Register for INSIGHT 2018

सद्गगुरु: भारत हा एक विकसनशील देश आहे असे म्हंटले जाते. याचा अर्थ असा आहे की अजून कितीतरी गोष्टी साध्य करणे बाकी आहे. मला जर विचारलेत, तर मी असे म्हणेन या देशातील बेरोजगारीबद्दल कोणीही बोलता कामा नये, कारण अजून लाखो गोष्टी करण्यासारख्या आहेत. फक्त दुर्दैवाने कित्येक लोकांना एका विशिष्ट स्वरूपाचेच काम हवे आहे, ज्यामध्ये आवश्यक तेवढे काम न करता सुद्धा खूप अधिक पगार मिळतो.

पण अन्यथा, तुमच्याकडे बुद्धी आणि काहीतरी करायचे धाडस असेल, तर या जगात, आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये करता येण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत. तुम्ही जर उद्यमशील असाल तर जग तुम्हाला थांबवू शकत नाही.

जग तुमच्या मार्गात अडथळे आणू शकेल. तुम्ही एक तर त्याकडे अडथळा म्हणून बघू शकता, किंवा संधी म्हणून बघू शकता. ज्या ठिकाणी अडचण असेल, आणि तुम्ही अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलात, तर अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे. आणि आपल्या देशात कित्येक अडचणी आहेत. आपण त्या सोडवण्यासाठी गुंतवणूक करू शकतो.

 

शेतकर्‍यांच्या अडचणींवर तोडगा!

Population Dynamics in India - Rural vs Urban population | How Intelligent Entrepreneurship Can Transform Rural India

 

जेंव्हा आपण अर्थव्यवस्थेबद्दल विचार करतो, तेंव्हा सहसा आपण शेअर बाजार किंवा मुंबई सारख्या आर्थिक केंद्राविषयी विचार करतो. पण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या पासष्ट टक्के जनता ग्रामीण भारतात रहाते. आणि गेल्या आठ ते दहा पिढ्यांमध्ये त्यांच्यावर खूपच अन्याय झालेले आहेत. जर आज तुम्ही एखाद्या खेड्यात गेलात, तर असे दिसेल, की बहुतांश लोकांचे शरीर कमकुवत असते. स्त्रियांची परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे.

 

ग्रामीण भागाचे शहरीकरण होणे आवश्यक आहे, आणि जोपर्यंत पुढील काही वर्षात शेतीचे उत्पन्न अनेक पटींनी वाढणार नाही, तोपर्यंत तसे होणे हे एक स्वप्नच राहील. आपल्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक जनता शेतीशी संबंधित आहे. जर त्यांचे उत्पन्न आपण दुप्पट करू शकलो, तर आपली अर्थव्यवस्था अतिशय झपाट्याने वाढेल. फक्त जर आपण या व्यवसायचे रूपांतर एका आकर्षक उद्योगात करू शकलो, तरच आपण ग्रामीण जनतेला खेड्यात थांबवून ठेऊ शकू. अन्यथा साहजिकच ते शहरांकडे स्थलांतरित होतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक अशांतता माजेल. आज आपण आपल्या शहरांमध्ये काही प्रमाणात त्याचा अनुभव घेत आहोत.  

Register for INSIGHT 2018

दोन मोठ्या अडचणींमुळे शेतकर्‍यांचा विनाश होतो आहे आणि त्यांची वाटचाल गरीबी आणि मृत्यूकडे होत आहे: सिंचंनामधील गुंतवणूक आणि बाजारपेठेत उत्तम सौदा न करता येणे.

दोन मोठ्या अडचणींमुळे शेतकर्‍यांचा विनाश होतो आहे आणि त्यांची वाटचाल गरीबी आणि मृत्यूकडे होत आहे: सिंचंनामधील गुंतवणूक आणि बाजारपेठेत उत्तम सौदा न करता येणे. आज शेती अशा पद्धतीने केली जात आहे, ज्यामध्ये प्रत्येक शेतकर्‍याकडे त्याचा स्वतःचा पंप आहे, त्याची स्वतःची बोअर आहे आणि विद्युत कनेक्शन आहे. यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करायला लागते, की कर्जबाजारी होणे अनिवार्य आहे, आणि त्यामुळे शेतकर्‍याला एक तर त्याची जमीन विकायला लागते, किंवा गावापासुन दूर जाऊन एखाद्या झाडाला लटकवून घेऊन आत्महत्या करावी लागते. आणि हे सर्व होऊन सुद्धा, जेंव्हा शेतकर्‍याला त्याचे शेती उत्पादन विकायचे असते, तेंव्हा वाहतुकीची, साठवणुकीची किंवा काही वेळेस प्रस्थापित बाजाराची सोय उपलब्ध नसते. पिके घेणे ही एक गोष्ट आहे, पण ती बाजारात घेऊन जाण्यासाठी शेतकर्‍याला फारच मोठा खटाटोप करावा लागतो.  

