प्र: ध्यानलिंगासमोर काळे कपडे बांधलेले चिंचेचे झाड का आहे?

सद्गुरू: भारतात नेहेमीच असे म्हंटले जाते की भुतं चिंचेच्या झाडावर लटकत असतात. तुमच्या कदाचित पाहण्यात आले असेल की रात्रीच्या वेळी कोणताही प्राणी किंवा पक्षी चिंचेच्या झाडावर बसत नाहीत. ते दिवसभर चिंचा खातील, पण रात्री, तुम्हाला असे दिसून येईल की पक्षी त्यांच्या रात्रीच्या विसाव्यासाठी चिंचेच्या झाडावर नाही, तर इतर झाडांवर बसलेले असतात. याचे कारण म्हणजे इतर कोणत्याही वनस्पतीच्या तुलनेत चिंचेच्या झाडाभोवती असणारी प्राणवायुची पातळी अत्यंत कमी असते. यासारखी आणखी काही झाडे आहेत, पण चिंचेचे झाडाबाबतीत हे लक्षणीयरित्या आढळून येते.

ध्यानलिंगाच्या उपस्थितीत, ज्यांनी स्वतःच्या मुक्तीसाठी काम केलेले नाही, त्यांनासुद्धा अल्पावधीच मुक्ती मिळते कारण त्यांना त्यांची अस्तित्वात रचना ठेवता येत नाही. त्या स्वरुपाच्या उर्जेत त्यांचे अस्तित्व उन्मळून पडते.

शरीरहीन प्राण्यांसाठी, त्या ठिकाणी असणार्‍या आयुष्याच्या अभावासोबतच तेथे असणार्‍या प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्यांच्यात मृत्यू आणि मुक्तीची भावना निर्माण होते. आणि म्हणूनच त्यांच्यात अशा झाडांच्या दिशेने जाण्याचा कल दिसून येतो.

एके काळी, शंकराच्या प्रत्येक मंदीराबाहेर एक चिंचेचे झाड असे. याचे कारण हे होते की ज्यांनी शंकरच्या मंदिराची स्थापना केली त्यांना ज्यांनी शरीर गमावले आहे अशांना देवतेच्या सान्निध्यात राहण्याची संधी नाकारायची नव्हती. अशा जीवांसाठी चिंचेचे झाड लावले जात असे.

आपल्याकडे ध्यानलिंगाच्या अगदी समोर चिंचेचे झाड आहे. ध्यानलिंगाच्या उपस्थितीत, ज्यांनी स्वतःच्या मुक्तीसाठी काम केलेले नाही, त्यांनासुद्धा अल्पावधीच मुक्ती मिळते कारण त्यांना त्यांची अस्तित्वात रचना ठेवता येत नाही. त्या स्वरुपाच्या उर्जेत त्यांचे अस्तित्व उन्मळून पडते.

झाडाला कपडे बांधण्याचे कारण म्हणजे, असे काहीजण आहेत जे बेचाळीस दिवस एक विशिष्ट साधना करतात. याला शिवांग साधना असे म्हणतात. संपूर्ण बेचाळीस दिवस ते त्यांच्या अंगाला एक कापड बांधून ठेवतात. त्यांच्या शरीराचा एक विशिष्ट हिस्सा, घामाच्या स्वरुपात त्या कपड्यात शिरतो. आज, तुम्ही डीएनएच्या संदर्भात बोलू शकता. त्या डीएनएचा किंवा त्यांच्या शरीराच्या स्मृतीचा वापर करून ध्यानलिंगाच्या समोर एक विशिष्ट प्रक्रिया घडते, ज्यात आम्ही त्यांना त्यांच्या कार्मिक रचनेतून मुक्त करतो.

बेचाळीस दिवसांची साधना पूर्ण झाल्यानंतर केलेल्या या प्रक्रियेनंतर, लोकांना त्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रणालीत कित्येक काळापासून जमा केलेल्या गोष्टींपासून प्रचंड मोठा आराम मिळतो.

प्र: तेथे जमिनीच्या दिशेने सरपटणार्‍या सापांची अनेक शिल्पे का आहेत?

सद्गुरू: योग संस्कृतीत, सर्पाला ऊर्जेच्या उच्च परिमाणांचे प्रतिकात्मक प्रतींनिधी समजले जाते. याचे कारण हे आहे की कुंडलिनीची हालचाल सापाला त्रास दिल्यावर तो जशी हालचाल करतो, त्याच्याशी साधर्म असणारी आहे. आणि म्हणूनच अनेक ऊर्जेच्या अनेक अवकाशात तुम्हाला सर्पांचे चित्रण केलेले आढळून येईल. साधारणपणे, तुम्हाला वरच्या दिशेने सरपटणार्‍या सापांचे चित्रण आढळून येईल कारण तुम्ही दिव्यत्वाचा शोध घेत आहात.

