आपलं हित आणि यश प्रत्येकाला हवे असते. आपल्यापैकी प्रत्येकाची यश म्हणजे काय याची वैयक्तिक कल्पना असू शकते आणि प्रत्येकजण आपल्या कल्याणासाठी वेगवेगळ्या मार्गांचे अनुसरण करू शकतात, परंतु प्रत्येकाची मूलभूत इच्छा समान आहे. हे प्राचीन भारतीय संस्कृतीत ओळखले गेले, आणि म्हणूनच अनेक युगातील दृष्ट्या योग्यांनी मानवाच्या त्वरित आणि अंतिम कल्याणात मदत होतील अशी अनेक उपकरणे तयार केली. यंत्र ही अशा प्रकारची उपकरणे आहेत जी एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी आधार म्हणून तयार केली जातात.

प्रश्न:यंत्र म्हणजे नक्की काय?

सद्गुरु:यंत्राचा शब्दशः अर्थ मशीन असा होतो. मशीन हे अत्यंत हेतूपूर्ण स्वरूपाचे संयोजन आहे. उदाहरणार्थ, संगणक हा आपल्या मनाचा परिपाक आहे, परंतु तरीही, जर आपल्याला १७३६ ने १३३४३ ला गुणायाला सांगितले तर आपण कॅल्क्युलेटर - ह्या यंत्राकडे पोहोचतो. असे नाही की मनामध्ये गणना करणे शक्य नाही, परंतु हे हेतूपूर्ण स्वरूप किंवा यंत्र आपल्याला आपल्या शरीराचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करायला मदत करते. जरी आपल्याकडे आधीपासूनच शरीर आहे - सर्वात अत्याधुनिक यंत्र - आपल्याला, वेगवेगळी कामे विशिष्ट मशीनद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे.

मूलभूतपणे मंदिर म्हंणजे प्रत्येकासाठी एक शक्तिशाली यंत्र तयार करण्याची प्रक्रिया होती. परंतु आजच्या जगात बर्‍याच सार्वजनिक जागांची देखभाल करणे अवघड झाले आहे, म्हणून खासगी गोष्टी अधिक प्रमाणात तयार केल्या जात आहेत.

प्रश्न:यंत्राच्या उपस्थितीचे काय फायदे मिळतात? हे केवळ आध्यात्मिक प्रवृत्तीसाठी आहे की त्याचे अधिक भौतिक फायदेसुद्धा आहेत?

सद्गुरु:यंत्रे ही वेगवेगळ्या आयामांमध्ये आपले आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी वापरलेली साधने आहेत. ते विशिष्ट उद्दीष्टांनी बनविलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिध्वनीत होतात. ज्या प्रकारची उर्जा तयार करायची आहे ते पाहून आपण त्या प्रकारचे यंत्र तयार करू शकतो. सर्वात मूलभूत यंत्र म्हणजे एक साधा त्रिकोण. ऊर्ध्वगामी त्रिकोण हा एक प्रकारचे यंत्र आहे, आणि खालच्या दिशेने असलेला त्रिकोण हा आणखी एक प्रकार आहे. आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मिसळू शकता आणि विविध यंत्रे बनवू शकता.

उदाहरणार्थ, भैरवी यंत्र आपल्या कल्याणकारीतेसाठी आहे. आपण जे काही कराल ते आपण भैरवी यंत्राच्या सहाय्याने अधिक चांगले करू शकता. हे एक अतिशय सामर्थ्यवान, वैयक्तिकृत साधन आहे जे एक निश्चित अशी जागा आणि वातावरण तयार करते जेणेकरून आपल्या कल्याणाची नैसर्गिकपणे काळजी घेतली जाईल. हे त्यांच्यासाठी आहे जे व्यवसाय, करिअर आणि कौटुंबिक जीवनात सक्रियपणे गुंतलेले आहेत आणि जगात बर्‍याच गोष्टी करु इच्छित आहेत.

माणसाला पूर्ण क्षमता शोधण्याची परवानगी न देणारी एक मुख्य गोष्ट म्हणजे मतभेद किंवा संघर्ष. मतभेद याचा अर्थ असा नाही की आपण कोणाशी तरी भांडण कराल. परंतु जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपल्याभोवतीचा संघर्ष वाढतो. आपण किती अंतर टिकाल हे आपण संघर्ष पातळी किती कमी ठेवता ह्यावर अवलंबून असते. जर घर्षण वाढत असेल तर आपल्याला कामांपासून दूर रहावे लागेल किंवा आपण मोठ्या गोंधळात अडकाल. काही फरक पडत नाही कि आपल्यासाठी एखादे ध्येय किती महत्वाचे आहे, जेव्हा दररोज आपण संघर्षामध्ये घराबाहेर पडलात आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न केलात तर आपले हळू हळू आपल्या त्या प्रिय ध्येयाकडे दुर्लक्ष होईल. मी म्हणेन की ८०% मानव त्यांच्या जीवनात काय कार्य करू शकतात याची जी शक्यता आहे ती आपण मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे कारण कामाच्या धामधूमीत निर्माण होणाऱ्या संघर्षाला किंवा घर्षणाला नैसर्गिकरित्या ते सामोरे जाऊ शकत नाहीत. यास सामोरे जाण्याचा हा खूप अद्यावत मार्ग नाही कारण वंगण वापरण्याऐवजी आपण इंजिन बंद ठेवत आहात.

