Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमची प्रेम करण्याची, दुसऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श करण्याची आणि जीवन अनुभवण्याची क्षमता असीमित आहे. फक्त शरीर आणि मनाच्या कृतींना सीमा आहेत.
मनुष्यांना व्यवहारांपासून परमार्थाकडे वळवणे हे एक महत्वाचं पाऊल आहे जे मनुष्य असण्याचं खरं मूल्य समजण्यासाठी उचलणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला परिवर्तन हवं असेल, तर त्याचा सर्वांत मोठा भाग तुमच्या शरीरात व्हायला हवा कारण शरीरात मनाहून खूप जास्त स्मृती साठलेली असते.
केवळ जेव्हा तुम्ही स्वतःला जाणत नाही, तेव्हाच इतर लोकांची मतं महत्वाची बनतात.
अध्यात्मिक प्रक्रिया ही काही कुठली सामाजिक कृती नाही; ती तुम्ही तुमच्या आत करण्याची गोष्ट आहे.
युस अॅंड थ्रो' मानसिकता काढून टाकणं हे फक्त प्रदूषण कमी करण्याबद्दल नाहीय - हे संपूर्ण सृष्टीची कदर करण्याबद्दल आहे. सर्व काही या जिवंत धरतीमधून येतं. ते जबाबदारीने वापरूया.
The Divine is not something that descended from heaven – it is a ladder that you can climb to Evolve into a Higher Possibility.
जीवन हे वरदानही नाही किंवा शिक्षाही नाही; तो फक्त एक चमत्कार आहे. जर तुम्हाला त्यावर स्वार व्हायला जमलं, तर ते सुंदर आणि छान बनतं. जर तुम्हाला त्यावर स्वार व्हायला जमलं नाही, तर ते कुरूप आणि त्रासदायक बनतं.
प्रेमासाठी कुठलाही विमा नाही. ते जिवंत ठेवायला जागरूकता लागते.
प्रतिक्रिया ही तुमच्या भूतकाळातील स्मृती आणि निष्कर्षांवर आधारित असते. प्रतिसाद, ही या वर्तमान क्षणात होणारी जागरूक प्रक्रिया आहे. प्रतिसाद द्यायला शिका, प्रतिक्रिया नाही.
अस्तित्वातील सर्व हालचाल ही फक्त वरवर असते. खरी गोष्ट कायम निश्चल असते.
ध्यान हा क्षमतेचा प्रश्न नाहीये, इच्छुक्तेचा प्रश्न आहे.