FILTERS:
SORT BY:
प्रेम हा काही व्यवहार नाही. प्रेम ही एक सुंदर गोष्ट आहे, जी तुमच्या अंतर्मनात घडते. ते कदाचित बाहेर व्यक्त होऊ शकेल; पण त्याचा उगम मात्र आतूनच झालेला असतो.
कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही खरोखर आनंदी असाल आणि तुमची माणुसकी ओसंडून वाहत असेल, तर तुमचे सर्वांशी संबंध चांगले राहतील..
अपराधबोध ही समाजाने जोपासलेली एक भावना आहे — स्वतःच्याच दिशेने रोखलेलं एक विष.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्मृतींमध्येच वावरता, तेव्हा तुमच्या समोर काय आहे हे तुम्ही पाहू शकत नाही.
डोक्यात कोणतीही स्पष्टता नसताना देखील लोक प्रचंड आत्मविश्वासपूर्ण असतात. ही एक आपत्ती आहे.
जेव्हा तुमचे हृदय तृप्त आणि मन 'स्व'पासून मुक्त असते, तेव्हा तुमचे पाय आपोआप नाचू लागतील.
जोडीदार हे अंतिम साध्य नसून, सहप्रवासी आहे.
याच दिवशी, गौतम बुद्धांना हा साक्षात्कार झाला की, 'सत्याकडे जाणे' असे काही नसते. जर तुम्ही उपलब्ध असाल, तर ते अगदी इथेच आहे.
तुम्ही हजार वर्ष जगलात तरीही मानवी कल्पनाशक्ती आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. तर मग आपण 'आनंदी अपयशी' होऊया.
स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही ज्या भिंती उभारता, त्या काळानुरूप तुमच्यासाठी कारागृहाच्या भिंती बनतात
हे शरीर पृथ्वीचाच एक अंश आहे. निरोगी पृथ्वीशिवाय चांगले जीवन शक्य नाही.