ज्यांना त्यांच्या कृती किंवा कामामध्ये देवीच्या कृपेचे वंगण घालण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आम्ही भैरवी यंत्र तयार केलं आहे जेणेकरून आपण विविध गोष्टींमध्ये सहभागी व्हाल पण मतभेद होणार नाहीत. तिची उपस्थिती त्या गोष्टीची काळजी घेईल.

प्रश्न:लिंग भैरवीची दोन यंत्रे आहेत. तुम्ही भैरवी यंत्राविषयी बोललात. दुसरे - अविघ्न यंत्र - हे पहिल्यापासून वेगळे कसे आहे?

सद्गुरु:मूलतः ते दोन्ही सारखे आहेत. दुसरे फक्त आकाराने मोठे आहे. आमचा अंदाज आहे की घरं २०००-२५०० चौरस फूटांदरम्यान असल्यास भैरवी यंत्र आपले काम करेल. त्यापेक्षा मोठ्या घरांसाठी, आम्ही म्हणालो की ते पुरेसे नाही आणि आम्ही अविघ्न देऊ केले. अविघ्नाकडे थोडा अधिक व्यवसायिक दृष्टीकोन आहे, अधिक यश आणि समृद्धीसाठी. माणूस जे काही करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यात नेहमीच विविध अडथळे असतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असलेल्या अडथळ्यांना पार करण्यास सक्षम आहे की नाही हे यशाचे मोजमाप आहे. अविघ्न यंत्र एखाद्याच्या जीवनातील अडथळे बाजूला ढकलण्यासाठी बनवले आहे. हे अडथळ्यांना दूर करण्यासाठी बनविलेले विशिष्ट स्वरूप आहे.

अर्थात, ज्यांना याचा उपयोग आध्यात्मिक प्रक्रियेसाठी करायचा आहे ते नेहमीच तो करू शकतात. तो नेहमीच मूलभूत घटक आहे. लोकांना जे काही करायचे आहे त्यात त्यांना मदत करणे ही ह्यामागची कल्पना आहे. अविघ्न विविध गोष्टींसाठी आहे. आध्यात्मिक एक मूलभूत घटक आहे परंतु जर आपल्याला अध्यात्मामध्ये गती नसेल आणि फक्त पैसे कमवायचे असतील तरी हे यंत्र आपल्या इंजिनासाठी वंगणाचे काम करेल. आपल्याला आपली कार कुठे चालवायची आहे हे आपल्यावर अवलंबून आहे.

प्रश्न:पारंपारिक यंत्रांमध्ये बहुतेक वेळा मध्यभागी बिंदूचे चिन्ह असते. तथापि, लिंग भैरवी यंत्रावर, मध्यभागी एक लिंग आहे, जो यंत्राला एक वेगळे वैशिष्ट्य देतो. आपण अशी रचना का केली?

सद्गुरु:लिंग भैरवी यंत्र कोणत्याही प्रकारे प्रतिकात्मक नाही - हा एक संपूर्ण भौमितिक नमुना आहे. हे एक प्रकारचे यंत्र (machine) आहे - त्यास काहीतरी कार्य करावे लागेल आणि काहीतरी द्यावे लागेल. प्रत्येक यंत्रणा म्हणजे मूलत: आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या कार्यक्षमतेत वाढ असते. आपण चालू शकतो, परंतु सायकलने आपण बऱ्याच वेगाने जाऊ शकतो. आपण बोलू शकतो, परंतु फोनद्वारे आपण खूप लांबवर बोलू शकतो. लिंग भैरवी यंत्र अनुभवजन्यत: कार्यरत आहे. हे विशिष्ट उद्दीष्टे पूर्ण करते आणि विशिष्ट क्रियाशीलता किंवा क्षमता आपल्याला देऊ करते.

