आध्यात्मिक उन्नतीची वेळ

आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणार्‍या लोकांसाठी ग्रीष्म ऋतु आणि मकर संक्रांतीदरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे. याला साधनापाद म्हणतात – जो ग्रहणशीलतेचा उत्तम काळ म्हणून ओळखला जातो. योग परंपरांमध्ये आणि विशेषतः उत्तर गोलार्धात, हा कालावधी साधनेसाठी अतिशय अनुकूल मानला जातो जेंव्हा आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.

सहजगत्या स्व-परिवर्तनाची वेळ

Sadhanapada – Rising Through Sadhana

एखाद्या व्यक्तीला या जगात संपूर्णपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक गोष्टींपैकी, सर्वात महत्वाचे पैलू म्हणजे समतोल आणि स्पष्टता. एक संतुलित जीवन जगण्यासाठी केवळ बाह्य क्रिया-कलापांच्या व्यतिरिक्त अधिक काहीतरी आवश्यक असते, आपल्या आत काय घडते आहे हे सुद्धा महत्वाचे असते. साधनापाद हा एक असा काळ आहे ज्यात प्रत्येक व्यक्तीला तिचे मन आणि भावना स्थिर करून जीवनातील कोणत्याही परिस्थितीमधे सहाय्यक बनेल असा स्थिर आधारभूत पाया निर्माण करण्याची संधी असते.

तीव्र साधनेचा काळ

Sadhanapada – Rising Through Sadhana

2018 मधे सद्गुरुंनी प्रथमच साधनापादाचा कालावधी ईशा योग केंद्राच्या पवित्र वातावरणात घालवण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली. 21 देशांमधील 200 पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या आंतरिक परिवर्तनाकडे एकाग्रतेने, प्रयत्नपूर्वक प्रयत्न करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या संधीचा लाभ घेतला.

Sadhanapada – Rising Through Sadhana

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागी झालेल्या व्यक्ती अगदी तीव्र साधना करतात, ज्यामध्ये दैनंदिन योगक्रिया आणि स्वयंसेवेचा समावेश आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत आम्ही सहभागी झालेल्या व्यक्तींच्या आंतरिक प्रवासावर देखरेख ठेऊ आणि त्यांच्या अनुभवांचे आणि परिवर्तनाचे पडद्यामागचे अंतरंग समजावून घेऊ.