Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
तणावाच्या स्थितीत तुम्ही गोष्टींचे आकलन करू शकत नाही. शिथिलतेच्या स्थितीतही तुम्ही आकलन करू शकत नाही. जेव्हा तुम्ही एकाच वेळी तीव्र आणि शिथिल असता, फक्त तेव्हाच तुम्ही सर्व गोष्टींचे आहे तसे आकलन करू शकता.
आपल्या पूर्वजांशिवाय आपलं अस्तित्वच नसतं. मागील पिढ्यांनी दिलेल्या योगदानाची कदर करणं हेच शहाणपण आहे.
करुणा ही सर्वाधिक मुक्त करणारी भावना आहे.
आकलन हाच योगाचा गाभा आहे. तुमचे आकलन जितके सखोल, तितका तुमचा अनुभव अधिक गहन, आणि तुमची जाणीव तितकीच समृद्ध असते.
भक्ती ही अशी एक अवस्था आहे जिथे तुमचे अस्तित्व उरत नाही – जीवन केवळ तुमच्या माध्यमातून एका विशिष्ट माधुर्याच्या आणि सौंदर्याच्या रूपात प्रवाहित होत असते.
जर तुमच्या स्वतःच्या इच्छांपेक्षा तुमच्या आसपासची माणसं तुम्हाला अधिक महत्त्वाची वाटू लागली, तर तुमचं जीवन साधं आणि अद्भुत असेल.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांना तुम्ही खरोखर वेगळे करू शकत नाही. आरोग्य हे समग्रपणे घडून येते.
महात्मा म्हणजे एक महान व्यक्तिमत्त्व. जेव्हा एखादी व्यक्ती सर्व प्रकारच्या ओळखींपलीकडे जाऊन 'जीवन' म्हणून कार्य करते, तेव्हाच ती महान व्यक्तिमत्त्व बनते.
मन हे एक शक्तिशाली साधन आहे. तुमच्या मनात निर्माण होणारा प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना तुमच्या शरीराची रासायनिक संरचना बदलून टाकते.
मानवी मनाचं सौंदर्य हे आहे की, ते कल्पना करू शकतं; तर त्याचं कुरूपपण हे आहे की, ते कल्पनेच्या विश्वात हरवून जाऊ शकतं.
जोपर्यंत तुम्हाला असे वाटते की, तुम्ही जसे आहात त्यासाठी दुसरे कोणीतरी जबाबदार आहे, तोपर्यंत तुम्ही जसे होऊ इच्छिता तसे होऊ शकत नाही.
प्रेम हा काही व्यवहार नाही. तो तुमच्या भावनांचा एक विशिष्ट उत्साह आणि गोडवा आहे.