प्रश्न : आम्ही विद्यार्थी जे इथे बसलेले आहोत, देशाच्या उच्च टक्केवारीत येतो , आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणानुसार. तरीही आम्ही सगळे विचार करतोय, की आम्हाला कुठली नोकरी मिळेल, आम्हाला इथल्या सर्वात चांगल्या कॅम्पस प्लेसमेंट्स पाहिजेत. जर परिस्थिती अशी आहे, आम्हा …. आम्हा सर्वांसोबत, आणि आम्ही धोका पत्कारायला तयार नाही आहोत आणि धोक्याचे विरोधी झालो आहोत, तर ह्या देशात, नोकऱ्या कुठून येणार जेव्हा आम्ही स्वत:चे उपक्रम , स्वत:च स्टार्ट अप, आमच्या स्वत:च्या कंपन्या सुरु करण्याचा विचारही करत नाही आहोत?

सदगुरू: आता, बघा, भारत एक विकसनशील देश आहे. असं आहे का? एका विकसनशील देशाचा अर्थ, अजून खूप काही करणं बाकी आहे.. ह्या देशात, कुणीही बेरोजगारीबद्दल बोलायला नको, मला विचाराल तर. कारण खूप काही करायला बाकी आहे. आता समस्या ही आहे, की तुम्हाला फक्त त्या विशिष्ट प्रकारची नोकरी हवीय, जिथे तुम्हाला जास्तीत जास्त पगार मिळेल, काम न करता. हो! नाहीतर, हा एक विकसनशील देश आहे. ह्या देशात लाखॊ गोष्टी करणं बाकी आहे. हा एक विकसित देश नाहीये, “ मी काय करू, सर्वकाही तर झालंय?” नाही, खुप साऱ्या गोष्टी अजुन होणं बाकी आहे. तर तुमच्याकडे एक चालू मेंदू, आणि बघू शकणारे डॊळॆ असतील, जर तुम्ही आसपास पाहिलंत, तर हजारो गोष्टी करणं बाकी आहे, तुमच्या अवतीभोवतीच, हो की नाही?