 

यामध्ये बदल घडवुन आणण्यासाठी आम्ही शेतकरी-उत्पादन संघांना (एफपीओ) एकत्र आणतो आहोत ज्यांची एकत्रित जमीन किमान 10,000 एकर आहे. शेतकर्‍यांचे त्यांच्या जमिनीवर नियंत्रण राहील आणि त्यांच्यासाठी ते शंभर टक्के सुरक्षित असेल याची खात्री करण्यासाठी आम्ही एक कायदेशीर आराखडा तयार करीत आहोत. शेतकरी त्यांची जमीन वैयक्तिकरित्या कसू शकतील, परंतु त्यांच्यासाठी एकत्रितरित्या सूक्ष्म सिंचनची सोय करणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळविणे, याची काळजी, त्यासाठी आवश्यक क्षमता असणार्‍या काही संस्थांच्या सहकार्याने घेतली जाईल. आम्ही आपल्या शेतकर्‍यांसाठी जर ही मदत निर्माण करू शकलो, ज्यामुळे त्यांना धान्य उत्पादन करण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही काळजी करावी लागणार नाही, तर भारत संपूर्ण जगाचा धान्य पुरवठादार होऊ शकेल.  दूध, मासेमारी आणि हस्तकला यासारख्या मूल्य-वर्धित उत्पादनांपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले, तर ग्रामीण भारताच्या विकासाची यशोगाथा तयार होऊ शकते.

पारंपरिक औषधांचे पुनरुज्जीवन

शेतीमधील आणखी एक आकर्षक विभाग म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड. ईशामध्ये, आम्ही       सिद्धा-औषधींचा वापर अतिशय परिणामकारकरित्या, पण  छोट्या प्रमाणावर करतो. सिद्धा औषधी आणि काही प्रमाणात आयुर्वेद, या दोन्ही गोष्टींमध्ये आम्हाला जाणवलेली अडचण म्हणजे त्यामध्ये आवश्यक असणार्‍या घटक पदार्थांच्या विशिष्ट गुणवत्तेचे व्यवस्थापन करणे.

 

तुम्ही जर एखाद्या झाडावरून काही तोडून घेतलेत, तर तुम्ही ते सकाळी तोडले आहे का संध्याकाळी, उन्हाळ्यात की पावसाळ्यात, यावर सुद्धा त्याची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते. सिद्ध वैद्य – जे सिद्ध औषधे देतात – ते या बाबतीत जागरूक असतात, परंतु त्यांना ते कायम राखणे जमत नाहीये.

आयुर्वेदिक औषधांमध्ये, आणि विशेषतः सिद्ध औषधांमध्ये बॅचची गुणवत्ता कायम ठेवणे हे जवळ जवळ अशक्य आह, कारण जेंव्हा तुम्ही एखादे पान झाडावरून तोडता तेंव्हा ते कोणत्या परिस्थितीत असेल यावर कोणीच नियंत्रण ठेऊ शकत नाही.

याची व्याप्ती वाढविण्यासाठी गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळ आम्ही प्रयोग करीत आहोत. परंतु जेंव्हा तुम्ही व्याप्ती वाढवता, तेंव्हा परिणामकारकता कमी होते. हे एक मोठे आव्हान आहे. आणि याच परिस्थितीत आधुनिक औषधशास्त्र किंवा अॅलोपथी परिणामकारक ठरते, कारण त्यामध्ये केवळ रसायने असतात. तुम्ही हव्या तितक्या प्रमाणात औषधे तयार करू शकता. परंतु सिद्ध औषधे त्या स्वरूपाची नसतात. ती अतिशय जैविक स्वरुपात असतात, आणि त्यामध्ये एक नैसर्गिक गुण असतो, ज्याचा वापर करून घेता येण्यासाठी लोकांना त्याचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिशय परिश्रम आणि प्रयोगशीलता आवश्यक आहे, केवळ पाच वर्षांची वैद्यकीय पदवी चालणार नाही. या गोष्टी तुम्ही अनुभवातूनच शिकणे गरजेचे आहे.

