प्रश्नः भारतातील प्राणप्रतिष्ठित मंदिरांमध्ये आणि जगातील इतर ठिकाणांमध्ये काही फरक आहे काय? तसे असल्यास, भक्तांनी मंदिरांकडे कसे पहावे?

सद्गुरु: सहसा जेव्हा मी इतर देशांमध्ये जातो तेव्हा मला प्रत्येक मंदिरात देवतांचा संग्रह दिसतो. मला असे वाटते की ही मंदिरे मुख्यत्वे भारतीय लोकांनी आपल्या घराच्या आठवणींमध्ये बांधली आहेत. हे अधिक करून भावनांतून घडलेले आहे कारण त्यांच्या संस्कृतीचे काहीतरी तिथे असावे अशी त्यांची इच्छा आहे. तर सर्व देवता एकाच ठिकाणी आहेत - प्रत्येक वस्तू असलेल्या एका मोठ्या मंदिरात. भारतात प्राचीन मंदिरे अशाप्रकारे बांधली गेली नाहीत.

बुद्धिमान ऊर्जा, भावनिक नाते

देवाला प्रार्थना करण्यासाठी मंदिर हे स्थान नाही. या संस्कृतीत अशी गोष्ट अस्तित्वात नव्हती. तुमच्या सर्व विनवण्या वाचण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही ऑफिसची व्यवस्था नाही. मंदिरे हि बुद्धिमान ऊर्जांची जागा असतात. प्राण प्रतिष्ठापना बुद्धिमान ऊर्जा स्थापन करण्याचा एक मार्ग आहे ज्याचा उपयोग विशिष्ट हेतूसाठी केला जाऊ शकतो.

पूर्वी जे एक प्रचंड विज्ञान आणि अभूतपूर्व तंत्रज्ञान होते, ते आज भावनिक गोष्ट म्हणून लोकांकडून मोठ्या प्रमाणात खालच्या पातळीवर आणले गेले आहे. असे नाही की तुमच्या भावनांचा काही फरक पडत नाही. तुमची भावना महत्वाची आहे कारण तुमचे मन फक्त तिथे असेल जिथे तुमची भावना असेल. जेव्हा तुम्ही शाळेत शिकत असताना तुमच्या शिक्षकाने तुम्हाला काय सांगितले होते हे मी आठवायला सांगितले तर तुम्हाला ते खूप अवघड वाटेल. म्हणूनच परीक्षा इतक्या अवघड असल्यासारखे वाटते. लोक काहीतरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतात ज्यामध्ये त्यांना रस नाही.

परंतु आपण असे म्हणूया की तुम्ही कोणाकडून मार खाल्लात - ज्याच्या तुम्ही प्रेमात आहात. तुम्हाला त्यांचा प्रत्येक शब्द आठवत असेल. जरी त्यांनी नुसती बडबड केली - ज्यांना गोड क्षुल्लक गोष्टी म्हणतात - जरी ती अगदी मूर्खपणाची गोष्ट होती, तरीही तुम्ही प्रत्येक शब्द लक्षात ठेवता कारण तुम्ही भावनिकरित्या जोडलेले आहात

भक्तीची हीच कल्पना आहे. तुम्ही तीव्र भावनांच्या स्थितीत असाल तर तुमचे मन आणि ऊर्जा ज्याच्याशी तुम्ही भावनिकरित्या जोडले आहात त्याच्याशी जोडले जाईल. त्या कारणामुळे भक्ती महत्त्वाची आहे. पण मंदिराचे महत्त्व एखाद्याला विनवणी करण्याविषयी नाही. हे एक बुद्धिमान उर्जा स्थळ आहे तुम्ही त्याच्याशी जोडले गेलात तर तुमच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करेल.

वेगळ्या मार्गावरून जाणे

विविध मंदिरे वेगवेगळ्या प्रकारे तयार केली गेली. तुम्ही भीतीमुळे पीडित असाल तर तुम्ही एका प्रकारच्या मंदिरात जायला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात समृद्धी हवी असेल तर तेथे आणखी एक प्रकारचे मंदिर होते. जर तुम्हाला अध्यात्मिक ओढ असेल तर तेथे आणखी एक प्रकारचे मंदिर होते. याप्रमाणे, आपण आपल्या जीवनात विशिष्ट उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी विविध साधने तयार केली. परंतु कालांतराने हे एका मोठ्या गोंधळामध्ये बदलले गेले.

विशेषतः दक्षिण भारतात आम्ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पाच घटकांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी पाच मंदिरे तयार केली. ही मंदिरे एकत्र काम करतात. म्हणजेच, जर या पाच मंदिरांमध्ये आवश्यक प्रक्रिया केली गेली असती तर मंदिरे व्यापलेल्या संपूर्ण प्रदेशात लोक कल्याणकारीतेने जगू शकले असते. पण आज त्या प्रत्येकाची स्वतःहून स्वतंत्र संस्था झाली आहे. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. जेव्हा ते आपल्यामध्ये एकत्र राहतात तेव्हा या घटकांचा एकमेकांशी संबंध कसा नाही?

हे असे आहे कि आपण एक उत्तम कार बनविली आहे. जेव्हा आपण ती चालविली तेव्हा ते एक आश्चर्य होते. पण त्यानंतरच्या पिढीत पाच मुलगे होते. यातील चौघांनी कारची चार चाके घेतली आणि पाचवा स्टीयरिंग व्हील धरून आहे. परंतु यापुढे कार उरली नाही आणि त्या सर्वांना वाटते की त्यांच्या हातात काहीतरी आहे. आत्ता, दुर्दैवाने, आपण यासारखे बनलो आहोत. ही मंदिरे एका विशिष्ट मार्गाने तयार केली गेली आहेत ज्यातून कल्याणकारी गोष्टींची जाणीव होते - असे काहीतरी करता येईल जे तुम्ही स्वतः करू शकत नाही.

एका साधनाची ताकद

मंदिरे मानवी आरोग्यासाठी शक्तिशाली साधने आहेत. माणूस इतर सर्व प्राण्यांपासून वेगळा असण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला साधने कशी वापरायची हे माहित आहे. अन्यथा, मुंग्यांची एक वसाहत तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकेल.

फक्त एका टेबलमधील साध्या स्क्रूचा विचार करा. जर मी तुम्हाला तुमच्या नुसत्या हातांनी तो काढायला सांगितला तर तुम्ही तुमच्या सर्व दहा बोटांची नखे गमावून बसाल, परंतु स्क्रू बाहेर येणार नाही. पण मी तुम्हाला एक साधा स्क्रू ड्रायव्हर दिला तर तुम्ही तो सहज काढू शकाल. ही साधनाची शक्ती आहे.

स्क्रू ड्रायव्हर्स आणि कुर्हाडीव्यतिरिक्त इतर अनेक अत्याधुनिक साधने जी आपण भौतिक क्षेत्रात वापरतो. ही साधने आहेत ज्यांना आपण मंदिरे म्हणून संबोधतो. ते साधन म्हणून वापरले जाणे आवश्यक आहे, परंतु बर्याच जणांनी दुर्दैवाने आज त्याचा संदर्भ गमावला आहे. मी आशा करतो की कमीतकमी भविष्यातील पिढ्यांसाठी, आम्ही आवश्यक संदर्भासह योग्य प्रकारची साधने निर्माण करू जेणेकरून मानव एक अभूतपूर्व आणि उत्कृष्ट मार्गाने जगू शकेल.