25 गुरु पौर्णिमा कोटस् - सद्गुरुंची वचने

सादर करत आहोत गुरुपौर्णिमा, गुरूचे स्वरूप आणि त्यांची भूमिका, आणि काही महान गुरुजनांनी या पृथ्वीवरील लोकांवर केलेली अपार कृपेवर सद्गुरुंची प्रेरक आणि ज्ञानाचा स्रोत असलेली सूत्र-वचने.
25 गुरु पौर्णिमा कोटस् - सद्गुरुंची वचने
 

Guru Purnima Quotes in Marathi

गुरु पौर्णिमा – मानवी शक्यतांचा उत्सव!

गुरु पौर्णिमा हा एक उत्सव आहे भौतिकतेच्या पलीकडे जाण्याचा मानवी क्षमतेचा आणि आदियोगीच्या महानतेचा, ज्यांनी हे साध्य केलं - सद्गुरु

माझी इच्छा आहे, तुमच्या जीवनाचा खरा हेतू आणि त्याच्या शक्यता तुम्ही ओळखाव्यात. ह्या गुरु पौर्णिमेच्या पावन समयी माझी कृपा सदैव तुमच्यावर आहे. - सद्गुरु

आदियोगी शिव – पहिला गुरु

योग परंपरेत शिवाला आपण ईश्वर म्हणून पहात नाही. आपल्यासाठी शिव आदियोगी – अर्थात पहिला योगी, आणि आदिगुरु – अर्थात पहिला गुरु आहे. -सद्गुरु

आदियोगीने मानवतेला योगशास्त्राचं विज्ञान प्रदान करून दिलं – जे स्वपरीवर्तनाचे अनमोल साधन आहे. आणि हे कुठल्याही जोर-जबरदस्तीशिवाय हजारो वर्षे टिकून आहे ते केवळ त्याच्या विलक्षण प्रभावीपणामुळे. -सद्गुरु

आदियोगी, आत्म कल्याणाच्या एक प्राचीन आणि अति प्रगत अशा तंत्रज्ञानाचे प्रतिक आहे; जो जगातील कुठल्याही धर्म-स्थापनापूर्वी अवतरला. -सद्गुरु

आदियोगीचे महत्व हे आहे की मानवी चैतन्य उंचावण्यासाठी त्याने असे विलक्षण मार्ग घालून दिले जे सर्व कालांसाठी तर्कसंगत आणि उपयुक्त आहेत. -सद्गुरु

आदियोगी एक प्रतिक, एक शक्यता आणि स्वपरिवर्तनाच्या साधनांचा स्रोत आहे ज्यामुळे तुमचे जीवन तुम्ही स्वतः घडवू शकता. -सद्गुरु

आदियोगी इथं आहे तुम्हाला सर्व रोगराई, क्लेश, दुःख, आणि दारिद्रयातून मुक्त करण्यासाठी-आणि याहून महत्वाचं अवघ्या जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून तुम्हाला मुक्त करण्यासाठी. -सद्गुरु

आदियोगी भूतकाळाशी संबंधित नाहीये, तो भविष्याचा युग प्रवर्तक आहे. -सद्गुरु

आदियोगी धर्म प्रचारक नाहीये. आदियोगी जबाबदारीची प्रेरणा देतो – जेणेकरून आपण आपली अवघी जीवन प्रक्रियाच आपल्या हाती घेऊ शकू. -सद्गुरु

दारू, ड्रग्स सारख्या मादक रसायनांच्या सेवनासाठी माणसं धडपडतात, पण त्यांना हे माहित नाही की आनंद, उन्माद अनुभवण्यासाठी लागणारी सगळी रासायनिक सामुग्री आपल्या आतच आहे. एकीकडे उन्मादाने पूर्णपणे धुंद आणि त्याचवेळी आतून पूर्णपणे जागरूक आणि सतर्क अशी अवस्था शक्य आहे. हेच आदियोगीचं सार आहे. -सद्गुरु

आदियोगी योगाचा युग प्रवर्तक आहे म्हणजे स्वतः शिव शंकर. हे संपूर्ण मानवजातीने ओळखावं अशी माझी इच्छा आहे. -सद्गुरु

आदियोगी एक अशी अदभूत उपस्थिती आहे जी संपूर्ण विश्वाला मुक्तीच्या दिशेनं अग्रेसर करते. -सद्गुरु

आदियोगी सर्वधर्मांच्या आरंभाआधी आहे. हा ११२ फुट उंच तेजस्वी चेहरा, त्याने घालून दिलेल्या प्रभावशाली, विश्वव्यापी मार्गांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. -सद्गुरु

आदियोगीने निर्माण केलेले ज्ञान भांडार हे या ग्रहावरील जे काही आपण अध्यात्म असे म्हणतो, त्या सर्वांचा स्रोत आहे. –सदगुरू

योग परंपरेत, शिवाला आदियोगी अर्थात पहिला योगी असं पाहिलं जातं – जो ज्ञान आणि मुक्तीचा स्रोत आहे. -सद्गुरु

येणाऱ्या पुढच्या क्षणात जर तुम्हाला एक पूर्णतः नवीन व्यक्तीत रुपांतरीत व्हायचं असेल, तर शिव हाच मार्ग आहे. -सद्गुरु

परम संभावना ज्याला आपण शिव असे म्हणतो ती अतिशय सक्रीय आणि सर्वांसाठी त्रिकाल, निरंतर उपलब्ध आहे.

गुरूची महिमा

धर्मग्रंथांचा अर्थ लावणे हे गुरुचे काम नाही, त्याचं कार्य तुम्हाला जीवनाच्या वेगळ्या आयामात घेऊन जाणे हे आहे. - सद्गुरु

गुरु भौतिकतेच्या पलीकडील आयामाचा प्रवेशद्वार आहे. गुरुचं महत्व केवळ याचसाठी आहे कारण त्यांच्या पल्याड जे आहे, तेच खरोखर महत्वाचं आहे. -सद्गुरु

गुरु म्हणजे तुमच्यासाठी प्रकाश ज्योत धरणारी एखादी व्यक्ती नाही. ते स्वतःच ती प्रकाश ज्योत आहेत. - सद्गुरु

गुरु म्हणजे मदतीची आधार काठी नव्हे, तो एक दुवा आहे - सद्गुरु

गुरु हा स्व-परिवर्तनाचा संप्रेरक आहे. त्यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक प्रक्रिया सक्रीय होते, जलदगतीने प्रगती करते व भरभराटीस येते. - सद्गुरु

गुरुस्तुती

श्रीकृष्ण किंवा येशु ख्रिस्ताला देवत्व प्राप्त करून देणारा आयाम तुमच्यात आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांमध्ये देखील हजर आहे. तो बहरण्यासाठी केवळ तुमचं ध्यान असणं गरजेचं आहे. -सद्गुरु

येशु म्हणाला होता, “देवाचे साम्राज्य तुमच्या अंतरीच आहे.” ते अनुभवण्याचा योग हा मार्ग आहे. - सद्गुरु