Wisdom
FILTERS:
SORT BY:
जे मातीसाठी चांगले आहे ते तुमच्या शरीरासाठीसुद्धा चांगले आहे कारण तुमचे शरीर हे मातीचेच एक मूर्त स्वरूप आहे.
लोक आपल्या आजूबाजूला फक्त विविध परिस्थिती निर्माण करू शकतात. त्या आपण कशा अनुभवतो हे आपणच निर्माण करत असतो.
तुमच्या डोक्यात स्थिरता, पण हृदयात वेड असलं पाहिजे.
जेव्हा तुम्ही कशासोबत अगदी खोलवर प्रेमात असता, तेव्हा ती गोष्ट तुमच्या स्वतःहून जास्त महत्वाची बनते. या एक आंतरिक गुणामुळे तुमचा विकास सहजपणे होतो.
भ्याडपणा परिणामांबद्दल चिंता केल्याने निर्माण होतो. ज्यांचं लक्ष सतत त्यांच्या कृतींचे काय फळ असणार आहे यावर आहे, ते जीवनात त्यांना जे करायचे आहे ते कधीच करू शकणार नाहीत.
स्त्री ही पुरुषाहून कमी आहे ही कल्पनाच निरर्थक आहे. जेव्हा पुरुषचा जन्मच स्त्रीतून होतो, तेव्हा तो श्रेष्ठ आणि ती कनिष्ठ असं कसं असू शकेल.
तुमच्या मुलांना तुम्हाला मान द्यावा अशी अपेक्षा करू नका. तुम्ही प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं घडवलं पाहिजे, मान आणि वर्चस्वाचं नाही.
जर तुमचं व्यक्तित्व खूप मजबूत बनलं, तर तुम्ही एक व्यंगचित्र बनाल. इथे हवेच्या नाजूक झुलुकेप्रमाणे अस्तित्त्वात असणं महत्वाचं आहे.
आमची इच्छा या सबंध पृथ्वीला एक मंदिर बनवण्याची आहे, जिथे सर्व जण जीवनाप्रती एक प्रकारच्या आदराने आणि प्रेमाने पाऊल ठेवत चालतील.
वसंत ऋतूचे आगमन साजरे करण्यासाठी होळी हा एक सुंदर आणि रंगीबेरंगी उत्सव आहे. आणि जर तुम्ही स्वतःच्या आत योग्य प्रकारची रासायनिक अवस्था निर्माण करायला शिकलात, तर तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य एक उत्सव बनवता येईल.
किती सोपं किंवा किती अवघड हे तुमची तयारी किती चांगली आहे आणि तुम्ही किती सशक्त आहात यावर अवलंबून आहे.
संपूर्ण ब्रह्मांडच उर्जा आहे. जर तुम्ही स्वतःला तिच्याप्रती खुलं केलं, तर तुमच्यामध्ये कधीच उर्जेचा अभाव असणार नाही.