Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
जेव्हा तुमच्या आतील जीवनाचा स्रोत हाच तुमच्याकरिता सर्वोच्च अधिकार असतो, तेव्हा तुमच्या सभोवतालची मते आणि निष्कर्ष यांना काही महत्त्व उरत नाही.
ज्याने स्वतःच्या आंतरिक निश्चलतेला स्पर्श केलेला नाही, तो गतीमध्ये हरवून जाईल.
विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे एकाच नावेत असतात. एक सकारात्मकपणे विश्वास ठेवतो, तर दुसरा नकारात्मकपणे. दोघेही हे मान्य करायला तयार नसतात की, त्यांना माहीत नाहीये.
तुम्हाला जे मिळते, त्यातून केवळ उदरनिर्वाह होतो; पण तुम्ही जे देता, त्यातूनच खरे जीवन घडते.
माहिती मिळवता येऊ शकते. जाणून घेणे हा एक साक्षात्कार आहे. शहाणपण, कमवावे लागते, आणि त्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची पडते.
तुमचे विचार म्हणजे फक्त पुन्हा पुन्हा वापरली जाणारी संकलित माहिती. तिथे खरोखर काहीही नवीन घडू शकत नाही.
जर तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःवर काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुम्ही एकटे आहात म्हणून एकाकी नाही आहात; तर तुमच्या भोवतालच्या सर्व गोष्टींचा तुम्ही स्वीकार करत नाही, म्हणून तुम्ही एकाकी आहात.
जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देता आणि काय घडेल किंवा घडणार नाही याची काळजी करत नाही, तेव्हा तुमचं जीवन सुंदर बनतं. जीवनाचा आनंद हा स्वतःला व्यक्त करण्यात आहे, याचना करण्यात नाही.
कठीण परिस्थिती ही एक अशी अवस्था आहे ज्यातून आपण जातो. दुःख ही अशी अवस्था आहे जी आपण स्वतः निर्माण करतो.
मला जे काही ज्ञात आहे, माझ्या गुरूंना जे ज्ञात होतं आणि संपूर्ण आध्यात्मिक परंपरेला जे ज्ञात होतं, ते सर्व काही ध्यानलिंगामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात आहे. मी फक्त एक परिणाम आहे.
योग म्हणजे महामानव बनणे नव्हे, तर 'मानव असणे' हीच महान गोष्ट आहे हे जाणून घेणे.