Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
आनंद ही काही साध्य करण्याची गोष्ट नाहीये. हे स्वतःकडे परतणे आहे.
भारताचे राष्ट्रत्व हे सर्व धर्मांच्याही आधीचे आहे. आपण तेव्हाही एक राष्ट्र होतो आणि आजही एक राष्ट्र आहोत. 'मुक्ती'च्या शोधानेच आपल्याला सदैव एकसंध ठेवले आहे.
तारुण्य हा वयाचा प्रश्न नसून, ती जिवंतपणाची आणि सहभागाची एक जाणीव आहे.
वासना ही एक तीव्र गरज असते. प्रेम ही गरज नसून एक ओढ असते. जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्थिरावता - त्यानंतर कशाचीही गरज उरत नाही.
निश्चलता, उत्साह आणि धुंदी हे सर्व एकाच वेळी घडत आहे - हीच जीवनाची सर्वोच्च शक्यता आहे.
माझी अध्यात्मिकता इतकी नाजूक नाही की, तिला गुहेत राहण्याची गरज भासावी; मी बाजारपेठेत राहून सुद्धा अगदी असाच राहू शकतो.
जर तुम्ही 'स्व' मध्ये पूर्णपणे गुंतले असाल, तर जीवनाने तुम्हाला चांगलेच मळावे लागते. त्याशिवाय दुसरा कोणताही उपचार नाही.
पूर्णपणे जिवंत असणे हे अद्भुत आहे. अर्धवट जिवंत असणे ही यातना आहे.
जर तुम्ही काल घडलेल्या गोष्टींमुळे त्रासून गेला असाल, तर तुम्ही तुमच्या आठवणींमुळे त्रासून गेला आहात - तुमच्या जीवनामुळे नाही.
कल्याण आणि दुःख हे दोन्ही तुमच्या आतूनच निर्माण होतात. निवड तुमची आहे.
मी असा घडलेलो नाही की, स्तुतीने हुरळून जाईन आणि टीकेमुळे खचून जाईन. हा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही.