सदगुरु या आठवड्याच्या स्पॉटमध्ये, आयुष्यातल्या यशाचे घटक उलगडून दाखवत आहेत. यशस्वी होण्यासाठी जे काही लागते, ते तुमच्यापाशी आहे का ? गुणवत्ता व यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि तुम्हाला जे व्हावेसे वाटते ते होणे यांतील गुणोत्तराचा विचार आपण करतो का? सदगुरु म्हणतात, “यश हे प्राप्त केलेल्या विशिष्ट, अंतिम अशा निष्कर्षामध्ये नसते तर तुम्हाला ज्याची खरी ओढ आहे, त्यासाठी आनंदी आणि अथक प्रयत्न करण्यामध्ये असते.”