विद्यार्थिनी: सद्गुरु, मी दहावीला आहे आणि लोकं म्हणतात कि या वयामध्ये, मी भविष्यात काय करणार आहे याची किमान ढोबळ कल्पना मला असायला हवी. मी कशाचा तरी विचार केला, पण मला याची खात्री नाही कि मी करणार असलेली हि गोष्ट योग्य आहे. मी अशा प्रकारची परिस्थिती कशी हाताळू?

सद्गुरु: जे लोकं आपल्या भविष्याबद्दल बरंच काही विचार करतात ते फक्त त्यांच्या भविष्याबद्दलच विचार करत राहतात. तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करण्याची गरज नाही. तुमचे वर्तमान चांगले करा - भविष्य तुमच्याबरोबर आपोआप घडेल. तुम्ही जर भविष्याचा खूपच विचार केला, तर भविष्य आणखी पुढे ढकललं जाईल, आणि मग “अंतिम भविष्य” येईल - ते म्हणजे अंत्यसंस्कार.

स्वत: ला सुसज्ज करा

तुम्हाला असलेला जीवनाचा अनुभव आणि जीवनात तुम्ही पाहिलेल्या गोष्टी या मर्यादित आहेत, तुम्हाला आत्ताच निर्णय घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःला सुसज्ज करावे लागेल - तुमची शरीर तयार करा, मेंदू विकसित करा, गोष्टींचे उच्च स्तरावर आकलन करण्याची क्षमता तयार करा. आपल्या मार्गात काय येईल हे आपल्याला माहित नाही. आणि काहीही आपल्या मार्गावर येण्याची गरज नाही. कदाचित आपण असे काहीतरी तयार करू जे आजपर्यंत कुणीच केले नाही.

तुम्ही जर आत्ताच विचार करायला सुरवात केली कि, "भविष्यात मी काय करायला पाहिजे?" तर तुम्ही लोकांनी आधीपासूनच केलेली एखादी खुळचट गोष्ट कराल. लोकांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना म्हणजे, "मी डॉक्टर होणार", "मी इंजिनीर बनणार". हे फक्त एक उत्तम उदरनिर्वाह कमावण्याबद्दल आहे. या शाळेत वाढलेल्या मुलांनी कधीही रोजीरोटीची चिंता करू नये अशी माझी इच्छा आहे. तुमच्या डोक्यामध्ये पूरेशी अक्कल आहे. तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाची चिंता करण्याची गरज नाही. जर तुम्ही जगात काही करू शकला नाहीत, तर माझ्याकडे परत या. मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला करण्यासाठी काहीतरी छान गोष्ट देईन.

आजकाल बऱ्याच शैक्षणिक संस्था कोणत्याही प्रकारच्या प्रतिभेबद्दल पूर्णपणे असंवेदनशील असतात. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची क्षमता दाखवली तर त्यांना ते आवडत नाही. तुम्ही फक्त हे, हे आणि हेच केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. तुम्ही जर इतर काही केलंत, तर ते म्हणतील, "नाही". या ग्रहावरील असे बरेच लोकं ज्यांनी अविश्वनीय गोष्टी केल्या आहेत ते सर्व दुर्दैवाने शाळा अर्धवट सोडलेले आहेत. याचं कारण असं नाही कि त्यांना शाळेचा तिटकारा होता पण शाळेला प्रतिभेचा तिटकारा होता.

जेव्हा आम्ही ईशा होम स्कूल तयार केले, तेव्हा माझा मूलभूत निर्देश हाच होता, "तुम्हाला प्रतिभा ओळखता आली पाहिजे. प्रापंचिक कसेही घडेलच. कसं तरी प्रत्येकाला नोकरी मिळेलच. मुद्दा तो नाही. एक जीवन म्हणून, कोणत्या महान गोष्टी या जीवनाबरोबर घडतात, तेच महत्वाचं आहे.”

तुमच्या भविष्यबद्दल काळजी करू नका. फक्त वर्तमान खरोखर चांगलं करा. भविष्य आपोआप बहरेल.