सद्गुरू: दरवर्षी ८,००,००० लोकं या जगात आत्महत्या करत आहेत. हे सर्व खुनांचे गुन्हे आणि युद्धातील मृत्यू यांच्या एकत्रित संख्येपेक्षाही अधिक आहे. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक चाळीस सेकंदाला एक व्यक्ती स्वत: चा जीव घेत आहे. हे फक्त तेंव्हाच, जेंव्हा आपण ओळखत असलेल्या एखाद्याचा मृत्यू होतो किंवा जेंव्हा आपल्या समाजातील एखादी लोकप्रिय किंवा महत्त्वपूर्ण व्यक्ती मरण पावते, तेंव्हा प्रत्येकजण जागा होतो.

आत्महत्येच्या विचारांना कारणीभूत काय आहे?

माणसाला स्वत:चा जीव का घ्यावासा वाटेल? काही जण त्यांच्या आयुष्यातील परिस्थितीमुळे आत्महत्या करत असतील, परंतु बरेचसे लोकं त्यांच्या मानसिक परिस्थितीमुळे आत्महत्या करत आहेत.

जेंव्हा ते स्वतःच्या स्वभावानेच आनंदी असतील, तर कोणीही स्वतःचा जीव का घेईल? कोणीही का उदास असेल?

आम्ही आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये असं काहीच रुजवलं नाही जे आपल्या शारीरिक आणि मानसिक संरचनेचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगते. बहुतेक माणसांना स्वतःची बुद्धिमत्ता कशी हाताळायची हे शिकवले जात नाही. जर तुम्हाला आत्ता असलेल्या मेंदूपेक्षा अर्धा मेंदू असता, तर तुम्हाला कसलेही मानसिक आजार होणार नाहीत. आता, तुमच्याकडे बुद्धिमत्तेची एक विशिष्ट पातळी आहे पण तुम्हाला एक तर ते वापरण्याचं प्रशिक्षण नाही किंवा ते तुमच्या कल्याणासाठी कसे वापरता येईल हे शिकवणाऱ्या सामाजिक परिस्थितीत तुम्ही राहत नाही. म्हणून तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमच्या विरोधात काम करत आहे. हे एवढं निराशाजनक दिसतं कि जसं काही यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. हे लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते.

हे अगदी सहजपणे थांबवले जाऊ शकते जर तिथे एक उचित प्रणाली असती जिथे लहानपणापासूनच प्रत्येकाला काही विशिष्ट प्रक्रिया शिकवल्या गेल्या असत्या जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या स्वभावानेच आनंदी बनले असते, त्यांचा आयुष्याचा अनुभव नैसर्गिकरित्या आनंदमय झाला असता. जेंव्हा ते स्वतःच्या स्वभावानेच आनंदी असतील, तर कोणीही स्वतःचा जीव का घेईल? कोणीही का उदास असेल?

नैराश्यातून बाहेर पडणे

"नैराश्य" हा शब्द केवळ चिकित्साविषयक नैराश्य नाही आहे. जर आज तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी चुकीच्या झाल्या तर तुम्ही सौम्य निराश होऊ शकता. माझ्या मते बहुतेक लोकं आयुष्यातील काही परिस्थितीमुळे एकदा किंवा कधीतरी निराश होतात. परंतु काही तासातच ते स्वतःशी बातचीत करून त्यातून बाहेर पडतात. ते त्यासाठी एखादी प्रेरणा वापरतील - त्यांचं कुणासाठी असलेलं प्रेम, राष्ट्र, किंवा इतर काहीतरी जे त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे - आणि त्यातून स्वतःला सांभाळून घेतील. एकतर तुम्ही स्वतःशी बोलून त्यातून बाहेर निघाल किंवा तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये बोलाल, आणि मग ते तुमच्याशी बातचीत करून तुम्हाला त्यातून बाहेर काढतील; अन्यथा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्याल.

जर नैराश्यातून पडण्याचा कोणताही मार्ग नसेल, तर एक मनोवैज्ञानिक तुमच्या सोबत बसून कित्येक तास चर्चा का करेल? अर्थातच, त्यांना ठाऊक आहे कि ते तुमच्याशी बातचीत करून तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतात. अन्यथा रासायनिक मदत आहेतच. रसायनशास्त्राच्यादृष्टीने विचार केला तर हि मानवी यंत्रणा या ग्रहावरील सर्वात अत्याधुनिक कारखाना आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे कि तुम्ही या रासायनिक कारखान्याचे उत्कृष्ट व्यवस्थापक आहात किंवा नालायक व्यवस्थापक आहात. योगाचा अर्थ असा आहे कि तुम्ही तुमच्या स्वतःच्या रासायनिक कारखान्याचे एक अतिशय कार्यक्षम व्यवस्थापक बनता.

योगाद्वारे आत्महत्या रोखणे

योगाने कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे यात काही शंका नाही. आपल्याकडे पुरेशी अनुभवातून माहिती आहे जे सिद्ध करते की ते काम करते. परंतु आता रक्त चिन्हकांचा अभ्यास केला जात आहे आणि आपण स्पष्टपणे पाहत आहोत की योगिक पद्धतींद्वारे अगदी अनुवांशिक प्रकृतीदेखील बदलत आहेत.

…आता रक्त चिन्हकांचा अभ्यास केला जात आहे आणि आपण स्पष्टपणे पाहत आहोत की योगिक पद्धतींद्वारे अगदी अनुवांशिक प्रकृतीदेखील बदलत आहेत.

हे स्पष्टपणे दर्शवते कि तुम्ही केवळ योग्य साधना करून या मानसिक आजारांना प्रतिबंधित करू शकत नाही तर तुम्ही जर ते योग्य मार्गाने केले तर तुम्ही त्यातून बाहेरही येऊ शकता. फक्त एक समस्या अशी आहे कि जेंव्हा एखादी व्यक्ती मानसिक उदासीनतेच्या स्थितीत असते तेंव्हा त्यांना योगिक सराव करण्यास भाग पाडणे हे एक मोठे आव्हान असते. जोपर्यंत त्यांच्या सभोवताली समर्पित लोकं नाहीत, जे त्यांना असे करण्यासाठी दररोज सर्व प्रकारे मदत करतील, तोपर्यंत तसे होणार नाही. मी असे तुम्हाला हजारो लोकं दाखवू शकतो जे असं करून असंख्य मानसिक समस्यांतून बाहेर पडले आहेत, कारण आम्ही त्यासाठी एक समर्थ वातावरण तयार करतो. असं प्रत्येक घरात घडवणं कदाचित शक्य होणार नाही. प्रश्न फक्त विनियोगाचा आहे. तथापि, अशी काही रोगनिदानविषक प्रकरणे आहेत जी फार कठीण आहेत. आम्ही अशा प्रकारची प्रकरणे देखील पहिली आहेत आणि त्यांचा औषधांचा स्तर सार्थपणे खाली आणला आहे.