जेव्हा एखादे नाटक घडते, तेव्हा तिथे तीन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे प्रेक्षक, दुसरे म्हणजे कलाकार, आणि तिसरे नाटक घडवणाऱ्या लोकांचा म्हणजे दिग्दर्शक. लोकांच्या या प्रकारांपैकी, दिग्दर्शक नाटक अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतो आणि त्यात इतर कोणाहीपेक्षा जास्त गुंतलेला असतो. त्याने नाटक कल्पित केलेले आहे, त्याने ते तयार केलेले आहे आणि तो ते घडवत आहे. म्हणून दिग्दर्शकाचा सहभाग प्रचंड आहे. कलाकारांना फक्त त्यांच्या स्वतःच्या भूमिका चांगल्याप्रकारे माहीत असतात - बाकीच्या नाटकाबद्दल त्यांना माहिती नसते.  प्रेक्षक ह्या सगळ्या विषयी अनभिज्ञ असतात. ते फक्त नाट्यात प्रसूत होणाऱ्या भावनेच्या गर्तेतून जातात आणि आणखी खूप काही अनुभव करत बाहेर पडतात.

जेव्हा नाटक चालू असते तेव्हा जे सर्वात जास्त फसवले जातात ते प्रेक्षक असतात कारण काही काळानंतर त्यांची गुंतागुंत अशी बनते की त्यांचा विश्वास बसू लागतो की हे सर्व वास्तव आहे.

जेव्हा नाटक चालू असते तेव्हा जे सर्वात जास्त फसवले जातात ते प्रेक्षक असतात कारण काही काळानंतर त्यांची गुंतागुंत अशी बनते की त्यांचा विश्वास बसू लागतो की हे सर्व वास्तव आहे. त्यांच्यासाठी हे नाटक मानसिक पातळीवर खेळते. ते हसतील; ते ओरडतील; ते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतील. प्रेक्षक सगळ्यात कमी सहभागी असतात परंतु सगळ्यात जास्त गुंतलेले असतात. त्यांची गुंतागुंत सगळ्यात मोठी आहे कारण ते त्याप्रकारे नाटकात अडकले आहेत. कलाकार आज एक भूमिका करू शकतात, उद्या दुसरी - ते सहभागी आहेत परंतु सगळ्यात कमी गुंतलेले आहेत. दिग्दर्शक सगळ्यात जास्त सहभागी असतो परंतु कमीतकमी गुंतलेला असतो. तो नाटक चालवतो पण त्यापासून एकदम अलिप्त राहतो.

तुमच्या आयुष्यात तुम्हाला या संधी आहेत - हे जीवन एक नाटक आहे. तुम्ही अभिनेता होऊ शकता. तुम्ही प्रेक्षक सदस्यासारखे होऊ शकता जे पूर्णपणे नाटकामध्ये गर्क झालेले आहेत. किंवा तुम्ही नाटक तयार करणारे दिग्दर्शक असू शकता. किंवा, तुमच्याकडे इतके कर्मचारी आणि प्रेक्षक नसल्यास तुम्ही तिन्ही गोष्टी करु शकता. परंतु फक्त जर तुमच्यातील दिग्दर्शक जिवंत असेल तरच तुमचे नाटक तुम्हाला पाहिजे त्या मार्गाने जाईल - अन्यथा ते एक अंतहीन, नियंत्रण नसलेले नाटक होईल.

दिग्दर्शक सगळ्यात जास्त सहभागी असतो परंतु कमीतकमी गुंतलेला असतो.

आपल्या बाह्य आयुष्यातील नाटकाबद्दल, आपण ते शंभर टक्के दिग्दर्शित करू शकत नाही. तुमच्या स्क्रिप्टनुसार चालणारे बरेच आज्ञाधारक कलाकार तुमच्याकडे नसतील. आत्ता, जेव्हा बाह्य नाटक तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही, तेव्हा पुढचे नाटक – तुमचे मानसिक नाटक - नियंत्रणाबाहेर जाऊ लागते. म्हणूनच तुम्ही तुमच्या मानसिक नाटकाचे एकमेव दिग्दर्शक बनले पाहिजे. बाहेरील नाटक त्याच्या स्वत:च्या मार्गाने खुलते.

आपल्या प्रत्येकाचे स्वतःचे बाह्य नाटक चालू आहे. हे सर्व आपल्याला पाहिजे असलेल्या मार्गाने जात नाही, परंतु आपले मानसिक नाटक आपल्या मार्गाने शंभर टक्के घडले पाहिजे. जर तुमचे मानसिक नाटक योग्य मार्गावर राहिले तरच बाह्य आयुष्यात सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पडू लागतात. जेव्हा प्रत्येक गोष्ट आनंदी असते, चांगल्या प्रकारे चालू असते, तेव्हाच हे सर्व नाटक आहे हे समजून घेण्याची आणि ते चांगल्या प्रकारे आयोजित करण्याची, ती वेळ असते. अन्यथा, स्क्रिप्टवर आपले नियंत्रण नसल्यास, नाटक एखाद्या क्षणी, एका किंवा दुसर्‍या मार्गाने - वाईट वागणूक, रोग, मृत्यू किंवा अन्य आपत्तीतून अतिशय खराब होईल.

आता आपल्या मानसिक नाटकाचा ताबा स्वतःकडे घ्या.

म्हणून ते खराब होण्याची वाट पाहू नका. आता आपल्या मानसिक नाटकाचा ताबा स्वतःकडे घ्या. स्वत:मध्येच, आपल्या स्वतःच्या कलाकारांनी तुमचे ऐकले पाहिजे. तुम्ही हे व्यवस्थापित केल्यास, आध्यात्मिक प्रक्रिया सहज होते. जोपर्यंत तुमच्या बाह्य नाट्याचा मानसिक नाटकावर प्रभाव पडत आहे, तो पर्यंत तुम्ही आध्यात्मिक होऊ शकत नाही. अध्यात्मिक वळण म्हणजे अंतर्मुख होणे. अंतर्मुख होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. तुम्ही फक्त बाह्य नाटक कार्यक्षमतेने खेळत आहात हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही सर्वकाळ ध्यानस्थानी बसलात तर हे नवीन नाटक काय आहे याबद्दल आपल्या पती किंवा पत्नीला आश्चर्य वाटेल. जर त्यांना ते आवडत नसेल तर ते आपले लक्ष विचलित करण्यासाठी आणखी एक प्रकारचे नाटकच करतील.

तुम्ही अंतर्मुख झाला आहात हे कोणालाही सांगणे आवश्यक नाही.  ते एखादं रहस्य आहे म्हणून नाही - पण हा इतर कोणाचा प्रश्न नाही. तुमच्या जोडीदारासह, तुमच्या कुटुंबासह आणि समाजात तुम्ही त्यांना पाहिजे तितके पन्नास टक्के – तुम्हाला हवे तसे पन्नास टक्के नाटक करू शकता. तुमचे मानसिक नाटक तुम्ही निश्चित केलेल्या मार्गावर शंभर टक्के असावे. अध्यात्मिकते बाबतही हेच आहे -  तुमचा मार्ग शंभर टक्के तुम्ही ठरवल्याप्रमाणे असावा. केवळ बाहेरील जगात, तुम्ही पन्नास टक्के वेळ तडजोड करू शकता. पण तुमची मानसिक नाट्यस्थिती आणि तुमची आंतरिक परिस्थिती शंभर टक्के तुम्हाला हवी तशी असावी.

सप्रेम आशीर्वाद,