Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
प्रत्येक गोष्ट अशी करा की जणू काही ती शेवटचीच गोष्ट आहे. मागे रोखून ठेवण्यासाठी काहीही नाही, नंतर राखून ठेवण्यासाठी काहीही नाही.
जो सतत दिशा बदलत फिरतो, साहजिकच त्याला कुठेही जायचं नसतं.
जेव्हा तुम्हाला कोणती निवड करावी हे समजत नाही, तेव्हा प्रत्येक गोष्टीत पूर्णपणे सहभागी व्हा. मग जीवनच निवड करेल, आणि ती निवड कधीच चुकीची नसते.
काहीतरी अद्भुत निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या बुद्धिमत्तेची किंवा पात्रतेची गरज नसते - गरज असते ती केवळ आपण करू इच्छित असलेल्या गोष्टीप्रती असलेल्या संपूर्ण समर्पणाची.
मते ही मोतीबिंदूसारखी असतात; ती तुम्हाला स्पष्टपणे पाहू देत नाहीत.
विजयादशमी हा विजयाचा उत्सव आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवता, तेव्हाच जीवनाचे भव्य स्वरूप उलगडते.
जे केवळ ज्ञानाचीच नव्हे, तर शरीराच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याचीही आकांक्षा बाळगतात, ते स्वाभाविकपणे दैवी स्त्रीतत्त्वाच्या सात्त्विक स्वरूपाचा शोध घेतात. सरस्वती हे त्याच रूपाचे साक्षात मूर्त स्वरूप आहे.
जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समतोल. जर समतोल नसेल, तर तुमचं शरीर आणि मन तुमच्या विरोधात काम करतील.
आपल्याला गरज आहे ती कृतज्ञतेच्या भावनेची - आपण श्वास घेतो त्या हवेबद्दल, पितो त्या पाण्याबद्दल, खातो त्या अन्नाबद्दल, वापरतो त्या वस्तूंबद्दल आणि प्रत्येक क्षणी आपल्या जीवनाला साहाय्य करणाऱ्या प्रत्येक जीवनाबद्दल.
जगात ज्या गोष्टी घडत आहेत त्या जर तुमच्या इच्छेनुसार नसतील, तर किमान तुमच्या आत ज्या गोष्टी घडत आहेत त्या तरी तुमच्या इच्छेनुसार असायला हव्यात.