Wisdom
FILTERS:
SORT BY:
आपल्याला जगामध्ये दानशूरपणाची नाही, तर समावेशकतेची गरज आहे.
जर तुम्ही असा विचार केला तुम्ही जसे आहात त्यासाठी इतर कुणीतरी जबाबदार आहे, तर तुम्ही स्वतःला हवे तसे बनूवू शकणार नाही.
तारुण्य हा तुम्ही किती वर्ष जगला याचा नाही, तर तुम्ही किती जिवंत आणि जीवनाशी समरस आहात याचा प्रश्न आहे.
भारताच्या तरुण उर्जेला मानवी प्रतिभा, क्षमता आणि समावेशक मानवतेमध्ये अभिव्यक्त करण्याची आता वेळ आली आहे. हीच भारताची खरी ओळख आहे. चला, आपण एकत्र येऊन एक जागरूक पृथ्वी निर्माण करूया.
या विश्वात मानवी मन सोडलं, तर असं काहीच नाही जे सगळ्याशी एकरूप झालेलं नाहीये.
प्रत्येक ध्वनीला त्याची स्वतःची एक भूमिती असते. जर तुम्ही योग्य प्रकारचे ध्वनी उच्चारले तर ते त्या आकारांना जाऊन स्पर्श करतील. यामध्ये एक प्रचंड शक्ती आहे.
जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या अस्तित्वाच्या सीमा ओलांडायच्या असतील, तर तुमच्या हृदयात वेड आणि डोक्यात पूर्ण संतुलन असण्याची गरज आहे.
जीवन म्हणजे, चांगलं आणि वाईट या संकल्पनांच्या पलीकडचा एक अद्भुत चमत्कार आहे. या संकल्पना मानसिक विश्वाला, वास्तव म्हणून केलेल्या गैरसमजातून निर्माण होतात.
गुरू म्हणजे जो अंधकार दूर करतो तो. तो अशा अयमांवर प्रकाश टाकू शकतो जे अद्याप तुमच्या अनुभवात नाही.
स्पष्टता ही तुम्ही तुमचा मानसिक गोंधळ जागरूकपणे हाताळल्याने निर्माण होते.
May you experience a profound sense of gratitude for all life in this creation.
शिक्षण म्हणजे एखाद्या उत्पादन प्रणालीसारखी बोजड व्यवस्था नसावी. यामुळे सृजनशीलता, उपजत प्रतिभा आणि मानवता नष्ट होते. खऱ्या अर्थाने मनुष्याचे पोषण करणारी शिक्षण प्रणाली, ही एक जागरूक पृथ्वी निर्माण करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे.