मनाची शक्ती: तुमचे विचार खरोखर शक्तिशाली बनविणे

सद्गुरू विचार निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे आणि जगात नैसर्गिकरित्या प्रकट होणारी विचारसरणी कशी तयार केली जाऊ शकते ह्याकडे पाहतात.
मनाची शक्ती: तुमचे विचार खरोखर शक्तिशाली बनविणे
 

प्रश्नः एखाद्या विचारांना वास्तविकतेत प्रगट करण्यासाठी एखाद्याच्या उर्जेने शक्ती दिली जाऊ शकते?

सद्गुरु: लोक आपल्या आयुष्यात ज्याची इच्छा बाळगतात - व्यवसाय वाढवायचा असेल, घर बांधायचं असेल किंवा इतर काहीही - “मला हे हवे आहे” हा विचार त्यांच्यात उद्भवतो. एकदा हा विचार झाल्यावर, बहुतेक लोकांसाठी, ते त्यांची शक्ती कृतीतून त्या गोष्टीकडे केंद्रित करतात आणि त्या दिशेने कार्य करण्यास सुरवात करतात. जर त्यांचे प्रयत्न पुरेसे तीव्र असतील तर त्यांचा विचार वास्तविकता उतरतो. लोक जगात अशाप्रमाणे नेहमी कार्य करतात. परंतु उर्जेच्या ठराविक परिमाणांसह तो विचार कसा विकसित करावा किंवा सक्षम करावा हे त्यांना माहित नाही.

पण, शरीराच्या पलीकडे तुमच्या उर्जेमध्ये काही गतिशीलता असल्यास, गतिशीलता जाणीवपूर्वक प्रक्रिया बनल्यास तुम्ही एका ठिकाणी बसून तुमची उर्जा इतरत्र जाऊ देऊ शकता. पण, तुम्ही तुमच्या स्वत:च्या आयुष्यातील उर्जेवर पुरेसे प्रभुत्व मिळविल्याशिवाय हे करत असाल, ऊर्जा तुमच्यात परत कशी आणावी हे तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल तर तुम्ही याप्रमाणे तुमचे जीवन गमावू शकता. तुम्ही पहाल की एखाद्याची इच्छा एखाद्या विशिष्ट पातळी पलीकडची असेल तर ती व्यक्ती नेहमीच लवकर मरते. बर्याच लोकांच्या इच्छा चंचल असतात. त्यांना आज काहीतरी हवे आहे, उद्या काहीतरी वेगळं हवं आहे - ते सतत बदलत असते. परंतु एखाद्याला एखाद्या गोष्टीची खूप जास्त आसक्ती असेल तर ते काहीतरी घडेल किंवा घडणार नाही तरी ते तरूणपणीच मरतात. विशेषतः जर त्यांच्या इच्छेप्रमाणे घडले तर ते तरूणपणीच मरतात कारण त्यांना त्यांची जीवनशक्ती बाहेर कशी टाकली पाहिजे हे माहित असते, परंतु कार्य करून झाल्यावर परत येण्याचे पुरेसे प्रभुत्व त्यांच्याकडे नसते.

एकाग्र मन शक्तिशाली असते

विचार स्वतः एक प्रतिबिंबआणि ऊर्जा आहे. तुम्ही उर्जेशिवाय विचार निर्माण करू शकत नाही. ते फक्त असे आहे की हे आकस्मिकपणे घडत आहे, आणि कदाचित त्यामुळे त्याला स्वतःला प्रकट करण्यासाठी आवश्यक उर्जा उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेत इतकी उर्जा निर्माण करू शकता की तुम्ही एखाद्याला मारू शकाल. जेव्हा तुमचे मन एकाग्र असते तेव्हा ते एक सामर्थ्यवान साधन असते. दुर्दैवाने, बहुतेक वेळा हा एकाग्रपणा लोकांमध्ये नकारात्मक मार्गाने घडतो, सकारात्मक मार्गाने नाही. चिडलेले मन आणि एक वासना निर्माण झालेले मन देखील एकाग्र मन असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत मुलांना नेहमीच इशारा दिला जातो, “जेव्हा तुम्ही रागावलेले असता, तेव्हा कुणाबद्दलही नकारात्मक बोलू नका,” कारण जर तुमचे मन रागाने एकाग्र झाले असेल तर ते सहजपणे प्रकट होऊ शकते.

विचार निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे पाहूया. तुमचा विचार जागरूक आहे की तुमच्यामध्ये साठलेल्या दशलक्ष गोष्टींचा हा फक्त एक परिणाम आहे? जेव्हा तुमची विचार प्रक्रिया जाणीव नसलेली असते, बहुतेक वेळा ती मानसिक अतिसारासारखी असते. त्यावर कोणतेही नियंत्रण नसते. आतमध्ये जुन्या गोष्टी असल्यामुळे हे सहजपणे ढवळतं. हे असं आहे कि तुमच्या पोटात जितके खराब अन्न असेल तितका तुमचा अतिसार देखील वाढतो. जेव्हा तुम्हाला मानसिक अतिसार होतो तेव्हा तुम्ही त्याला विचार म्हणू शकत नाही.

एकदा एका महिलेने काही प्रियजनांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले. तिने रात्रीचे जेवण वाढले आणि नंतर तिला आपल्या ६ वर्षाच्या मुलीला म्हटले, "तू प्रार्थना का म्हणत नाहीस?" तिला आपल्या मुलीचा थोडासा दिखावा करायचा होता. मुलगी म्हणाली, "प्रार्थना कशी म्हणायची ते मला माहित नाही." आई म्हणाली, “फक्त आई काय म्हणते ते सांग.” म्हणून ती मुलगी अतिशय धार्मिकपणे डोके टेकून, हात जोडून म्हणाली, "मी या सर्व लोकांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित का केले?" अशा गोष्टी आपल्याबरोबर घडत आहेत ना? तुम्ही ध्यान करू इच्छित आहात, तुमचे मन बर्याच गोष्टी बोलते, नाही का?

तुमची पाटी कोरी करणे

जर तुम्हाला फळ्यावर लिहायचे असेल तर प्रथम तुम्ही तो स्वच्छ पुसून टाकला पाहिजे. तरच तुम्ही स्पष्ट लिहू शकाल. जर त्यावर आधीपासून लाखो गोष्टी लिहिल्या असतील आणि त्यावर तुम्ही दुसरे काहीही लिहिले तर तुम्ही काय लिहिले आहे ते कोणीही शोधू शकत नाही. आणि थोड्या वेळानंतर तुम्हीही शोधू शकणार नाही. तुम्हाला प्रथम जागा साफ करावी लागेल आणि नंतर जाणीवपूर्वक विचार तयार करावा लागेल.

जर लोकांनी त्यांची जागा मोकळी केली असेल आणि नंतर विचार केला असेल तर हा विचार खरोखर महत्त्वाची आहे कारण ही जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. एकदा का हा विचार असाच चालू झाला आणि तो त्या स्पष्टतेत ठेवला गेला तर त्यातून उर्जा निर्माण होऊ शकते.

तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही मनात एक विचार उत्पन्न केला आणि जर तो स्पष्ट असेल तर, जगात त्याला मार्ग सापडेल. तो नैसर्गिकरित्या स्वतः प्रकट होईल. आणि जर तुमच्या जीवन उर्जेवर तुमचे थोडे अधिक नियंत्रण असेल तर तुम्ही त्याला थोडे अजून बदलू शकता.