शिक्षक दिनाचे महत्त्व 

सद्गुरू: ५ सप्टेंबर हा दिवस शाळेतले एक शिक्षक म्हणून सुरूवात केलेले भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून भारतात ओळखला जातो. आपल्या राष्ट्रपतींपैकी एक शालेय शिक्षक राष्ट्रपती होते ही देशातील शिक्षकांसाठी एक प्रशंसनीय गोष्ट आहे.

भारतीय संस्कृतीत, आपण शिक्षकांना प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून नेहमीच ओळखले आहे, आपण असे म्हटले आहे: "आचार्य देवो भव", अर्थात शिक्षक म्हणजे जणू देवच. कारण सामान्यत: वाढत्या मुलांनी त्यांच्या पालकांपेक्षा शिक्षकांकडे जास्त वेळ घालवला. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यामागे कल्पनाच मुळात ही आहे की कुठेतरी, त्यांना हे माहित आहे की त्यांच्यापेक्षा इतर कोणी त्यांच्या मुलांवर उत्तम प्रभाव टाकू शकतात.

शिक्षकाचे महत्त्व

लोकांना वाटते की आजच्या पिढीत शिक्षकांना यापुढे काही महत्त्व राहिले नाही कारण शिक्षक जे काही बोलू शकतो, ते इंटरनेट सहज देऊ शकते. परंतु एक माणूस, एक राष्ट्र आणि जग घडवण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. खरं तर, मला वाटतं की शिक्षकांचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे कारण माहिती पुरवण्याचे ओझे त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे.

एखाद्या शिक्षकाचे कार्य मुख्यत्वे विद्यार्थ्याला मानव म्हणून प्रेरित करणे आणि त्याचा विकास हेच राहिले आहे. शिक्षक यापुढे टेप रेकॉर्डर नाही जो काहीतरी वाचतो आणि आपल्याला काही माहिती देतो. तो किंवा ती एक अशी व्यक्ती आहे जी एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरणा देऊन त्याचे जीवन घडवत आहे.

बर्‍याच मुलांसाठी, कोणता शिक्षक एखादा विषय कसा शिकवत आहे त्यावर तो विषय त्यांना आवडतो किंवा नाही ते ठरते. जर एखादा विद्यार्थी शिक्षकाबरोबर ओळख प्रस्थापित करत असेल, जर शिक्षक पुरेसे प्रेरणा देत असतील तर अचानक हा विषय मनोरंजक होतो. क्षमता वाढविण्याच्या आणि एखाद्या विशिष्ट विषयात मुलाची आवड वाढविण्याच्या प्रक्रियेत शिक्षक नक्कीच महत्वाची भूमिका निभावतात.

चांगल्या शिक्षकाची वैशिष्ट्ये

जर आपल्याला एखादे राष्ट्र परिपूर्ण बनवायचे असेल, तर उच्च क्षमता असलेले लोक शालेय शिक्षणात गेले पाहिजेत. पहिल्या 15 वर्षांत मुलावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडतो हे त्यांच्या जीवनाबद्दल बर्‍याच गोष्टी ठरवते. मनाची उत्तम गुणवत्ता, बांधिलकीची उच्च पातळी आणि सर्वाधिक चैतन्यशीलता यातून शिक्षक घडला पाहिजे.

परंतु, आज आपण एक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती निर्माण केली आहे जिथे बरेच लोक केवळ शालेय शिक्षक बनतात कारण ते इतर काही करू शकत नाहीत. अर्थातच सर्व शिक्षकांसाठी हे खरे नाही, परंतु बर्‍याच शिक्षकांच्या बाबतीत हे घडत आहे. हे बदलले पाहिजे. जर हे बदलले नाही तर आपण एक सशक्त समाज तयार करू शकणार नाही. आपण अत्यंत निम्न दर्जाचे मानव, निम्न दर्जाची समाज आणि निम्न दर्जाची राष्ट्रे तयार करू.

बुद्धिमत्ता, बांधिलकी आणि प्रेरणा

शिक्षकाचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे दहा पीएचडी असाव्यात. शिक्षकाचा अर्थ असा नाही की मुलांनी फक्त शिक्षकांना जे काही माहित असेल फक्त तेच त्यांच्या मुखातून बाहेर येण्याची प्रतीक्षा करावी. शिक्षक म्हणजे त्या व्यक्तीच्या उपस्थितीत, लोकांनी अशा गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या शिक्षकांनाही माहित नसतील.

