ईशा भिक्षा आणि ईशामधील अन्नदानाची कथा
1994 मध्ये झालेल्या ९० दिवसांच्या पहिल्या व्होलनेस प्रोग्रॅमचे भोजन तयार करणार्या ईशाच्या सर्वात वयोवृद्ध स्वयंसेविकेपैकी एक असणार्या सरस्वती आजी यांची कहाणी आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत.

वीस वर्षांपूर्वी ईशाचा पहिला व्होलनेस प्रोग्रॅम सुरू झाला. त्यामध्ये साधारण चाळीस व्यक्ती आणि मोजके स्वयंसेवक उपस्थित होते. 90 दिवस चालणार्या या कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था ईशाच्या सर्वात वयोवृद्ध स्वयंसेविकेपैकी एक असणार्या सरस्वती आजी यांनी जवळ जवळ एकटीच्या बळावर यशस्वीपणे पार पाडली
तेंव्हा, इथे फक्त पत्र्याचे छप्पर असलेली एक लहानशी झोपडी होती. आमच्याकडे स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी योग्य साधने देखील नव्हती. एका गुराख्याकडे एक छोटासा स्टोव्ह होता तो आम्ही वापरला,” आजी सांगत होत्या. “व्होलनेस प्रोग्रॅम मधील प्रत्येक गोष्ट लहान प्रमाणावर पार पडली; एक स्वयंसेवक भाज्या आणत असे. पालक इथेच उगवला जायचा, मग मी त्याची भाजी, आणि मग दोसा, उपमा किंवा भात बनवत असे. मला आठवते, एका स्वयंसेवकाला गोड खूप आवडत होते, म्हणून मग मी आमच्याजवळ उपलब्ध असणार्या सामुग्रीनुसार जे शक्य होते ते बनवत होते.
तेंव्हा फक्त तीन खोल्या होत्या; दगडाच्या दोन खोल्या आणि एक लहानसे झोपडे, जिथे स्वयंपाक केला जात असे. सद्गुरु क्वचित कधीतरी येथे भोजन घेत – तेंव्हा ते कोयंबतूरमध्ये राहत असत. जेंव्हा ते इथे येत, तेंव्हा एका खोलीत ते रहात आणि मी त्यांच्यासाठी भोजन बनवत असे. मी फक्त सद्गुरूंसाठी सॅलड, आणि पोळ्या तयार करत असे. विजी माँ आल्यानंतर, मी त्यांच्यासाठी रस्सम सुद्धा बनवायला सुरुवात केली. मला वाटते, सदगुरूंना पालक सुद्धा आवडत असे. त्यांच्यासाठी मी पालकाची भाजी खूप वेळा केली आहे!”
सरस्वती आजी व्होलनेस प्रोग्रॅमचे पहिले तीस दिवस सहभागी होत्या, जेंव्हा त्यांना योगाआसने, अंगमर्दन आणि महतप्राणायाम शिकवण्यात आला. “सद्गुरु काय बोलत ते मला कधीही समजू शकले नाही. बहुतांश वेळा ते इंग्रजीमधून बोलत असत. पण त्यांनी मला सांगितले, की भाषा हा अडथळा नाही, फक्त माझ्यासोबत रहा, आणि तुला आपोआप सारे काही समजेल. आणि त्यांचे म्हणणे बरोबर होते! ते जे काही सांगण्याचा प्रयत्न करत असत, ते मला नेहेमीच समजत असे.
तीस दिवसांनंतर, साठ दिवसांचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू झाला, ज्या दरम्यान सरस्वती आजीने स्वयंपाकघरात भाज्या चिरणे, स्वयंपाक तयार करणे या कामात स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. आणि तेवढेच नाही. भोजन तयार करण्याव्यतिरिक्त खोल्यांची आणि कार्यक्रमाच्या ठिकाणांची स्वच्छता सुद्धा त्या राखत असत, आणि त्यासोबतच बागकाम देखील करत. त्या म्हणाल्या, “त्या ठिकाणी दासाळीची खूप झाडं होती, त्यांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे यासाठी मी माझा खूप वेळ घालवला.”
तर मग त्यांचा ईशासोबत प्रवास कसा सुरू झाला? आजी म्हणाल्या, “वीस वर्षांपूर्वी माझा मुलगा इथे स्वयंसेवक म्हणून काम करत होता. त्या वेळी भोजन बनवण्यासाठी फारसे कोणी उपलब्ध नव्हते, म्हणून मग मी तेथे येऊन भोजन बनवु शकेन का, असे त्याने मला विचारले. मी हो म्हणाले, आणि तेंव्हापासून मी इथेच आहे. मी इथे आले तेव्हा मी 62 वर्षांची होते.”
“काही वेळा मी जेंव्हा आश्रमाकडे पहाते, तेंव्हा तो किती झपाट्याने वाढत गेला याचे मला आश्चर्यच वाटते. मी आले तेंव्हा, आम्हाला आंघोळ करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. आज चंद्रकुंड आणि सूर्यकुंड या व्यतिरिक्त अनेक सुसज्ज स्नानगृहे आहेत. तेंव्हा फळे आणि भाज्या कापण्यासाठी आमच्याकडे खूप थोड्या सुर्या होत्या, आज आमच्याकडे कापणीसाठी एक मोठा विभाग असून त्यात अनेक अद्यावत यंत्रे आणि उपकरणे आहेत. ही वाढ आश्चर्यकारक आहे!”
खरोखरच, 1994 साली सहभागी झालेल्या मोजक्या काही व्यक्तींसाठी आजींनी भोजन बनविल्यापासून ईशाची वाढ झपाट्याने झाली आहे. आज भिक्षा हॉलमध्ये प्रत्येक भोजनाच्या वेळी सरासरी 2000 लोकांना भोजन पुरवले जाते, आणि या महालय अमावस्येच्या दिवशी, सरस्वती आजींनी पहिल्यांदा भोजन बनविल्यानंतर 20 वर्षांनी ईशा भिक्षा ही योजना सुरू करण्यात आली.
ईशा भिक्षा, देणगीदाराला वर्षातून एकवेळा असे वीस वर्षे अन्नदानासाठी एक रकमी देणगी देता येते. पुढील वीस वर्षे देणगीदारांच्या इच्छेनुसार, वर्षातील एका विशेष दिवशी सद्गुरुंचा आशीर्वाद असलेली कार्ड आणि इतर भेटवस्तु देऊन आम्ही त्यांनी दिलेल्या देणगीचे स्मरण ठेवतो.
हा प्रकल्प आदियोगी आलयममध्ये महालय अमावास्या कार्यक्रमादरम्यान सुरू करण्यात आला, अतिशय उत्साहात आणि टाळ्यांच्या प्रचंड गजरात आणि सरस्वती आजी यांच्या हस्ते याच्या फलकाचे अनावरण होणे अतिशय उचित होते!
गुरुपौर्णिमा अन्नदानम
गुरु पौर्णिमा अन्नदानमसाठी देणगी द्या!अन्नप्रसादाचे एक पवित्र अर्पण आत्ताच दान द्या"