Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
मनुष्य असणं म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्या सगळ्याबद्दल पूर्ण जागरूक असणं.
एकदा का तुम्ही आणि तुमची विचार प्रक्रिया यामध्ये अंतर निर्माण झालं, की एक नवीन स्वातंत्र्य निर्माण होईल. या स्वातंत्र्यातूनच एक नवीन बोधशक्ती निर्माण होईल.
जीवन जाणण्याचे एकमेव द्वार म्हणजे तुम्ही स्वतः. ते खुले ठेवा.
मनुष्य म्हणजे कुठलं संसाधन नाही. मनुष्य म्हणजे एक प्रचंड शक्यता आहे. योग्य प्रकारचं पोषण मिळालं तर ते अद्भुत प्रकारे बहरून येतील.
तुमच्या इच्छा आणखी वाढवण्याऐवजी, जर तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या, तर तुम्ही या आयुष्यातून अगदी सहज तरून जाल, आणि सर्व काही सुंदरपणे पार पाडू शकाल.
योग हा स्वर्गात जाण्याबद्दल नाहीये. तो तुमच्या आत स्वर्ग निर्माण करण्याबद्दल आहे.
तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा किंवा भविष्याचा त्रास होऊ शकत नाही, कारण ते अस्तित्वातच नाही. तुम्हाला त्रास होत आहे तो तुमच्या स्मृतीचा आणि कल्पनाशक्तीचा.
तुमच्या आतलं जीवन तुमच्या शरीर, मन आणि भावनांची सेवा करण्यासाठी नाहीये. तुमचं शरीर, मन आणि भावना तुमच्या आतल्या जीवनाची सेवा करण्यासाठी आहेत.
तुमचं आयुष्य तुमच्या स्पष्टतेतून आणि क्षमतेतून घडू दे, योगायोगाने किंवा इतरांच्या करुणेमुळे आणि उपकारामुळे नाही.
परिपूर्ण मनुष्य बनणे म्हणजे तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू, प्रत्येक क्षण, अगदी पूर्णपणे जगणे.
ध्यान म्हणजे लक्ष एकाग्र करणंही नाही आणि आराम करणंही नाही. ते एक प्रकारे घरी परण्यासारखं आहे.
सर्व काही आहे तसं बघणं तुम्हाला या जीवनातून सहजपणे जाण्याचं सामर्थ्य देतं.