Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
तुम्ही काय करता' यावरून तुम्ही कोण आहात हे ठरू नये; उलट, 'तुम्ही कोण आहात' यावरून ठरलं पाहिजे की, तुम्ही काय करता.
जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या अस्तित्वाच्या सीमा ओलांडायच्या असतील, तर तुमच्या हृदयात वेडेपणा आणि डोक्यात मात्र पूर्ण समतोल असणे आवश्यक आहे.
जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा ते एकमेकांकडून आनंद ओढून घेण्याऐवजी आनंद वाटून घेण्याबद्दल असायला हवे.
ताण हा जीवनातील परिस्थितींमुळे नसतो, तर स्वतःचे व्यवस्थापन कसे करावे हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे असतो.
देवाला तुमच्या भक्तीची गरज नाही. ते मानवी हृदय आहे, ज्याला भावनेच्या या परमोच्च शिखराचा अनुभव घेण्याची गरज असते.
ओढ म्हणजे प्रेम नव्हे. एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी ओढ ही त्या व्यक्तीशी संबंधित नसते, तर ती तुमच्या स्वतःच्या अपूर्णतेच्या भावनेशी संबंधित असते.
तुम्ही जे काही मिळवता ते तुमचं असू शकतं; पण ते कधीही 'तुम्ही' असू शकत नाही.
तुमचे विचार आणि भावना हीच तुमची भुतं आहेत. तुम्हीच त्यांची निर्मिती करता आणि मग ती नियंत्रणाबाहेर जाऊन तुम्हाला पछाडतात. हा एक वाईटपणे दिग्दर्शित केलेला भयपट आहे.
जागरूकता ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही करता. जागरूकता म्हणजे तुम्ही स्वतः जे आहात ते.
मन म्हणजे समाजाची कचराकुंडी आहे. जाणारी प्रत्येक व्यक्ती त्यात काहीतरी टाकत असते.
लोक स्वतःला जितके अधिक चांगले समजतात, तितकेच ते अधिक क्रूर बनत जातात.
स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे जीवन घडवण्याचे सामर्थ्य असणे; ते दुसऱ्या कशानेही ठरवले न जाणे.