व्ही व्ही एस लक्ष्मण: आदरणीय सदगुरू, मला पालकत्वाबद्दलचं सत्य जाणुन घ्यायच आहे. एक मुल आणी तरूण म्हणुन मला मुक्त
राहायचय होतं, मला माझं जीवन मला हवं तसं जगायचं होतं. मला वाटत प्रत्येक पिढीचं असंच असतं. आपल्या मुलांना हे स्वातंत्र्य देणं, आणी त्यांना त्यांचे निर्णय घेण्य़ाची परवानगी देणं योग्य आहे का? आपण कुठे सिमा निश्चित करायला हवी किंवा कुठली सिमा निश्चित करायलाच हवी का? योग्य पालक होण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल?

सदगुरू: नमस्कार लक्ष्मण! तुझ्या मनगटातल्या कौशल्याचा आम्ही मनापासून आनंद घेतला, अर्थातच क्रिकेटच्या
मैदानातल्या. आणी जेव्हा पालकत्वाची गोष्ट येते, बघा, आपल्याला आपल्या मुलांना वाढवावं लागतं, ही  खुपच पाश्चात्य कल्पना आहे. तुम्ही फक्त गुरांना वाढवता, माणसांना नाही वाढवत. तुम्ही मुलांना वाढवू नये, तुम्ही फक्त त्यांना बहरण्यासाठी वाव दिला पाहिजे.

 

तुम्हाला फक्त प्रेम, आनंद आणी जबाबदारीच एक वातावरण निर्माण करायला हवं. तु तुझ्या प्रश्नामध्ये “स्वातंत्र्य” हा शब्द वापरलास. स्वातंत्र्य हा वाईट शब्द आहे. तुम्ही स्वातंत्र्य हा शब्द कधीच बोलायला नको, आणी तुमच्या मुलांना स्वातंत्र्य या शब्दाची सवयही व्हायला नको. तुम्ही नेहमीच त्यांच्यात एक जबाबदारीची जाणीव आणायला हवी, त्यांच्या आरोग्यासाठी ,त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या सुखासाठी आणी जीवनाच्या प्रत्येक आयामाला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेसाठी. जर आवश्यक जबाबदारीचं अस्तित्व असेल, तर स्वातंत्र्य हा एक परिणाम आहे.

तर मुलं वाढवण्याबद्दलच्या मोठ्या कल्पना, आपण बाजूलाच ठेवू. फक्त प्रेम, आनंद, आणी जबाबदारीचं वातावरण राखा.

आज जगातील एक मुलभुत समस्या म्हणजे आपण ध्येयवादी झालो आहोत. आपल्याला परिणामात रस आहे, प्रक्रियेत रस नाहीये. जर तुम्हाला बागेत फुलं हवी असतील, तर तुम्ही फुलांबद्दल बोलू नये. जर तुम्ही एक चांगले माळी असाल, तर तुम्ही कधीच फुलांबद्दल बोलणार नाही. तुम्ही माती, खत, पाणी, सुर्यप्रकाशाबद्दल बोलणार. जर तुम्हाला या गोष्टींची सोय केली, तर सुंदर फुलं हमखास येणार.

त्याचप्रमाणे, जर तुम्ही मुलांच्या उत्तमरीत्या बहरण्यासाठी लागणारं योग्य वातावरण निर्माण केलं, तर मुलं बहरतील. पण जर तुम्ही एखाद्याच्या मनात असलेल्या कुठल्या साच्याप्रमाणॆ त्यांना वाढवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक मूल बंड करेल, कारण तुम्ही तुमच्या मनात बनवलेल्या साच्यात कुठलंही जीवन नीट बसू शकत नाही. मनाच्या साच्यात जीवन बसू शकत नाही. जीवनात मन बसायला पाहिजे. हे समजायला हवं. 

त्याहून महत्वाचं म्हणजे पालकांमध्ये कधीही मुलांना संताप, इर्ष्या, निराशा, उदासिनता, राग हे सर्व दिसता कामा नये. ही खात्री करा की मुलं या गोष्टी कधीच बघता कामा नये.

तर मुल वाढवण्याबद्दलच्या मोठी कल्पना, आपण बाजूलाच ठेवू. फक्त प्रेम, आनंद, आणी जबाबदारीचं वातावरण राखा. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पालकांमध्ये कधीही मुलांना संताप, इर्ष्या, निराशा, उदासिनता, राग हे सर्व दिसता कामा नये. तुम्ही पाहाल की तुमची मुलं अगदी सुंदररित्या बहरतील. कारण जर तुम्ही प्रक्रियेची काळजी घेतलीत, तर फळ मिळणारच. पण जर तुम्ही फळावर केंद्रित असलात, आणी प्रक्रियेची काळजी घेतली नाही, तर फळ किंवा तुम्हाला इच्छित फळ, फक्त एक स्वप्न बनून राहिल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image