पुष्कळ लोकांना धुम्रपान आणि इतर व्यसनांतून बाहेर यावसं वाटतं, पण पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा त्यांना ते जमत नाही.  या लेखात, सदगुरू ह्यामागे असलेल्या मानसिक आणि शारीरिक कारणांचा उलगडा करून, कसे आपण यातून आपली सुटका करू शकतो याचे शास्त्रीय विवेचन करत आहेत.

Read in Telugu: పొగత్రాగడం, మద్యం సేవించడం ఎందుకు..?

प्रश्नकर्ता – मी फार स्मोकिंग करतो. यातून कसा बाहेर पडू शकेन?

सदगुरू – आज सर्व मादक किंवा उत्तेजक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल आज पुरेशी जागृती झाली आहे. आधी तर लहानशा आकारात सिगरेटच्या पाकिटावर छापलेलं असायचं की – "धुम्रपान करणे आरोग्यास घातक आहे." आज लिहिलेलं असतं – तेही ठळक मोठ्या अक्षरात "धूम्रपानाने मृत्यू होतो" किंवा "धूम्रपानाने कॅन्सर होतो."

कॅन्सर होणं हा काही गुन्हा नाही. तुम्हाला त्यात मजा वाटत असेल तर होऊ द्या कॅन्सर. तुम्हाला जे करावसं वाटतं ते करा; पण त्या आधी समजून घ्या की, तुमच्या प्रत्येक कृतीचा ठराविक परिणाम होणार आहे. हे  परिणाम जेंव्हा समोर येऊन उभे राहतील – मग ते काही का असेनात – ते तुम्ही आनंदाने स्वीकारू शकलात तर काहीच हरकत नाही,  तुम्हाला हवं ते करा. पण जर परिणामांना सामोरं जातांना तुम्हाला रडू येणार असेल तर आपण काय करत आहोत ह्याबद्दल सजग राहा. आयुष्य अगदी साधं-सरळ आहे. यात नैतिकतेचा काहीही संबंध नाही. परिणाम काय होतील हे जाणून न घेता जो मुर्खासारखं वागतो शेवटी त्याला सोसावं लागणारच.

शरीर – एक पर्यावरणपूरक यंत्र

धुम्रपान करणं हा एक अगदी मूर्खपणा आहे. कारण, मानवी शरीर प्रणाली पर्यावरण पूरक मशीन आहे.  ते धूर फुकण्यासाठी निर्माण केलेलं नाही.  आजकाल रस्त्यावर धावणारी वाहनं धूररहित कशी करायची ह्यासाठी जगभरात इंधन आणि मशीनं ह्यावर अब्जावधी रुपयांचं संशोधन सुरु आहे. आणि तुम्ही मात्र धूररहित अशा ह्या शरीराचं धुराडं करत आहात. काय म्हणावं तुम्हाला? हा मूर्खपणा नाही तर काय आहे? तुम्ही हे लक्षात घेतलंत की हळूहळू ही सवय सुटेल.

स्व-स्वभावाने मद-मस्त

ह्यामागे एक विशिष्ट शरीरांतर्गत रासायनिक प्रणाली काम करते. निकोटीन म्हणा, कॅफिन म्हणा, किंवा असंच इतर काही म्हणा; तुमची अंतर्गत प्रणाली त्यावर अवलंबून आहे. त्यात बदल घडवून आणता येऊ शकतो. तुम्ही पहाल, जेंव्हा तुम्ही शांभवी महामुद्रा (ईशा ध्यान-योग जो इनर इंजिनियरिंग म्हणून ओळखला जातो)  कराल तेंव्हा तुम्हाला जाणवेल की, अचानक तुमचं संपूर्ण शरीर उर्जेने भारून गेलं आहे. त्यानंतर मग सिगरेट, कॉफी, चहा असं काहीही पिण्याची गरजच तुम्हाला वाटणार नाही. त्यानंतर कधीतरी एकदा कॉफी प्यावी किंवा धुम्रपान करावंसं वाटलं आणि ते केलं तरी ते केवळ आनंदापोटी कराल. त्या मागचं अनावर व्यसन आणि शारीरिक अवलंबन संपुष्टात येईल.

लोकांना "हे करू नका, ते करू नका" असं सांगण्यावर माझा विश्वास नाही.  मी सांगितलं तरी, तुम्ही जेमतेम मिनिट-दोन मिनिट हातातली ती सिगरेट खाली ठेवाल आणि मग परत 'पुफ, पुफ, पुफ...' धुराडं सुरु होईल, कारण आयुष्यात तो तुमचा एक फार मोठा अनुभव आहे. तुमच्यासाठी तो एक सर्वात सुंदर अनुभव आहे. पण, सिगरेट, दारू, सेक्स, ड्रग्स, किंवा तुम्ही आजवर ज्याचा अनुभव घेतला आहे; त्या सर्वाहून देखणा, उत्कट अनुभव मी तुम्हाला दिला तर मग मला तुम्हाला काही सांगायची गरज राहील का की, "हे करू नका, ते सोडून द्या"?

हि सगळी व्यसनं आपोआप गळून पडतील. शरीरांतर्गत नैसर्गिक रासायनिक प्रणालीतून कसं उल्हासित, आनंदित होता येतं हे जर तुम्ही जाणलं की, मग तुम्ही आयुष्यात परत कधी सिगरेटला हात लावणार नाही किंवा दारूचा थेंबसुद्धा घेणार नाही. शांभवी महामुद्रा जाणून घेतांना पहिल्याच दिवशी तुम्ही एका जागी बसून ती करता आणि उत्कट आनंदाने भारून जाता. आणि मग तुम्ही कुठलंही व्यसन सोडावं असं तुम्हाला मी सांगण्याची गरजच उरणार नाही.  अचानकपणे तुमचं जीवन सुरळीत होऊन जातं.

डि-व्हाईनची (Di-Vine) धुंद

मी आजवर कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन केलेलं नाही. पण माझे डोळे पाहाल तर मी नेहमी तर्र असल्यासारखा दिसतो. दिवसाचे चोवीस तास मी मद्यधुंद राहू शकतो, शिवाय हँगओव्हर होणार नाही ह्याची हमखास ग्यारंटी देतो. त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने अगदी उत्तम. दारू, ड्रग्स, वगैरे ह्या गोष्टी आपण नर्सरी, बालवाडीसारख्या वस्तूप्रमाणे पाहतो. कारण या सर्वाहून, आपल्या प्राकृतिक जीवनाची तरतरी हजारो पटींनी जास्त धुंद  करणारी आहे. म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष 'डिव्हाईन'मुळे जर धुंदी मिळेल तर निव्वळ वाईन कशाला?

causes of cancer

Editor’s Note: Isha’s latest ebook, Cancer – A Yogic Perspective, gives Sadhguru’s insights on the various causes of cancer and what can be done to go beyond the disease. The book includes methods and practices to help one lead a healthy and joyful life. The book is available on a “name your price” basis. Pay what you want and download it.

Download the e-Book