 

Register for INSIGHT 2018

घटक पदार्थ मिळवणे सुद्धा अतिशय अवघड झाले आहे. ईशाच्या योग केंद्रात, केवळ आम्ही एका विलक्षण पर्वताच्या शेजारीच असल्यामुळे, आम्हाला काही गोष्टी त्वरित मिळवता येतात. पण आम्ही हा कच्चा माल अमेरिकेत नेण्याचा प्रयत्न केला, जिथे आमचे उपचारकेंद्र आहे, तर आम्हाला एकतर  ते सुकवणे, संरक्षित करणे किंवा गोठवून ठेवणे आवश्यक आहे. आणि तसे झाल्यानंतर त्याचा प्रभाव तितका परिणामकारक रहात नाही.

सिद्ध आणि आयुर्वेदाची परिणामकारकता पुन्हा मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे जर शेती व्यवसायिकांनी योग्य  गुणवत्तेनुसार, आणि जैविक पद्धतीने  औषधी वनस्पतींचे उत्पादन घेण्यासाठी जागा तयार करण्याची तयारी दाखविणे.

बहुतांश लोकं हे मान्य करणार नाहीत, पण कित्येक आयुर्वेदिक औषधांमध्ये, उत्पादक कोणीही असला तरीसुद्धा, या कारणांमुळे औषधाच्या एका बॅचची परिणामकारकता आणि दुसर्‍या बॅचची परिणामकारकता यामधील फरक खूप मोठा असू शकतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये, आणि विशेषतः सिद्ध औषधांमध्ये बॅचची गुणवत्ता कायम ठेवणे हे जवळ जवळ अशक्य आह, कारण जेंव्हा तुम्ही एखादे पान झाडावरून तोडता तेंव्हा ते कोणत्या परिस्थितीत असेल यावर कोणीच नियंत्रण ठेऊ शकत नाही. जरी तुम्ही अतीशय काळजी घेतलीत, तरीही एका बॅचची गुणवत्ता अप्रतिम असते आणि दुसरी बॅच अतिशय खराब, आणखी एखादी बॅच दोन्हीच्या मध्येच कोठेतरी. पारंपरिक औषधांची ही समस्या आहे. फक्त जेंव्हा ते ताजे असताना वापरले जाते, तेंव्हाच त्याचा परिणाम अतिशय चांगला होतो.     

जेंव्हा आपली भूमी औषधी वनस्पतींनी संपन्न होती आणि सर्व गोष्टी उपलब्ध होत्या, तेंव्हा पारंपरिक औषधशास्त्र भरभराटीस आले. पण आज, तुम्हाला ते मिळवण्यासाठी एखाद्या विशिष्ट डोंगरावरच जावे लागते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही त्याची व्याप्ती वाढवता तेंव्हा त्याचा परिणाम तेवढा चांगला दिसून येत नाही.  

सिद्ध आणि आयुर्वेदाची परिणामकारकता पुन्हा मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे जर शेती व्यवसायिकांनी योग्य  गुणवत्तेनुसार, आणि जैविक पद्धतीने  औषधी वनस्पतींचे उत्पादन घेण्यासाठी जागा तयार करण्याची तयारी दाखविणे.  हा केवळ एक फायदेशीर उपक्रम ठरणार नाही, तर त्यामुळे पारंपरिक औषधशास्त्राला एक परिणामकारक प्रक्रिया म्हणून पुन्हा मान्यता सुद्धा प्राप्त होईल.  

Register for INSIGHT 2018

नैसर्गिक बीजाची शक्ती

एक राष्ट्र म्हणून आपण केलेली सर्वात मूर्खपणाची गोष्ट म्हणजे सिंचन आणि मार्केटिंग व्यवस्थेचे औद्योगिकरण करण्याऐवजी आपण बियाणे आणि खतांच्या औद्योगिकरणावर भर दिला, आणि आज आपण आपल्याला आवश्यक बियाणे इतर देशांकडून आयात करीत आहोत. आपले स्वतःचे अन्न स्वतः उत्पादित करण्याच्या शक्तीला कमी लेखू नका. ती एक खूप मोठी शक्ती आहे. परंतु आपण ती गमावून बसू, कारण आपल्याला आवश्यक असलेले सर्व बियाणे बाहेरून येत आहेत. 

आपल्याला आवश्यक बियाणे आपल्याकडेच राखून ठेवणे ही एक खूप मोठी ताकद आहे. कर्नाटकात त्याला बीज देवरू म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरात, एका कोपर्‍यात बियाण्यांनी भरलेली काही पोती ठेवलेली असायची, ज्याची आमही दररोज पुजा करायचो.

दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही भागामध्ये, बारा हजार वर्षाहून अधिक काळ शेतीचा इतिहास आहे. या बारा हजार वर्षात, आपण तीच जमीन कसली, कदाचित त्यामधील कित्येक कुटुंबे सुद्धा तीच असतील आणि गेल्या कित्येक हजार वर्षांमध्ये आपण तेच बियाणे वापरत आहोत. 

