Sadhguru Quotes
FILTERS:
SORT BY:
Clear All
आनंदाचं स्वरूपच असं आहे की जर तुम्ही त्याच्या मागे धावत राहिलात, तर तो दूर पळत राहील. वेळ आली आहे आता थांबून आत पाहण्याची, कारण प्रत्येक अनुभव तुमच्या आतच घडत असतो, बाहेर नाही.
जीवनाचा एक स्त्रोत आहे जो आपल्या आत कार्यरत असतो. आपण एकतर त्याची पूजा करू शकतो किंवा त्याच्याशी जागरूकपणे संपर्क मिळवू शकतो. जर आपण त्याच्याशी जागरूकपणे संपर्क मिळवला, तर आम्ही याला म्हणतो इनर इंजिनियरिंग.
जीवन म्हणजे केवळ मर्यादित वेळ आणि उर्जा. चला, तिचा सर्वांत प्रभाव निर्माण करण्यासाठी उपयोग करूया.
भ्याडपणा परिणामांबद्दल चिंता केल्याने निर्माण होतो. ज्यांचं लक्ष सतत त्यांच्या कृतींचे काय फळ असणार आहे यावर आहे, ते जीवनात त्यांना जे करायचे आहे ते कधीच करू शकणार नाहीत.
Karma is the accumulation of past recordings that keep replaying. Yoga helps to transform Your Life from a replay into a Profound Experience.
एकदा का तुम्ही तुमच्या आत समभाव जोपासला, की मग तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी गोडवा निर्माण करत प्रतिसाद देईल.
पावित्र्य हे विविध रूपांमध्ये किंवा विश्वसांमध्ये नाही तर स्वसंरक्षणाच्या उपजत प्रवृत्तीच्या पलीकडे गेल्याने सापडेल.
आमची इच्छा या सबंध पृथ्वीला एक मंदिर बनवण्याची आहे, जिथे सर्व जण जीवनाप्रती एक प्रकारच्या आदराने आणि प्रेमाने पाऊल ठेवत चालतील.
तुमच्या मनात जे घडत आहे ते वास्तव नाही; या दोन गोष्टींमधला फरक समजणं महत्वाचं आहे.
जबाबदार असणे म्हणजे तुमच्या जीवनाची मालकी स्वतःकडे घेणे. याचा अर्थ तुम्ही एक संपूर्ण मनुष्य होण्याच्या दिशेने पहिले पाऊल घेतले आहे - संपूर्णपणे जागरूक आणि परिपूर्ण मनुष्य.
जे मातीसाठी चांगले आहे ते तुमच्या शरीरासाठीसुद्धा चांगले आहे कारण तुमचे शरीर हे मातीचेच एक मूर्त स्वरूप आहे.
लोक आपल्या आजूबाजूला फक्त विविध परिस्थिती निर्माण करू शकतात. त्या आपण कशा अनुभवतो हे आपणच निर्माण करत असतो.