Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
तुमच्या आसपासच्या लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नका. ते तसेच आहेत. तुम्ही या एका जीवनाचा ताबा घ्या - तो म्हणजे स्वतःच्या.
कोणीही तुम्हाला मानसिक वेदना देऊ शकत नाही. ती वेदना तुमची स्वतःचीच असते - तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती निर्माण होते.
जीवन सहज आहे; केवळ मन तणावाखाली असते.
जगातील बहुतेक लोक व्यस्त नसतात - ते फक्त कशात तरी मग्न असतात.
खरं तर महत्त्वाचं हे नाही की, लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही प्रेमळ आहात हे महत्वाचं आहे.
तुम्ही केवळ तुम्हाला आवडणाऱ्या किंवा प्रेम करणाऱ्या लोकांशीच बांधलेले नसता; जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांचा तुम्ही तिरस्कार करता, त्यांच्याशी असलेले तुमचे बंधन त्याहूनही अधिक खोल असते.
वयानुसार तुमची शारीरिक चपळाई कदाचित कमी होऊ शकते; पण तुमचा जिवंतपणा कमी होण्याची गरज नाही.
तुमच्या सर्वात जवळच्या आणि प्रिय व्यक्ती तुमचं सर्वात वाईट रूप अनुभवतात. अनोळखी व्यक्तीला कधीच अशा वाईट वागणुकीचा सामना करावा लागत नाही.
जर पूर्ण स्पष्टता असेल, तर धैर्याची गरज नसते. स्पष्टताच तुम्हाला पार घेऊन जाईल.
आपण सर्वजण आत्मज्ञानी म्हणूनच जन्माला येतो. अज्ञान ही एक निवड आहे.
स्वतःची तुलना इतरांशी करून आपले जीवन वाया घालवू नका. त्याऐवजी, तुम्ही कालच्यापेक्षा आज अधिक चांगले आहात का हे पहा.
तुम्ही काय करता' यावरून तुम्ही कोण आहात हे ठरू नये; उलट, 'तुम्ही कोण आहात' यावरून ठरलं पाहिजे की, तुम्ही काय करता.