Register for INSIGHT 2018

आपल्याला आवश्यक बियाणे आपल्याकडेच राखून ठेवणे ही एक खूप मोठी ताकद आहे. कर्नाटकात त्याला बीज देवरू म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरात, एका कोपर्‍यात बियाण्यांनी भरलेली काही पोती ठेवलेली असायची, ज्याची आमही दररोज पुजा करायचो. आम्ही कितीही भुकेले असलो तरीही ते बियाणे कधीही वापरले जायचे नाही. त्याचा वापर फक्त पावसाळ्यानंतर पेरणीसाठीच केला जात होता. पण गेल्या 35 ते 40 वर्षात आपण ते गमावले आहे, आणि आता आपल्याला त्याची मोठी किंमंत मोजावी लागणार आहे. 

फक्त तीस वर्षांपूर्वी तुम्ही दक्षिण भारतातील कोणत्याही दुकानात गेला असतात, तर तिथे तुम्हाला डाळी आणि तृणधान्याचे कितीतरी प्रकार पाहायला मिळत होते. आज मात्र प्रत्येक जण केवळ पांढरा तांदूळ आणि गहू येवढेच खातो आहे, बाकी काहीसुद्धा शिल्लक राहिलेले नाही.

Indian Pulses and Cereals | How Intelligent Entrepreneurship Can Transform Rural India

 

या देशातील धान्याच्या बहुतांश प्रजाती आता संपुष्टात आलेल्या आहेत. मला असे सांगण्यात आले आहे, की गेल्या पन्नास वर्षात कडधान्य, तृणधान्य आणि वनस्पतींच्या सत्याऐंशी जाती नष्ट झालेल्या आहेत. फक्त तीस वर्षांपूर्वी तुम्ही दक्षिण भारतातील कोणत्याही दुकानात गेला असतात, तर तिथे तुम्हाला डाळी आणि तृणधान्याचे कितीतरी प्रकार पाहायला मिळत होते. आज मात्र प्रत्येक जण केवळ पांढरा तांदूळ आणि गहू येवढेच खातो आहे, बाकी काहीसुद्धा शिल्लक राहिलेले नाही. 

गतकाळात अशी परिस्थिती नव्हती. वर्षातील वेगवेगळ्या काळात, आम्ही वेगवेगळी धान्य खात होतो, ज्यामुळे आम्ही निरोगी रहात होतो. आज संशोधनावर कोट्यवधी डॉलर्स खर्च केल्यानंतर ते आपल्याला सांगत आहेत की अन्न सेवनाचा तोच मार्ग योग्य होता. गेली कित्येक हजार वर्षे आपण त्याच पद्धतीने आहार घेत होतो, पण गेल्या तीस वर्षात आपण ते गमावले आहे. 

दुर्दैवाने, आपण जमिनीवर केवळ अत्याचारच करून थांबलेलो नाही, तर आपण नैसर्गिक बियाणे सुद्धा नष्ट करून टाकले, जे केवळ जमिनीचे गुणधर्मच फक्त घेत नव्हते तर जमिनीची निगा सुद्धा राखत होते.

दुर्दैवाने, आपण जमिनीवर केवळ अत्याचारच करून थांबलेलो नाही, तर आपण नैसर्गिक बियाणे सुद्धा नष्ट करून टाकले, जे केवळ जमिनीचे गुणधर्मच फक्त घेत नव्हते तर जमिनीची निगा सुद्धा राखत होते. भारतीय बियाण्याचे हे महत्व आहे. तुम्ही जर कोणत्या विचित्र प्रजाती आणून त्याची इथे लागवड केल्याने, मोठी आपत्ती कोसळेल.

कर्नाटकातील लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. सिल्व्हर ओक आणि निलगिरीच्या झाडांनी जमिनीतला कस तर कमी केलाच पण जमिनीची मशागत सुद्धा केली नाही. तुम्ही जर नीलगिरी लागवड केलेल्या जमिनीतून चालत गेलात, आणि जमिनीचे स्वरूप पाहिलेत, तर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक सुद्धा नाहीयेत, त्यांना सुद्धा तिथे रहावेसे वाटत नाही. जर गांडूळ आणि किड्यांना सुद्धा तिथे राहवसे वाटत नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की जमीन मृत पावलेली आहे.   

इतर कोणाला तरी होणार्‍या अल्पकालीन फायद्यासाठी आपण या सर्व गोष्टी करत आहोत. या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्या दृष्टीने मौल्यवान असणारी प्रत्येक गोष्ट नष्ट झालेली असेल.

