सद्गुरू २०१२ मध्ये ईशा योग केंद्रात झालेल्या महाभारत कार्यक्रमाच्या वेळी आग किंवा अग्नि च्या तीन प्रकारांबद्दल बोलले.

सद्गुरू:हा एक परंपरेचा भाग आहे की जेव्हा तुम्हाला योग्य प्रकारचे वातावरण तयार करायचे असते, तेव्हा सर्वप्रथम तुम्ही दिवा लावता. जर तुम्ही दिवा लावला आणि फक्त तेथे बसलात - तर तुम्हाला कोणत्याही देव किंवा देवतांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही - यामुळे काही फरक पडतो का? ज्या क्षणी तुम्ही दिवा लावता, ज्योतीभोवती, एक विशिष्ट आकाशीय आवरण नैसर्गिकरित्या उद्भवते. जिथे आकाशीय आवरण आहे तिथे संपर्क अधिक चांगला होतो. देवाशी बोलण्यापूर्वी, तुम्हाला योग्य प्रकारचे वातावरण तयार करायला पाहिजे, एका विशिष्ट प्रमाणात आकाशीय आवरण निर्माण करायला पाहिजे. त्याच्याशिवाय, हे असे आहे कि तुम्ही एखाद्या भिंतीशी बोलत आहात. तुम्ही जर पुरेसे ध्यान केल्यास, आकाशीय अंश तुमच्या सभोवताली तयार होते.


 
जर तुम्ही कधी एखाद्या शेकोटी भोवती बसला असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल कि शेकोटी भोवती सांगितलेल्या गोष्टींचा नेहमीच जास्तीत जास्त परिणाम होतो. हे पूर्वीच्या कथाकथन करणाऱ्यांना माहित होतं. कथेसाठी आणि वातावरणासाठी - तुमची ग्रहणशिलता उत्कृष्ट करणारी परिस्थिती निर्माण करणारे हे काही सोपे मार्ग आहेत.

जीवन हे अग्नी आहे. हि सूर्याची आगच आहे जी पृथ्वीवरील जीवन सुकर करते. अग्नी म्हणजे आग.

आग वेगवेगळ्या प्रकारची असते. जीवन हे अग्नी आहे. हि सूर्याची आगच आहे जी पृथ्वीवरील जीवन सुकर करते. अग्नी म्हणजे आग. मानवी शरीरप्रणालीमध्ये आग जठराग्नी म्हणून अभिव्यक्त होऊ शकते. तुम्ही जर भुकेले आहात, तर ते जठराग्नीमुळे, पोटातील आग आणि जांघेतील आगीमुळे आहात. जर तुमची अन्नाची भूक शमली, तरच तुमच्या “जांघेतील आग” प्रज्वलित होईल. ज्याने काहीच खाल्लेले नाही, तो लैंगिकतेने त्रस्त होत नाही. तुम्ही जर जठराग्नीचं रूपांतर केलत, तर ते चिताग्नी बनू शकतं. तुम्ही बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र बनता. तुमची लैंगिकता आणि अन्नामधील रुची कमी होते, कारण तुमची बौद्धिक आग प्रज्वलित होते.

हा चिताग्नी भूताग्निमध्ये परिवर्तित केली जाऊ शकतो. भूताग्नि हा महाभुतांची अग्नी आहे. एक योगी महाभूतांच्या अग्नीने प्रज्वलित असतो. तुम्ही अशा योगींबद्दल ऐकलं आहे का ज्यांनी काही काळासाठी दफन करून घेतलं होतं - श्वास नाही, हृदयाचे ठोके नाही - किंवा असे योगी ज्यांनी पारा किंवा विष सेवन केलं होतं. जर ते योगी नसते आणि त्यांनी असं काहीतरी केलं असतं तर ते मेले असते. जोपर्यंत तुमचा भूताग्नि प्रज्वलित होत नाही, तुम्ही महाभूतांशी खेळू शकत नाही. सर्वाअग्नि म्हणून देखील काहीतरी आहे - आपण यात सध्या जाणार नाही आहोत. इतर तीन पैलूंपैकी प्रत्येकाकडे काही प्रमाणात जठराग्नी असतो.

