Wisdom
FILTERS:
SORT BY:
The Divine is not something that descended from heaven – it is a ladder that you can climb to Evolve into a Higher Possibility.
जीवन हे वरदानही नाही किंवा शिक्षाही नाही; तो फक्त एक चमत्कार आहे. जर तुम्हाला त्यावर स्वार व्हायला जमलं, तर ते सुंदर आणि छान बनतं. जर तुम्हाला त्यावर स्वार व्हायला जमलं नाही, तर ते कुरूप आणि त्रासदायक बनतं.
परंपरा म्हणजे गेल्या पिड्यांचं अनुकरण करण्याबद्दल नाहीये. हे त्यांच्या अनुभवातून शिकण्याबद्दल आहे.
प्रत्येक मनुष्याच्या आत एक ठराविक प्रतिभा असते; पण ते बहुतेक वेळा इतर कुणासारखं होण्याच्या नादात ती नष्ट करतात.
अस्तित्वातील सर्व हालचाल ही फक्त वरवर असते. खरी गोष्ट कायम निश्चल असते.
ध्यान हा क्षमतेचा प्रश्न नाहीये, इच्छुक्तेचा प्रश्न आहे.
जेवढी जास्त तुम्ही सुरक्षा शोधू लागाल, तेवढं तुम्हाला जास्त असुरक्षित वाटू लागेल. खरी सुरक्षितता केवळ बिनधास्त असताना अनुभवता येते.
There is a difference between Knowledge, Knowing, and Wisdom: Knowledge can be acquired, Knowing is a realization, and Wisdom must be earned.
केवळ जेव्हा तुम्ही स्वतःला जाणत नाही, तेव्हाच इतर लोकांची मतं महत्वाची बनतात.
जर तुम्ही शक्य त्या हरेक मार्गाने स्वतःला परिपूर्ण बनवण्याचे प्रयत्न करून आता तुमच्या लक्षात आलं असेल, की हे खऱ्या अर्थाने कुठल्याच गोष्टीतून होत नाही, तर याचा अर्थ तुम्ही या टप्प्यावर पोहोचला आहात : 'आणि आता, योग.'
विचार आणि भावना एकमेकांपासून वेगळ्या नसतात. ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, त्याच प्रकारे तुम्हाला वाटू लागतं.
जो पर्यंत आपण धर्म, वंश, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व यांच्या नावाखाली विभागलेलो आहोत, मानवजातीला खऱ्या अर्थाने कुठलंच यश लाभणार नाही.