नविन वर्षाची सुरूवात १ जानेवारी ला न होता गुढीपाडवा हाच नवीन वर्षाची सुरूवात असण्यामागे एक विशेष महत्त्व आहे. ज्यापद्धतीने आपल्या ग्रहावर, आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये जे बदल घडत असतात त्यामुळे त्याला एक विशेष महत्व आहे. गुढीपाडवा हे चंद्र-सौर कॅलेंडरप्रमाणे आहे, ज्याचा मानवी शरीर रचनेच्या जडणघडणीशी थेट संबंध आहे. भारतीय दिनदर्शिका फक्त सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा फार महत्त्वाची आहे कारण ती आपल्याला आपल्या ग्रहाच्या हालचालीबरोबर जोडते.

चंद्रमान गुढीपाडवा हे चंद्र-सौर कॅलेंडरनुसार नविन वर्षाची सुरूवात आहे. ज्याचं भारतीय लोकांनी अनेक शतकांपासून मोठ्याप्रमाणात अनुसरण केले आहे. ज्याप्रमाणे इतर पुष्कळ गोष्टी पूर्वेकडील संस्कृतीतून येतात, त्याच प्रमाणे अगदी हे कॅलेंडर सुद्धा मानवी शरीर रचना आणि जागृती लक्षात ठेवून, त्याला सहायक ठरण्याच्या दृष्टीने निर्माण केले आहे. गुढीपाडव्यापासून २१ दिवसांत पृथ्वीच्या झुकावामुळे उत्तर गोलार्धात सुर्याची जास्तीत जास्त प्रमाणात उर्जा पोहोचते. जरी ती काही लोकांना वाढत्या तापमानामुळे असह्य वाटत असली तरी, हि ती वेळी आहे जेव्हा पृथ्वीची ब्याटरी चार्ज केली जाते. गुढीपाडवा हा समसमान रात्रदिवसांच्या अमावस्येनंतरचा पहिला दिवस असल्यामुळे एक नविन सुरूवातिचे द्योतक आहे.

गुढीपाडव्यामागे एक विज्ञान आहे जे मानवी जीवन अनेक प्रकारे समृद्ध करते.

उष्ण वातावरणाच्या काळाच्या तयारीसाठी समशीतोष्ण कटिबंध प्रदेशांमध्ये, लोकं वर्षाच्या ह्या काळात थंडाव्यासाठी एरंडेल तेलाचा भरपूर वापर करतात. आधुनिक कॅलेंडर हे मनुष्याचा पृथ्वीशी असलेला घनिष्ट संबंध आणि अनुभव हिशेबात घेत नाही. चंद्रमान-सौर कॅलेंडरमध्ये मानवी आयुष्यातील अनुभव आणि प्रभाव ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे ते कॅलेंडर अक्षांशानुसार बनवली गेली आहे.

गुढीपाडवा ही काही एक सोय म्हणून किंवा केवळ एक श्रद्धा म्हणून नविन वर्ष म्हणून साजरा केला जात नाही. त्यामागे एक विज्ञान आहे जे आपल्या मानवी जीवनाच्या समृद्धीला वेगवेगळ्या पद्धतीने वृद्धिंगत करते. ह्या राष्ट्राची प्रगल्भता कुचकामी ठरवली जात आहे, ती फक्त ह्या एका कारणासाठी की आर्थिकदृष्ट्या इतर काही देश आपल्यापेक्षा जरा अधिक पुढे गेले आहेत म्हणून. आपण सुद्धा लवकरच अर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ पण आपल्या संस्कृतीची असलेली प्रगल्भता ती काही लगेच काही वर्षांमध्ये निर्माण करता येणार नाही. ते हजारो वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे.


 एका साध्या गोष्टीने तुम्ही तुमच्या नविन वर्षाची सुरूवात करू शकता. जेव्हा तुम्ही कोणाला फोन करता हाय, हॅलो किंवा दुसरं काहीही न म्हणतां , नमस्ते किंवा नमस्कार किंवा नमस्कारम किंवा वणक्कम म्हणा. असे शब्द उच्चारण्याला ही तुमच्या जीवनात एक महत्त्व आहे. कुठे तुम्ही काय म्हणतां किंवा जे देवासाठी करता, तेच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर करा. जगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

जर तुमच्यासाठी काही गोष्टी पवित्र आहेत आणि काही अपवित्र आहेत तर मग तुम्ही ह्या सगळ्यांचा सार विसरत आहात. ह्या नविन वर्षाला तुम्ही एक शक्यता बनवा जेणेकरून प्रत्येक मनुष्यांमध्ये दडलेलं दैवी तत्व तुम्ही ओळखू शकाल.

Love & Blessings

Indian Culture