Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
जी व्यक्ती मरायला तयार असते, केवळ तीच संपूर्णपणे जगू शकते.
जेव्हा एखादे कर्म समर्पणाशिवाय केले जाते, तेव्हा ते बंधनास कारणीभूत ठरते; परंतु जेव्हा ते संपूर्ण समर्पणाने केले जाते, तेव्हा ते मुक्तीकडे नेते.
आपल्या तर्काच्या पलीकडे जाणे हे मुक्त करणारे असते, पण ते सोडून देणे मात्र मूर्खपणाचे आहे.
तुमच्या आसपासच्या लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नका. ते तसेच आहेत. तुम्ही या एका जीवनाचा ताबा घ्या - तो म्हणजे स्वतःच्या.
आनंद हे काही ध्येय नाही – तो दुःखाची भीती दूर करतो. 'माझं काय होईल?' ही भावना जेव्हा नाहीशी होते, तेव्हाच तुम्हाला जीवन अनुभवण्याचे धाडस करता येईल.
आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुमची आंतरिक बुद्धिमत्ता जागृत आहे. वेळ मर्यादित आहे. जे काही घडणं आवश्यक आहे, ते आत्ताच घडलं पाहिजे.
स्वतःमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, जे घडले नाही त्याची तुम्हाला कल्पना करावी लागते. भीतीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही.
खरं तर महत्त्वाचं हे नाही की, लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही प्रेमळ आहात हे महत्वाचं आहे.
शरीर आणि मन हे प्रगतीच्या पायऱ्या ठरायला हवे होते; त्याऐवजी, ते अशा दलदलीत बदलले आहेत ज्यात लोक जीवनभर रुतून पडतात.
प्रेममय बना. अस्तित्वात असण्याचा हा एक सुज्ञ मार्ग आहे.
गुरू तुमच्यातील अंधकार दूर करतात. ते स्वतः आतून प्रज्वलित असतात. तुम्ही देखील या ज्योतीने प्रज्वलित होऊन तुम्हाला मागे खेचणाऱ्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जावे.
जर पूर्ण स्पष्टता असेल, तर धैर्याची गरज नसते. स्पष्टताच तुम्हाला पार घेऊन जाईल.