Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
जर तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःवर काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुम्ही एकटे आहात म्हणून एकाकी नाही आहात; तर तुमच्या भोवतालच्या सर्व गोष्टींचा तुम्ही स्वीकार करत नाही, म्हणून तुम्ही एकाकी आहात.
व्यवसायाची निर्मिती मानवी कल्याणासाठी झाली आहे; मानवाची निर्मिती व्यवसायाच्या कल्याणासाठी झालेली नाही.
आत्मविश्वास आणि मूर्खपणा हे एक अत्यंत धोकादायक मिश्रण आहे, पण ते अनेकदा एकत्रच आढळतात.
मला जे काही ज्ञात आहे, माझ्या गुरूंना जे ज्ञात होतं आणि संपूर्ण आध्यात्मिक परंपरेला जे ज्ञात होतं, ते सर्व काही ध्यानलिंगामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात आहे. मी फक्त एक परिणाम आहे.
योग म्हणजे महामानव बनणे नव्हे, तर 'मानव असणे' हीच महान गोष्ट आहे हे जाणून घेणे.
जर तुम्ही सर्वोच्च शक्यतेसाठी प्रयत्नशील राहून तुमचे जीवन जगलात, तर त्या प्रयत्नांमध्येच मुक्ती आहे.
शांतता आणि आनंद या अशा गोष्टी नाहीत, ज्या तुम्हाला जीवनाच्या शेवटी प्राप्त होतात; त्या जीवनाचा मूलभूत पाया आहेत.
तुम्हाला जे मिळते, त्यातून केवळ उदरनिर्वाह होतो; पण तुम्ही जे देता, त्यातूनच खरे जीवन घडते.
तुम्हाला आनंद निर्माण करावा लागत नाही. जर तुम्ही दुःखाची निर्मिती केली नाही, तर तुम्ही आनंदी राहाल.
जर तुम्ही लग्नाला एक 'संस्था' म्हटले, तर लोक स्वाभाविकपणे त्यातून सुटका करून घेण्याची इच्छा बाळगतील.
तुमचे आंतरिक कल्याण खुद्द ईश्वर देखील ठरवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःला दुःखी करण्यास नकार दिला, तर कोणीही तुमच्यावर दुःख लादू शकत नाही.