परंतु ध्यानलिंगामध्ये, तुम्हाला एकत्रितपणे खाली उतरणारे अनेक साप दिसतील कारण तो दिव्यत्वाच्या शोधत नाही तर तो दिव्यत्वाचा वर्षाव आहे. कृपेचा प्रवाह आहे – कृपा खालच्या दिशेने वहात येते आहे. हे सूक्ष्म मार्गाने हे सूचित करण्यासाठी, आम्ही एकत्रितपणे खाली उतरणार्‍या सापांचे चित्रण त्याठिकाणी केले आहे.

प्र: ध्यानलिंगाकडे जाणार्‍या पायर्‍या येवढ्या मोठ्या का आहेत?

सद्गुरू: ध्यानलिंग हे पुजास्थान नाही. हे ध्यान करण्याचे ठिकाण आहे. ध्यान हे कोणती कृती नाही, ती तुम्ही करण्यासारखी एखादी गोष्ट नाही. ते तुम्ही बनू शकता असे काहीतरी आहे. तुम्ही प्रयत्न केले म्हणून तुम्हाला ध्यान करता येईल असे नाही. तुम्ही परिपक्वतेच्या एका बिंदुपर्यन्त तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा विकसित केल्यास, तुम्ही स्वाभाविकपणे ध्यानी व्हाल.

जेंव्हा तुम्ही तुमचा पाय एका विशिष्ट बिंदूच्या वरती घेऊन तो खाली ढकलता आणि तुमचे वजन वरती ढकलता, तेंव्हा तुमची मूलधारा उघडी होते – तिला आवश्यक ती चेतना मिळते.

त्यामुळे ध्यानलिंगाकडे येणार्‍यांसाठी, आम्ही सोप्या प्रक्रिया तयार करत आहोत. त्याच्या पायर्‍या अशा प्रकारे तयार करण्यात आल्या आहेत की जेंव्हा एखादी व्यक्ती तिच्या पायाचा तळवा दाबून ठेवते, तेंव्हा त्यामुळे आपली प्रणाली एका विशिष्ट प्रकारे सक्रिय होते. आणखी एक गोष्ट म्हणजे जेंव्हा तुम्ही पुढच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करता, जेंव्हा तुम्ही तुमचा पाय एका विशिष्ट बिंदूच्या वरती घेऊन तो खाली ढकलता आणि तुमचे वजन वरती ढकलता, तेंव्हा तुमची मूलधारा उघडी होते – तिला आवश्यक ती चेतना मिळते.

पुढच्या वेळी तुम्ही जेंव्हा एखाद्या उंच जागी चढाल, तेंव्हा पाऊल एका विशिष्ट पद्धतीने दाबून ठेवल्याने मूलधारा कशी उत्तेजित होते याकडे लक्ष ठेवा. ज्यांना ध्यानी बनायचे आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे.

तुम्ही जर योग कार्यक्रमाला आलात, तर तुम्ही अनेक साधनांसह हे केले असते. पण ध्यानलिंगाकडे येणार्‍या बहुतांश व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या ध्यानाची माहिती दिली गेली नसते. पण जेंव्हा ते तिथे जातात आणि बसतात, त्यांना असे वाटते की ते तिथे पाच मिनिटे बसणार आहेत पण प्रत्यक्षात ते तिथे अनेक तास बसून राहतात.

ध्यानलिंगात अशी एक संधी आहे की कोणत्याही सूचनेशिवाय, ते तुम्हाला ध्यानस्थ बनवते. पण त्यासाठी शरीराची काही प्रमाणात तयारी आणि ग्रहणशीलता आवश्यक आहे. ध्यानलिंगाच्या जागेची संपूर्ण रचना अशा प्रकारे केली आहे की अनेक मार्गांनी, ते तुमच्या शरीराला ध्यानस्थ होण्यासाठी तयार करते.

प्र: परिक्रमेमधील पतंजलि आणि वनश्री कोणत्या मार्गांनी ऊर्जित केल्या गेल्या आहेत का?

सद्गुरू: पतंजलि आणि वनश्री या देवता आहेत. आम्ही या अद्भुत देवतांविषयी अत्यंत कमी बोललो आहोत कारण संपूर्ण लक्ष ध्यानलिंगावर आहे. त्या ध्यानलिंगासारख्या बहु-आयामी, उत्तुंग किंवा कायम नाहीत, पण त्यांच्यात स्वतःचे गुण आहेत. आम्ही त्यांचा फारसा गौरव केलेला नाही. आम्ही त्यांना एखादया प्रतिकांप्रमाणे ठेवले आहे पण त्या त्यांच्या स्वतःच्या मार्गांनी जीवंत आहेत. लोकांच्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव आहे.

