प्रिय व्यक्तीच्या मृत्युचं दुःख कसं हाताळावं!
अमिष त्रिपाठी सद्गुरूंना, एखादी प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणारं दुःख आणि ते कसं हाताळावं याबद्दल विचारतायत.
अमिष त्रिपाठी: माझा प्रश्न दुःखासंदर्भात आहे. आपल्या सर्वांना अनेक तत्वज्ञानं माहितीयेत जी आपल्याला सांगतात की आपण आनंद आणी दु:ख या दोन्हीबद्दल तोच विरक्त भाव ठेवून समतोल राखायला हवा. पण जेव्हा दुःख तुमच्या सहनशक्तीपलिकडे दु:खाचा अनुभव येतो तेव्हा काय? तुम्ही तुम्हाला अतिशय प्रिय असलेल्या माणसाला गमावता तेव्हा काय? दु:खाचा सामना कसा करावा?
सदगुरू: हे जरा समजून घेऊया, मी कुणाच्याही दु:खाला कमी लेखत नाहिये, पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की शोक हा नेहमी काहीतरी गमावण्याबद्दल असतो. याचा अर्थ आपण काहीतरी गमावलंय, हे कुणाच्या मृत्यूबद्दल नाहिये. लोक वस्तू, सत्ता किंवा पद गमावल्यावरही शोक करतात
तर, मुळात हे एखाद्या व्यक्तीनं काहीतरी गमावण्य़ाबाबत आहे. जेव्हा आपण लोकांबद्दल बोलतो, जर आपण त्यांना मृत्युपायी गमावलं, तर या प्रकारचं असं असतं की ती जागा कुणी भरू शकत नाही. वस्तू दुसरी मिळवता येते, पद पुन्हा मिळवता येतं, पैसे आणी मालमत्ता ही मिळवता येते, पण जेव्हा आपण एक व्यक्ती गमावतो, ती पुन्हा मिळवता येत नाही. तर अश्या वेळी शोक अतिशय तीव्र होतो.
हे असं घडतंय कारण आपण आपलं व्यक्तीत्व तुकड्यातुकड्यांनी जोडून बनवलंय. आपण जे आहोत ते आपल्याकडे असलेल्या वस्तू, आपल्याकडे असलेली पदं, आपले नातेसंबंध आणी आपल्या जीवनात असलेल्या लोकांमुळॆ आहोत. जर यापैकी एक ही गोष्ट कमी झाली, तर ती आपल्या व्यक्तीत्वात पोकळी निर्माण होते. याचंच दु:ख आपण भोगतो.
तर हे अतिशय महत्वाचंये की आपली नाती ही आपल्यातल्या परिपुर्णतेच्या भावनेवर आधारलेली असावीत, आपल्या जीवनातली पोकळी भरून काढण्यासाठी नाही. जर तुम्ही स्वत:ला परिपूर्ण करण्यासाठी नात्याचा वापर केला, तर जेव्हा तुम्ही ते गमावता, तेव्हा तुम्हाला पोकळी जाणवेल. जर तुम्ही तुमच्या आतली परिपुर्णता वाटण्यासाठी नातं जोडलं, तर मग दुःख होणार नाही.
हे तुम्ही जे गमावलंय त्याला कमी लेखण्य़ाबद्दल नाहीये, मी यापुर्वीच हे सांगितलंय. जेव्हा आपण एखाद्या अतिशय प्रिय व्यक्तीला गमावतो, हे काहीही कमी येणार नाही, हे एखाद्याच्या दुःखाला तुच्छ लेखल्या सारखं दिसतं. तर हे आपल्या आयुष्यभर हे रुजवायला हवं की आपण कोण आहोत ते आपल्याकडे जे आहे त्यावर अवलंबून नाहिये. आपण जे आहोत ते जीवनात आपल्याकडे काय असेल ते ठरवेल. हे प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत घडायला हवं, यालाच अध्यात्मिक प्रक्रिया म्हणतात.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.orgवर.