हे यंत्र एक प्रकारची जटिल व्यवस्था आहे. तांब्याचं ताट फक्त पाया आहे. बिंदू मूळ स्वरूपाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे, जे आपण लंबवर्तुळाकार किंवा लिंग म्हणून ओळखतो. जेव्हा आपण मोठा बिंदू पाहतो आणि तो एक साधा ठिपका म्हणून दर्शविला जातो, तेव्हा तो एक अप्रत्यक्ष लंबवर्तुळाकार किंवा लिंग असतो. दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर लिंग हा बिंदूची अधिक स्पष्ट अभिव्यक्ती आहे. ही अभिव्यक्ती लिंग भैरवी यंत्राद्वारे, खूपच स्पष्ट होते.

लिंग भैरवी यंत्र प्रामुख्याने लिंगाच्या आकारामुळे आणि सामग्रीच्या स्वरूपामुळे कार्य करते. बहुतेक उर्जेची आज्ञावली (सॉफ्टवेअर) लिंगात लिहिलेले आहे. यंत्राचे उर्वरित भाग पायासारखे जास्त असतात, ज्यात विशिष्ट प्रमाणात सॉफ्टवेअर देखील आहे, परंतु हे केवळ स्थिरतेसाठी आहे. आपण कोणत्याही पदार्थातून किंवा कोणत्याही प्रकारापासून प्रचंड सामर्थ्य निर्माण केल्यास आपण स्थिरतेचा योग्य आधार तयार केल्याशिवाय ते स्वतःच नष्ट होऊन जाईल. जर वातावरण स्थिर असेल तर ते मोठ्या प्रमाणात प्रतिध्वनीत होऊ शकते. हे घरांना आणि लोकांना अभूतपूर्व मार्गाने ऊर्जा देऊ शकते आणि तरीही खूप मोठ्या कालावधीतदेखील ते नष्ट होणार नाही. जर आपण आपले भैरवी यंत्र पाच, सहा किंवा दहा पीढ्यांकडे देत राहिलात तरी ते तेव्हाही जिवंत राहील.

अभिव्यक्ती

भैरवी यंत्र ज्यांनी त्यांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी ठेवल्या आहेत अशा व्यक्तींनी त्यांचे जीवन कसे बदलले याचा अनुभव व्यक्त केला आहेः

एडलविस कॅपिटल लिमिटेडच्या हेड ऑफ बिझिनेस सोल्यूशन्स अँड आयटी, कल्पना मनियार यांनी लिंग भैरवी यंत्र त्यांच्या घरात असल्याचा अनुभव सांगितला: “देवीचे आमच्या घरी येणे खूपच मोठा अनुभव होता. आमचा दिवस तिच्यापासून सुरू होतो आणि शेवटहि तिच्याजवळच होतो. तिची निनादणारी उपस्थिती घरात जाणवत राहते. कठीण परिस्थितीतही गोष्टी अतिशय सुंदर रीतीने जागच्या जागी घडतात. शांतता आणि आनंदाची ती एक अमूल्य जाणीव आहे जी तिने आपल्यासोबत आणली आहे. आमच्या घरी येणारे बाहेरचे लोकसुद्धा तिची उपस्थिती नाकारू शकत नाहीत. माझे घर आणि कुटूंब ह्यांच्यावर कृपा केल्याबद्दल, मी देवी आणि सद्गुरुंसमोर फक्त नतमस्तक होऊ शकते. तिच्यासोबत राहण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल आम्हाला खरोखरच धन्य वाटते.”

एन्डोस्कोपी सर्जन विपुलरॉय राठोड यांनी मुंबईतील एन्डोस्कोपी एशियामध्ये आपल्या क्लिनिकमध्ये अविघ्न यंत्राचा अभिषेक केला आहे. ते यंत्राचा त्यांच्या कार्यस्थळावर असलेल्या गहन प्रभावाविषयी बोलतात. “सद्गुरुंनी लिंग भैरवी अविघ्न यंत्र देऊन आम्हाला आशीर्वादित केल्यामुळे आमाच्या जीवनात अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत. मी एक सर्जन आहे. ज्या क्षणी रूग्ण आमच्या युनिटमध्ये पोचतात, त्या क्षणी त्यांना शांती व प्रसन्नतेची तीव्र भावना जाणवते. पवित्र जागेत राहण्याचे आणि काम करण्याचे महत्त्व ह्याबद्दल सद्गुरू नेहमीच का बोलतात हे मला समजण्यास सुरवात झाली आहे.”

यंत्राने त्यांचे जीवन कसे बदलले यावर त्यांची पत्नी पूर्णिमा म्हणते. "आमच्याकडे अविघ्न यंत्र आल्यापासून, आम्ही सर्व स्तरांवर आमचे प्रचंड हित अनुभवले आहे: जसे कि आपले शारीरिक आरोग्य, भावनिक स्थिरता, आध्यात्मिक वाढ तसेच भौतिक वाढ.