नमस्कार सद्गुरू. तुम्ही म्हणालात की तुम्ही कसल्यातरी घाईत आहात आणि कुठल्यातरी वेगळ्या शक्यतेकडे नेणाऱ्या लोकांसोबत काम करायला आवडेल. मग आम्ही काय करू शकतो?

सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इच्छा. एक तीव्र आकांक्षा. जर तुमची इच्छा प्रबळ नसेल तर जराशी काही गैरसोय होताच तूम्ही लगेच माघार घ्याल. जर तुम्ही डोंगरावर ट्रेक केला तर असे होईल. कैलासच्या मागील ट्रेकवर आम्ही मानांग खोऱ्यातून ‘थोरँग ला पास’ मार्गे थोरँग इथे गेलो. हे सुमारे १८,००० फूट, साठ अंशात चढण असलेले आहे. जेव्हा तुम्ही चढायला सुरवात करता तेव्हा तुमचं मन म्हणतं , “मनांग व्हॅली खूप सुंदर आहे! आपण खरोखर त्या खिंडीतून जायला पाहिजे का ? वर तेथे सारे उजाड दिसते. सर्व काही खडबडीत आहे, हिरव्या रंगाचे निशानही नाही. पण इथे मानांग खोऱ्यात सारं किती छान आणि फुलांनी बहरलेलं आहे.” तुमच्या आयुष्यात मनाची नेहमी अशीच खेळी असेल. जे लोक या खेळीच्या पलीकडे   जातात ते तरून जातात - बाकीच्यांचे जीवन म्हणजे फक्त खाणे-पिणे आणि झोपणे. अध्यात्म असो, व्यवसाय, संगीत, कला - किंवा काहीही - जेव्हा आपण आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाल तेव्हा हे सारे आपोआप येईल. आपले मन म्हणते, “खरोखर हे सारे आवश्यक आहेच का? इथेच छान आहे की, डोंगरावर जाण्याची गरज कुठे आहे? ”

पहिली गोष्ट म्हणजे ओढ निर्माण करणे. “मला जाणून घ्यायचे आहे, मला जाणून घ्यायचे आहे, मला जाणून घ्यायचे आहे.” याने तुम्हाला आतून सतत टोचणे आवश्यक आहे. जर ती ओढ तुम्हाला टोचत नसेल, तर सत्याचा हा शोध तुम्हाला मर्यादेपलीकडे घेऊन जाणार नाही कारण प्रत्येक मनुष्यामध्ये या गोष्टी असतात. “मी या मर्यादा ओलांडणार की त्यांच्या बळी पडणार?” हा मूळ प्रश्न आहे. त्याऐवजी लोक विचारत आहेत की, “असं काय होणार आहे, काय साध्य होणार आहे?” ही काही साध्य करण्याची गोष्ट नाहीये. एक रोप कसे वाढते याबद्दल एक सुंदर व्हिडिओ आहे - पोषण करण्यासाठी आणि एखादे फूल किंवा फळ येण्यासाठी मुळे सर्वकाही करतात. कोणीतरी ते चित्रीत केलंय आणि ते फास्ट फॉरवर्ड करून चालविले आहे जेणेकरून मुळे केवळ टिकून राहण्यासाठी आणि बहरण्यासाठी काय काय करतात हे आपण पाहू शकता. हा संघर्ष आणि आपण जे आहात त्यापेक्षा अधिक काहीतरी होण्याची इच्छा ही कोणत्या शिकवणीमुळे येत नाही - तर मुळात तेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रयत्न केले. केवळ काही मानवांच्या प्रयत्नांमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल आणि अध्यात्म या संदर्भात बर्‍याच गोष्टींचा आनंद घेत आहात. बरेच प्रयत्न करत सद्गतीला पोहोचले, पण काहींनी ते खरोखर घडविले. त्या काही निवडक लोकांमुळेच पृथ्वीवर बर्‍याच गोष्टी घडून आल्या आहेत.

जर ही ओढ अगदी ज्वलंत बनली तर बाकीची गोष्ट माझ्यावर सोडा.

अध्यात्मिक प्रक्रियेच्या बाबतीतही तसेच आहे – हे कठीण आहे का? हे कठीण नाही, परंतु तुमचं कवच कठीण करून ठेवलं असेल तर हे कठीण आहे. कठीणपणा आध्यात्मिक प्रक्रियेत नाही; कठीणपणा तुमच्यात आहे. जर ही ओढ अगदी ज्वलंत बनली तर बाकीची गोष्ट माझ्यावर सोडा. मग मी पायरी पायरीने कसे-काय करावे ते सांगेन. परंतु जर आकांक्षा दररोज दोलायमान असेल तर कसे काम करावे? जर मला फक्त लोकांना साध्या सोप्या पंधरा किंवा वीस मिनिटांच्या ध्यान प्रक्रियेत दीक्षित करायचे असते तर आपण ते करू शकलो असतो; ते अगदी सोपे आहे. पण ज्वलंत ओढ असणाऱ्या कुणालाही अंतिम ध्येयाकडे नेले जाऊ शकते. माझा हेतू असा नाही की प्रत्येकजण आनंदी, निरोगी आणि आरामात झोपलेला असावा. त्यांनी वेगळ्या चैतन्यमयी प्रकाशाने प्रज्वलित व्हावे अशी माझी इच्छा आहे! तुम्ही तीस, नव्वद किंवा शंभर वर्षे जगता हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे "तुम्ही तुमच्या जीवनात दैवत्वाला स्पर्श केला आहे का? तुम्ही हाडामांसाच्या पलीकडच्या एका प्रकाशाने प्रज्वलित झाला आहात का?” तुमच्या जीवनात असे घडलेच पाहिजे, अन्यथा काय अर्थ आहे? या हाडामांसाच्या पिंजऱ्यात, जरी तुम्ही शंभर वर्षे जगलात तरीही तुमच्याकडे अगदी त्याच समस्या कायम राहतील, माझ्यावर विश्वास ठेवा. अधिकाधिक वेदनादायी समस्या, त्याहून वेगळं काही नाही!

जरा वृद्ध लोकांकडे पाहा, त्यांनी आपल्या आयुष्यात योजना केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत का? मी अशा लोकांबद्दल विचारत आहे ज्यांनी संपूर्ण आयुष्य जगले आहे. त्यांना प्रत्येक टप्प्यावर वेदना झाल्यासारखे दिसत नाही? बहुतेक लोकांचे समाधान हेच ​​असते की ते त्यांच्या शेजार्‍यांच्या संकटाइतके अडकले नाही. “तुला माहिती आहे, मी एकदम मस्त परिस्थितीत आहे. आम्हाला या अडचणी कधीच आल्या नव्हत्या! ”जर तुम्हास या ग्रहावर आणखी एखादी आकडेवारी बनवायची असेल तर तुम्ही करू शकता. परंतु जर तुम्हाला दिव्यत्वाचे मूर्तिमंत रूप हवे असेल तर जगण्याचा आणखी एक मार्ग आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओढ; ती एक ज्वलंत आकांक्षा असणे आवश्यक आहे. जर तुमच्यात ज्वलंत आकांक्षा नसली, तुमच्यात धग नसली – तर काय करावे? तुमच्यात धग नसताना काहीही थेट कसे करावे? धग निर्माण होऊ द्या. पण ती धग पेटण्यासाठी पंचेचाळीस वर्षे घेऊ नका.

सांगा तर मग, आणखी किती वेळ लावणार आहात?

सप्रेम आशीर्वाद,