जर चिताग्नी वाढीस लागला, तर तुमची बुद्धी अग्नीसारखी होईल - तो तुमच्या भोवतालची जागा प्रकाशित करेल. अगदी विनोदी पुस्तकांमध्येही, जर पात्राला एखादी कल्पना सुचली, तर ती नेहमी एक प्रकाशित दिवा म्हणून दर्शवली जाते, कारण जेव्हा बौद्धिक आग प्रज्वलित होते, तेव्हा अचानक तेथे प्रकाश निर्माण होतो. तुम्ही त्यातून उष्णता देखील तयार करू शकता.

एकदा तुमच्या अंतर्गत महाभूतांचा अग्नी प्रज्वलित झाला, कि तुम्हाला जीवन प्रक्रियेवर प्रभुत्व मिळतं.

जर तुमची महाभुतांची आग प्रज्वलित असेल, तर ती एका वेगळ्याच स्वरूपाची असते - एक शीतल अग्नी. एकदा तुमच्यामध्ये महाभूतांचा अग्नी प्रज्वलित झाला, तर तुम्हाला जीवन प्रक्रियेवर प्रभुत्व मिळतं. कसं जन्मावं, कसं जगावं, कसं मरावं किंवा मरू नये हे सर्व तुम्ही निवडू शकाल. तुमच्यामध्ये भूताग्नि किंवा महाभूतांचा अग्नी असण्याची सौन्दर्य म्हणजे तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही, तुम्हाला यज्ञ किंवा होम करण्याची गरज नाही, तुम्हाला पूजा करण्याची गरज नाही, तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. मी असे म्हणत नाही कि तुम्ही हे करायला नाही पाहिजे - मी म्हणत आहे तुम्हाला असं करण्याची आवश्यकता नाही, कारण एकदा का महाभूतांचा अग्नी प्रज्वलित झाला, कि तुम्ही स्वतः सर्व अस्तित्व बनता.

महाभारतात, तुम्हाला तीन प्रकारची लोकं भेटतील. असे लोक आहेत जे अफाट जठराग्नीने जळत आहेत - ज्यांना खाण्याची इच्छा आहे, ज्यांना अधिकार गाजवायचेत, ज्यांना संभोग हवा आहे, ज्यांना विजय मिळवायचा आहे. काही जणांकडे अभूतपूर्व चिताग्नी आहे. त्यांची बुद्धी अशी आहे की ते अशा गोष्टी पाहण्यात सक्षम आहेत जे सामान्य लोकांना केवळ १००० वर्षांनंतर दिसतील. इतर लोकं आहेत ज्यांचा भूताग्नि प्रज्वलित आहे, याचा अर्थ असा कि त्यांच्या जीवनावर त्यांच संपूर्ण प्रभुत्व आहे - कधी जन्मावे, कसे जन्मावे, कसे जगावे, कधी मरायचं. जीवन आणि मृत्यूची निवड देखील त्यांच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही या तीन प्रकारच्या लोकांना भेटता, तेंव्हा त्यांच परीक्षण करू नका. या सर्वांना त्यांची एक भूमिका साकारायची आहे.

तुम्हाला कृष्ण या तीनही पैलूंमधून फिरताना आणि खेळताना दिसेल. जेव्हा त्याला जठराग्नी व्हायचे असते, तेंव्हा तो सर्वांनीशी जठराग्नी असतो - तो खातो, लढतो, आणि प्रेम करतो जे दुसरा कोणी करू शकत नाही. जेव्हा त्याला चिताग्नी व्हायचे असते, तेव्हा तो पूर्णपणे तसा असतो - एक तुलनेपलीकडचा दूरदृष्टा. जेव्हा त्याला भूताग्नि व्हायचे असते, तेंव्हा तो निखालसपणे तसा असतो. तो हे तीनही क्षेत्र खेळतो.