मुले म्हणजे मानवता घडवण्याच्या प्रक्रियेत आहेत. जेव्हा ते त्यांच्या हातात असतात तेव्हा शिक्षक त्यांना कसे बनवतात ही सर्वात मोठी जबाबदारी आणि विशेषाधिकार आहे. कोणतीही मानवी कृती केवळ तेव्हाच महत्त्वपूर्ण आहे जेव्हा आपण दुसर्‍या जीवनास स्पर्श करू शकू. तुम्ही खरोखर दुसर्‍या जीवनास आकार देऊ शकता हे एक प्रचंड भाग्य आहे. जेव्हा असा विशेषाधिकार एखाद्याच्या हाती असतो, तेव्हा मनाची उच्च क्षमता, आणि सर्वोच्च बांधिलकी आणि प्रेरणा त्यामध्ये असणे फार महत्वाचे आहे.

शिक्षक: शिक्षकामध्ये लोकप्रिय होण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे का?

सद्गुरु: होय, लोकप्रियता महत्त्वपूर्ण आहे. लोकप्रियता म्हणजे मला, मी त्यांना हवं ते देणं आणि तडजोड म्हणायचं नाही. परंतु तुम्ही लोकप्रिय नसाल तर प्रत्येकजण तुमच्याविरूद्ध कार्य करेल आणि तुम्ही प्रभावी होणार नाही. प्रत्येकजण स्वेच्छेने सहकार्य करतो तेव्हाच तुम्ही खूप प्रभावी ठरता. जर कोणाशीहि तुम्हाला सहकार्य करायचे नसेल तर तुम्ही प्रभावी होणार नाही.

शिक्षक लोकप्रिय कसा होऊ शकतो?

तुम्ही अशा व्यक्तीसारखे बनले पाहिजे की तुम्हाला काहीही बोलावे लागले नाही पाहिजे परंतु प्रत्येकाला तुमच्यासारखे व्हायचं इच्छा जागृत होईल. त्यावेळी तुम्हाला शाळा चालवणे किती सोपे होईल हे माहित आहे काय? तुम्ही त्यांच्यासारखे नृत्य करायला शिकलेच पाहिजे, त्यांच्यासारखेच गाणे देखील शिकले पाहिजे, त्यांच्यासारखे बोलायला शिकले पाहिजे, मग ते म्हणतात "वाह, मला असेच व्हायचे आहे."

बहुतेक प्रौढांची हीच समस्या आहे की त्यांनी 14 वर्षांच्या मुलांबरोबर तशाच गोष्टी करण्याची इच्छा असते ज्या त्यांनी तो किंवा ती तीन वर्षांच्या असताना केल्या. जेव्हा तुमचे मुल तीन वर्षाचे होते तेव्हा ते सर्वत्र रांगले. तुम्हीपण त्यांच्यासारखेच सगळीकडे रांगलात आणि बोलण्याचा प्रयत्न केला - ओलेलेले, कुचीकूचीकू - सर्व काही छान होते. मग तो उभा राहिला आणि आता तो चौदा वर्षाचा मुलगा झाला आहे.

याचा अर्थ असा आहे की तो स्वत: एक माणूस होण्याचा प्रयत्न करीत आहे. तो घाईत आहे! जेव्हा तो तीन वर्षांचा होता तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर रांगला असेल तेव्हा त्यालाही आनंद झाला. पण आता त्याला झोका घ्यायचा आहे. तुम्ही देखील त्याच्याबरोबर झोका घेतला पाहिजे. तुम्हाला अजून रांगायचे असेल तर ते चालणार नाही.

तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्य समृद्ध करायचं असेल तर ती तुमची स्वतःची मुले असोत किंवा ती तुमच्याबरोबर अभ्यास करत असोत, सर्वात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा ते आपल्याला पाहतील तेव्हा त्याना असे म्हणावे लागेल की, "वाह, मला असे व्हायचे आहे "!

तुम्ही त्यांच्यासारखे नाचणे, त्यांच्यासारखे गाणे आणि त्यांच्यासारखे बोलणे शिकले पाहिजे. मग ते म्हणतील "वाह, मला असं व्हायचंय." एकदा त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असेल तर गोष्टी घडवून आणण्यात काहीच अडचण रहात नाही.