वनश्रीची स्थापना प्राथमिकतः ध्यानलिंगाच्या विरुद्ध एक लहानसे स्त्री दैवत म्हणून करण्यात आली होती. पण त्याच्यासारख्या पुरुषासाठी, ती एक अतिशय गरीब पत्नी आहे. ध्यानलिंगाला त्यापेक्षा अधिक काही हवे आहे. आम्ही जेंव्हा ध्यानलिंगाची प्रतिष्ठापना केली, तेंव्हा नैऋत्य कोपर्‍यात लिंग भैरवी असेल हे आमच्या मनात सदैव होते. पण ध्यानलिंगाच्या बांधकामाच्या वेळी, आमच्याकडे तसे करण्याची साधने आणि वेळ उपलब्ध नव्हता.

ध्यानलिंग हे स्वतः संपूर्ण आहे, पण एकंदरीत ठिकाण म्हणून ती जागा थोडीशी अपूर्ण होती. म्हणून आम्ही राहायला लागलो, तेंव्हापासून माझ्या मनात ते सदैव होते. आता नैऋत्य कोपर्‍यात लिंग भैरवी आहे, आणि आता ही रचना संपूर्ण झाली आहे.

प्र: दररोज नाद आराधना का केली जाते?

सद्गुरू: ध्यानलिंगाची ऊर्जा एखादया भक्कम भिंतीसारखी बाजू शकते कारण लिंगाभोवती जमा झालेले ऊर्जा क्षेत्र अतिशय तीव्र आहे. ज्या व्यक्ती ते भेदून जातील, त्यांच्यासाठी ते अतिशय चांगले असेल. इतर लोकं त्या ठिकाणी बसून राहतील परंतु ते उर्जेच्या तीव्रतेमुळे त्या क्षेत्राबाहेर असतील. जर त्याची तीव्रता कमी असती तर अधिक लोकं त्यात प्रवेश करू शकले असते.

म्हणून दिवसातून दोन वेळा, काही विशिष्ट ध्वनींचा वापर करून आम्ही जणूकाही ही भिंत तोडत असतो - काहीवेळा मधुर आवाज, काहीवेळा आवाजाचा गोंगाट करून! ते निर्माण करत असलेले संगीताचे माधुर्य तिथे बसलेल्या लोकांसाठी सामाजिकदृष्ट्या समर्पक आहे. परंतु जरी गोंगाट झाला तरी आवाज करण्याचा उद्देश साध्य झालेला असतो, कारण एखादी गोष्ट अतिशय तीव्र स्वरुपात – अगदी भक्कम रूपात असेल तर तिला त्रास व्हावा अशी कल्पना त्यामागे आहे. ज्यामुळे त्यात प्रवेश करणार्‍या सर्वांना प्रवेश मिळवणे थोडेसे सुलभ होते.

हे जोरदारपणे केले तर तुम्ही ओरडण्याद्वारे किंवा काही स्वयंपाकघरातील भांड्यांच्या आवाजाने देखील हे करू शकता. हे कदाचित सामाजिक हेतूची पूर्तता करणार नाही परंतु आध्यात्मिक हेतू साध्य होईल. तथापि, आम्हाला याचा उपयोग दान म्हणून करायचा आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती देते तेव्हा ती एखादी गोष्ट पूर्णपणे ग्रहण करण्याच्या स्थितीत येते.

https://www.youtube.com/watch?v=9UhPkHhSbCU&t=17s

भारतीय जीवनशैली नेहमीच, आपण मंदिरात गेला तर आपण काहीतरी अर्पण करणे आवश्यक असते . असे नाही कारण देवाला तुमची केळी किंवा नारळ खाण्याची इच्छा आहे. तुमच्याकडे केळी किंवा नारळ नसल्यास, तुम्ही किमान एक पान देणे अपेक्षित असते . कल्पना आहे की तुम्ही देण्याच्या उद्देशाने जा. स्वतःला अर्पण करण्यासाठी जा. जेव्हा तुम्ही अर्पण म्हणून जाता तेव्हा तिथे जे काही उपलब्ध आहे त्याबद्दल तुम्ही सर्वात ग्रहणशील होता.

म्हणून नाद आराधनेचा काळ लोकांसाठी सर्वात ग्रहणक्षम असतो कारण ते अर्पण असण्याचा काळ असतात.

प्रश्नः एखादा मनुष्य ध्यानलिंगासारखा होऊ शकतो?

सद्गुरु: प्रत्येक मनुष्य ध्यानलिंगासारखा रस्त्यावर सात चक्रे चैतन्यशील आणि त्यांच्या पूर्ण उद्दीपित करून वावरू शकतो . असा दिवस पाहून खूप आनंद होईल कि जेंव्हा असे बरेच लोक आहेत.

