प्रश्न: माझ्या आयुष्यात प्रत्येक परिस्थितीत कलह, मतभेद, संघर्ष होतात, यावर उपाय काय?

सदगुरू: पुष्कळ लोक अशा परिस्थितीतून जाताना मी बघतो. समजा एखादे काम करायचे आहे आणि ते झाले नाही तर बरेच लोक  विचार करतात कि कोण्या एका व्यक्ती मुळे ते होऊ शकले नाही. ते दुसऱ्याकडे बोट दाखवतात. बरेच लोक अदृश्य शक्तिंवर त्याचे खापर फोडतात. कधी कधी तर ते मलाच दोषी धरतात,  “सद्गुरू, तुमच्या कृपेचा काही उपयोग होत नाहीये.” सात दिवसांच्या इनर इंजिनीरिंग प्रोग्रॅमच्या अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कि - जर एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडत नसेल याचा अर्थ ती गोष्ट व्यवस्थित केली जात नाहीये.

तर इनर इंजिनीरिंग म्हणजे हेच आहे - कोणतेही कलह, संघर्षाशिवाय तुम्ही इथे राहू शकाल. संघर्षरहित जर तुम्ही बसू शकलात तर बाहेरील संघर्ष आपोआप कमी होतील.

याक्षणी कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल पण एखादी गोष्ट जशी हवी तशी घडली नाही म्हणजे साहजिकच ती करण्यात काहीतरी  चूक झाली आहे हे नक्की. पण लोक तात्विक उत्तरं शोधायला लागतात. आणि बरेच लोक यालाच दिव्यदर्शीत्व मानतात. त्यांच्या आयुष्यातल्या सोप्या गोष्टी ते गूढ समजून त्या क्लिष्ट करतात आणि यालाच ते दिव्यदर्शी असणे मानतात. नाही, दिव्यदर्शी असणे म्हणजे अत्याधिक गूढ गोष्टी म्हणजे तुमच्या पंचेंद्रियांच्या आणि तर्काच्या पलीकडल्या गोष्टी सहजपणे तर्काच्या चौकटीत बसवणे. सहज सोप्या गोष्टी दुरापास्त करणे आणि त्यांना गूढ व तात्विक स्तरावर नेऊन ठेवणे म्हणजे दिव्यदर्शी असणे नव्हे

जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत कलह, मतभेद, संघर्ष होत असतील तर साहजिकच तुम्ही स्वतः खरबरीत, आडमुठे झालेले आहात, त्यामुळेच घर्षण होत आहे.  एक काम करा, आम्ही तुम्हाला एक छोटा खरबरीत पॉलीश पेपर पुरवू, रोज तुमचं कोणाबरोबर घर्षण झाल की तुमची चामडी जरा खरवडा, जर तुम्ही लगेच त्यावर उपचार केला नाही तर एक दिवस तुमची त्वचा शिल्लकच राहणार नाही, आणि मग तुम्ही संघर्ष टाळाल. अगदी हळुवारपणे चालू लागाल. तुम्हाला असा उपाय हवा असेल तर तशी तजवीज सुद्धा आम्ही करू. असले उपाय नको असतील तर जागे व्हा. जिथे कुठे जाता, तिथे कलह, संघर्ष, मतभेद होत असतील तर साहजिकच हे तुमच्यामुळेच घडतंय.

संघर्ष कमी करण्यासाठी ही  एक साधी गोष्ट करून पहा: तुम्ही प्रत्येक मिनिटाला, तासाला, दिवसभरात जेवढे बोलता त्याच्या निम्मेच बोला. तुमचा संघर्ष कितीतरी पटीने कमी होईल, कारण तुम्ही बाष्कळ बडबड थांबवलीत. दुसरी गोष्ट; प्रत्येक स्त्री, पुरुष, मुले, प्राणी, जे कोणी समोर दिसेल त्यांच्या समोर नतमस्तक व्हा, त्यादिवशी कलह, मतभेद होणार नाही.  हे केवळ करायचं म्हणून नाही तर मनापासून करा, अगदी गाढवासमोरही नतमस्तक व्हायला शिका.

 

कलह दोन प्रकारचे असतात - एक म्हणजे जो आपल्या आत चाललेला असतो तो. दुसरा म्हणजे बाहेरच्या जगाबरोबरचा; जो आपल्या आत चाललेल्या संघर्षाचा परिणाम असतो. तर इनर इंजिनीरिंग म्हणजे हेच आहे - कोणत्याही संघर्षाशिवाय तुम्ही इथे राहू शकाल. संघर्षरहित जर तुम्ही बसू शकलात तर बाहेरील संघर्ष आपोआप कमी होतील. एवढं करूनही जर तुम्हाला काही आडमुठी माणसं भेटली तर थोडाफार संघर्ष होणार, म्हणून शक्य असल्यास अशा लोकांना आपण टाळतो. पण काही वेळा अशा माणसांबरोबर सुद्धा जेव्हा तुम्हाला काम करावं
लागतं, तिथे थोडं शहाणपण असणे गरजेचे आहे, हे तुम्हाला शिकावं लागेल.

आडमुठ्या माणसांना हाताळण्यात काही लोक चतुर असतात. हे लोक इतके सौम्य वागतात कि दुसरी व्यक्ती किती आडमुठी असली तरी ते आपले काम पार पाडून मोकळे होतात. आडमुठ्या माणसांबरोबर काम करायला थोडं कसब आणि अनुभव लागतो. यात अध्यात्मिक असं काही नाही, तो केवळ एक सामाजिक व्यवहाराचा भाग आहे. साळींदराने त्याचे काटे बाहेर काढले की तुम्ही त्यापासून थोडं लांब रहा. त्याचे काटे बाहेर नसतील तेंव्हा तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. सतत काटे बाहेर काढून ठेवेल इतकी क्षमता त्याच्यात नसते .

पण हे मात्र लक्षात असू द्या की कलह, मतभेद, संघर्ष हे दुसरं कोणी नसून, केवळ तुम्हीच आहात.

Editor's Note: Find out more about Inner Engineering, including upcoming program dates and venues.