Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
शिकणे म्हणजे ज्ञानाचा साठा करणे नाही. शिकणे म्हणजे ग्रहणशीलता.
तुम्ही नश्वर आहात याची जाणीव झाल्यावरच तुम्ही खऱ्या अर्थाने जागरूक व्हाल. नाहीतर, तुम्ही पूर्णपणे अजागरूक जीवन जगाल.
आनंद ही काही साध्य करण्याची गोष्ट नाहीये. हे स्वतःकडे परतणे आहे.
भारताचे राष्ट्रत्व हे सर्व धर्मांच्याही आधीचे आहे. आपण तेव्हाही एक राष्ट्र होतो आणि आजही एक राष्ट्र आहोत. 'मुक्ती'च्या शोधानेच आपल्याला सदैव एकसंध ठेवले आहे.
एखादा उपचार म्हणून योगाचा वापर करणं, म्हणजे विमानाचा वापर बससारखा करण्यासारखं आहे.
तुम्ही जितके जास्त निष्कर्ष काढता, तितकाच तुमचा जिवंतपणा कमी होत जातो.
निश्चलता, उत्साह आणि धुंदी हे सर्व एकाच वेळी घडत आहे - हीच जीवनाची सर्वोच्च शक्यता आहे.
माझी अध्यात्मिकता इतकी नाजूक नाही की, तिला गुहेत राहण्याची गरज भासावी; मी बाजारपेठेत राहून सुद्धा अगदी असाच राहू शकतो.
तुमच्या मनात कोणतीही अप्रियता असण्याचा अर्थ हा आहे की, तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरोधात काम करत आहे.
प्रेम ही तुमच्या आतली एक सुखद भावना आहे. समोरची व्यक्ती निघून गेली, तरीही तुम्ही प्रेम अनुभवू शकता.
जर तुम्ही काल घडलेल्या गोष्टींमुळे त्रासून गेला असाल, तर तुम्ही तुमच्या आठवणींमुळे त्रासून गेला आहात - तुमच्या जीवनामुळे नाही.
कल्याण आणि दुःख हे दोन्ही तुमच्या आतूनच निर्माण होतात. निवड तुमची आहे.