ध्यानलिंग हे उच्चतम प्राणमयकोषासारखे आहे जणू काही एक योगीच तिकडे बसला आहे.

ध्यानलिंग एक सजीव गोष्ट आहे कारण ते सर्व सात चक्रांसह आले आहे. फक्त कोणतेही भौतिक शरीर त्याला नाही. ध्यानलिंग हे उच्चतम प्राणमयकोषासारखे आहे जणू काही एक योगीच तिकडे बसला आहे. किंवा पारंपारिक भाषेत सांगायचे तर आम्ही शिवाला तयार केले. लोकांसाठी कायमचा जिवंत गुरु असावा ही कल्पना आहे.

गुरुची जवळीक साधून साधना करणे हे आपली साधना स्वतः करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. फारच थोड्या लोकांना ती संधी मिळते कारण ती सर्वकाळ प्रदान करणे भौतिकदृष्ट्या अशक्य आहे. पण ध्यानलिंगामुळे प्रत्येकाला ती संधी आहे. जरी तुम्हाला ध्यानाबद्दल काही माहित नसले तरीही, तुम्ही तेथे काही मिनिटे बसून राहिल्यास, कोणत्याही सूचनांशिवाय तुम्ही ध्यानस्थ व्हाल कारण त्या ऊर्जेचे स्वरूपच तसे आहे.

संशयी लोकांना या कल्पनेचा त्रास होईल, परंतु सिद्धांतानुसार या सूक्ष्म शरीरावर भौतिक शरीर तयार करणे शक्य आहे. आपण एक विशाल, विलक्षण मनुष्य निर्माण करू शकतो. परंतु ती प्रक्रिया खूप विस्तृत आहे. आत्ता तो भौतिक शरीराशिवाय ठीक आहे - तो अत्यंत सामर्थ्याने स्पंदने करतो. एकदा तुम्ही भौतिक शरीर तयार केले की तो भौतिक शरीराच्या सर्व मर्यादांसह येतो. भौतिक शरीर नसल्यास, कालावधीची कोणतीही समस्या नाही. अभौतिकमहामानव हा शारीरिक महामानवापेक्षा चांगला असतो कारण तो हजारो वर्षे टिकतो.

प्रश्न: जर एकदा आपण ध्यानलिंगाला भेट दिली तर आपण जिथं आहोत तिथे ध्यानलिंगाला ग्रहण करू शकतो का?

सद्गुरु: तुम्ही हे समजून घेणे आवश्यक आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात - विशेषत: जागरूक मनात गुंतलेले आहात तोपर्यंत काल आणि स्थल ही एक मर्यादा आहे. जरी तुम्ही फक्त मनाच्या सखोल पातळीवर गेलात तरीही, तेथे वेळ आणि स्थान नाही.

जर तुम्ही घरात एक जागा ठेवली आणि सकाळी किंवा संध्याकाळी स्वत: साठी काही वेळ निश्चित केला आणि शांतपणे बसलात तर ध्यानलिंगाची उर्जा तुम्हाला आतून आच्छादून टाकेल.

ध्यानलिंग हा एक विशिष्ट भौतिक प्रकार नाही, तर तो एक ऊर्जा प्रकार आहे जो वेळ आणि जागेचे उल्लंघन करतो. ज्या लोकांनी ध्यानलिंगाला पाहिले नाही किंवा त्याबद्दल माहिती नसलेले लोकसुद्धा ग्रहणशील झाल्याक्षणी क्षणी ते अनुभवतात. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही कधीही या ठिकाणी आला नसलात तरीही तुम्ही एखाद्या विशिष्ट मार्गाने खुलेअसण्यासाठी तयार असाल तर ध्यानलिंग नेहमीच असते.

हे बर्‍याच लोकांसाठी अगदी अमूर्त वाटेल, म्हणून किमान एक भेट देणे चांगले. जर तुम्ही ध्यानलिंग पाहिले असेल तर तुम्ही तिथे बसले असाल तर ध्यानलिंगद्वारे अध्यात्मिक बीजांची पेरणी तुमच्यात होईल. जर आपण घरात एक जागा ठेवली आणि सकाळी किंवा संध्याकाळी स्वत: साठी काही वेळ निश्चित केला आणि शांतपणे बसलात तर ध्यानलिंगची उर्जा तुम्हाला आतून आच्छादून टाकेल.

तुम्हाला काही दृश्य मदतीची आवश्यकता असल्यास तुम्ही एक प्रतिमा तुमच्याकडे ठेवू शकता, जी तुम्हाला आवश्यक ती मदत देईल. आधाराची गरज केवळ मानसिकरित्या विचलित झाल्यामुळे आहे. अन्यथा, कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही. ध्यानलिंगाच्या उपस्थितीत आल्यास अध्यात्मिक बिजाची झालेली पेरणीच याची काळजी घेईल.