा झाल्यावर, जगातील सर्वात बलवान माणूस म्हणून त्याचे वर्णन केले गेले.

अर्जुनाचा जन्म

थोड्या दिवसांनी पंडू म्हणाला, “मला माहित आहे की मी लोभी आहे, परंतु या दोन सुंदर मुलांना पाहिल्यानंतर मी माझा मोह कसा आवरू शकतो? मला आणखी एक मुलगा पाहिजे आहे - फक्त एक मुलगा. ” कुंती म्हणाली, "नाही, नाही." वेळ चालली होती पण पंडू तिला सोडणार नव्हता. ती शेवटी म्हणाली, "ठीक आहे, कोण?" तो म्हणाला, “चला सर्व देवतांचा राजा इंद्राला बोलावू या. तिने इंद्राला आमंत्रित केले आणि त्याच्या मुलाला जन्म दिला - अर्जुन, जो महान धनुर्धर व योद्धा होता. महाभारतात त्याचा उल्लेख क्षत्रिय म्हणून करतात, याचा अर्थ योद्धा. त्याच्यासारखा दुसरा योद्धा कधी नव्हता आणि कधीही होणार नाही.

माद्रीचा मत्सर

तीन दैवी मुले मोठी होऊ लागली आणि त्यांनी अभूतपूर्व कौशल्ये, क्षमता आणि बुद्धिमत्ता प्रदर्शित करण्यास सुरवात केली. सर्वांचे लक्ष त्यांच्यावर आणि त्यांची आई कुंतीवर केंद्रित झाले. पंडूची दुसरी तरुण पत्नी, जिला स्वतःचा म्हणावा पतीही नव्हता किंवा स्वत:चे मुलबाळही नव्हते, ती खूपच असंतुष्ट झाली. एके दिवशी, पंडूच्या लक्षात आले की माद्री ही त्याने लग्न करून आणलेली गोड वधू राहिली नव्हती - तिचा चेहरा द्वेषपूर्ण दिसत होता. त्याने विचारले, “काय झाले? तू आनंदी नाहीस का? ” ती म्हणाली, “मी आनंदी कशी राहू? हे सर्व तू ,तुझी तीन मुले आणि तुझी दुसरी पत्नी यांच्याबद्दल आहे. माझ्यासाठी इथे काय आहे?” सुरुवातीच्या युक्तिवादानंतर ती म्हणाली, “जर तुम्ही कुंतीला मला मंत्र शिकवायला सांगू शकलात तर मलाही मुले होतील. मग तुम्ही माझ्याकडेही लक्ष द्याल. अन्यथा, मी फक्त एक बोजा आहे.”

पंडूला तिची दुर्दशा समजली. तो कुंतीकडे गेला आणि म्हणाला, "माद्रीला मुलाची गरज आहे." कुंती म्हणाली, “का? माझी मुलं तिचीच मुलं आहेत. ” तो म्हणाला, “नाही, तिला स्वतःची मुले हवी आहेत. तू तिला मंत्र शिकवू शकतेस का? ” कुंती म्हणाली, “मी मंत्र शिकवू शकत नाही, परंतु जर आवश्यक असेल तर मी मंत्राचा वापर करीन आणि तिला पाहिजे असलेल्या कोणत्याही देवाची प्रार्थना ती करु शकते.” तिने माद्रीला जंगलातल्या एका गुहेत नेले आणि म्हणाली, “मी मंत्र वापरेन. तुला पाहिजे असलेल्या देवाचा विचार कर. ” त्या तरुण स्त्रीचा गोंधळ उडाला होता, “मी कोणाला बोलवावे? मी कोणाला बोलावावे? ” तिने दोन अश्विनांचा विचार केला, जे देव नसून यक्ष आहेत. अश्व म्हणजे घोडा - दोन घोडे तज्ञ असलेल्या कुळाशी जोडलेले दैवी घोडेस्वार होते. माद्रीला या अश्विनांची जुळी मुले झाली - नकुल आणि सहदेव.

पाच पांडव

तर कुंतीला युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन ही तीन मुले होती. माद्रीला नकुल आणि सहदेव अशी दोन मुले होती. पण पंडूला अजून मुले हवी होती. राजासाठी जितके अधिक मुलगे तितके अधिक चांगले. जेव्हा लढाया होतात तेव्हा मुलांची संख्या कमी होऊ शकते, म्हणून आपल्याला जिंकायचे असल्यास किंवा राज्य करायची इच्छा असल्यास शक्य तितकी मुले असणे चांगले. कुंती म्हणाली, “बस. आता मी अजून मुले होऊ देणार नाही. ” पंडुने विनवणी केली, "ठीक आहे, तू तयार नसल्यास, माद्रीसाठी मंत्र वापर." ती म्हणाली, “नाही" कारण ज्या राणीला जास्त मुले असतील ती मुख्य राणी होईल. तिला तीन मुलगे होते, माद्रीला दोन मुले होती आणि तिला हा अंकगणिताचा फायदा घालवायचा नव्हता. ती म्हणाली, “नाही. आता परत आपण मंत्र वापरणार नाही”

पंडूच्या पुत्रांना पांडव म्हणून संबोधले जात असे. पंच पांडव, पाच पांडव म्हणून ही मुले मोठी झाली. ते राजाची मुले व शाही घराण्याचे सदस्य होते, परंतु ते जंगलात जन्माला आले आणि सुमारे १५ वर्षे तेथेच मोठे झाले.

पुढे चालू....