Register for INSIGHT 2018

नैसर्गिक बियाणे पुन्हा वापरात आणणे अतिशय महत्वाचे आहे. त्याचा खूप अधिक फायदा होईल आणि ते आधी आरोग्यदायी होईल, तसेच त्याची निर्यात सुद्धा करता येईल, कारण जगभरात प्रत्येक ठिकाणी, आज लोकं भारतात तयार झालेल्या जैविक पदार्थांचा वापर करत आहेत.  

कचर्‍यातून संपत्ती

कचर्‍यामध्ये कितीतरी व्यवसाय संधी आहेत.

उद्योजकांनी करता येणासारखे अजून एक कार्य म्हणजे कचर्‍याचे परिवर्तन करून समृद्ध होणे. आजच्या घटकेला आपल्या गावातील आणि शहरांमधील सर्वाधिक सांडपाणी नद्या आणि समुद्रात सोडून देण्यात येते. हा केवळ एक पर्यावरणीय धोका नसून, त्यामुळे फार मोठे आर्थिक नुकसान सुद्धा होते आहे, कारण आज अशी कित्येक तंत्रज्ञाने उपलब्ध आहेत, ज्यामुळे या घाणीमधून आपण संपत्ती निर्माण करू शकतो.  सिंगापूरने सांडपाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करून ते दाखवून दिलेले आहे. आपण शुद्धीकरणाच्या  त्या पातळीपर्यन्त जाण्याची आवश्यकता नाही, पण उदाहरणार्थ, आपण भारतातील शहरे आणि गावांमधील केवळ 36 अब्ज लीटर सांड पाण्याचा वापर करू शकलो, तर आपण 60 ते 90 लाख हेक्टर जमिनीवर सूक्ष्म सिंचन करू शकतो.  

कचर्‍यामध्ये कितीतरी व्यवसाय संधी आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिक कसे वाईट आहे यावर लोकं चर्चा करत असतात. पण ते बरोबर नाही, कारण प्लॅस्टिक हि सर्वात अधिक पुनर्वापर करता येण्यासारखी वस्तू आहे. योग्य प्रकारे वापर केला तर ही वस्तू भविष्यकाळातील सर्वात महत्वाची ठरणार आहे. प्लॅस्टिक ही समस्या नाहीये. प्लॅस्टिकचा बेजबाबदारपणे केलेला वापर ही खरी समस्या आहे.

Register for INSIGHT 2018

केवळ ते इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल यावर आपण विचार केला पाहिजे. आणि ते तसे एक केन्द्रित उद्योग म्हणून करण्याची आवश्यकता नाही. ते स्थानिक पातळीवर सुद्धा घडू शकते आणि ग्रामीण जनतेला त्यामधून आर्थिक उत्पन्नाची एक संधी प्राप्त होऊ शकते.  जेंव्हा हा कचरा म्हणजे संपत्ती आहे ही जाणीव त्यांना होईल, तेंव्हा ते प्लॅस्टिकचा एक तुकडा सुद्धा इकडे तिकडे टाकणार नाहीत. सर्व प्लॅस्टिक पुनर्वापर केंद्रातच कसे जाईल याची ते काळजी घेतील.

 

ग्रामीण भारताचे परिवर्तन

आज भारत संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे. पुढील दहा वर्षांमध्ये जर आपण योग्य त्या गोष्टी अमलात आणल्या, तर आपण या प्रचंड लोकसंख्येला  त्यांच्या जगण्याच्या एका पातळीवरून पुढच्या पातळीवर नेऊ शकू.  हे परिवर्तन घडवून आणणे, ही  व्यावसायिक क्षेत्राची जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडे त्याविषयीचे ज्ञान आणि क्षमता सुद्धा आहे. हा काही दानधर्म नाही.  ही एक अत्यंत चांगला लाभ मिळवून देणारी गुंतवणूक आहे, आर्थिक, तसेच लाखो लोकांना सन्मानजनक जीवन आणि संपन्नता प्रदान करून देणारी गुंतवणूक आहे. 

Editor's Note: Here's a rare chance to imbibe and explore the science of scaling up your business at "INSIGHT, the DNA of Success" - an annual, 4-day business leadership intensive program. This year's program includes key resource leaders such as Kishore Biyani, Founder and Group CEO of Future Group; Bhavish Aggarwal, Co-founder and CEO of Ola Cabs; and Amitabh Kant, CEO of NITI Aayog. Don't miss the opportunity! Register for the INSIGHT 2018 program.